महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने निकाल दिला आहे. मात्र त्यातही भाजपने अभूतपूर्व यश मिळवलेलं आहे. महायुती 220 जागांवर आघाडीवर आहे. 126 जागांवर भाजप पुढे आहे. 2019 ला महाराष्ट्रात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा तो रेकॉर्ड मोडलेला आहे. भाजपला जनतेने प्रचंड बहुमत दिलं आहे. विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे भाजप मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असल्याचं दिसत आहे.
मुंबईतील 36 जागांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 08, राष्ट्रवादी अजित पवार गट 01 जागेवर पुढे आहे. काँग्रेस 02 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट 07 जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला भोपळा फोडता आलेला नाही.
कोकणातील 39 जागांपैकी 13 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 02 उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिवसेना ठाकरे गट 03, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 04 उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसला कोकणामध्ये भोपळा फोडता आलेला नाही.
पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी भाजप 20, शिवसेना शिंदे गट 08, राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 04, शिवसेना ठाकरे गट 03, तर राष्ट्रवादी शरद पवार गट 06 जागांवर आघाडीवर आहे.
मराठवाड्यात 46 जागांपैकी भाजपला 15 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गट 10 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 02 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 06, शिवसेना ठाकरे गट 03 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकाही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.
विदर्भातील 62 जागांपैकी भाजप 45, शिवसेना शिंदेगट 05 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट 03 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 07 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एक जागा मिळवता आलेली नाही.
उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांपैकी भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट 10, अजित पवार गट 10 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 03, राष्ट्रवादी शरद पवार गट 01 जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.