ईव्हीएम झुगारलं… अखेर ‘या’ गावात पार पडलं मतदान, किती मते पडली? आश्चर्यकारक निकाल हाती; जानकर यांचा पुन्हा हल्ला काय?

| Updated on: Jan 20, 2025 | 4:00 PM

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या वादाला धानोरे गावातून नवीन वळण मिळाले आहे. मारकडवाडीप्रमाणेच येथेही ग्रामस्थांनी ईव्हीएमला नकार देत हात उंचावून मतदान केले. यामुळे ईव्हीएममध्ये चुका असल्याचा आरोप पुन्हा एकदा बलवान झाला आहे. आता मतपत्रिकांवर मतदान करण्याची मागणी जोर धरत आहे.

ईव्हीएम झुगारलं... अखेर या गावात पार पडलं मतदान, किती मते पडली? आश्चर्यकारक निकाल हाती; जानकर यांचा पुन्हा हल्ला काय?
evm machine
Follow us on

Maharashtra EVM controversy : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता दोन महिने उलटले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी लागली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीचे सरकार आल्यानंतर महाविकासआघाडीकडून ईव्हीएममध्ये गोंधळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप नोंदवत थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मारकडवाडी हे गाव चर्चेत आले होते. आता मारकडवाडीनंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गावात आवाजी मतदानही पार पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

पंढरपुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावानंतर धानोरे गावातून ईव्हीएमला विरोध करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावात हात उंचावून आवाजी मतदान पार पडले. उत्तमराव जानकर यांना धानोरे गावातून EVM मध्ये 963 मते पडली होती. मात्र हात उंचावून प्रत्यक्ष मतदान घेतल्यानंतर 1206 मते पडल्याचे समोर आले आहे. यानुसार एकूण 243 मतांचा फरक पडला आहे. धानोरे आणि मरकडवाडी गावातील हजारो मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या नावे तयार केले आहे. लवकरच हे प्रतिज्ञापत्र बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष नेऊन देणार आहेत.

धानोरे गावात ईव्हीएम विरोध

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील प्रत्येक तालुक्यातून फेर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. 25 जानेवारी हा निवडणूक आयोग स्थापना दिवस आहे. मात्र जर ईव्हीएम मशीन मध्ये हेराफेरी करून देशात निवडणुका होत असतील तर 25 जानेवारीला निषेध दिवस म्हणून दिल्ली येथे जंतर मंतरवर सत्याग्रह करण्यात येणार आहे. निवडणुकीत पहिल्या पाच टप्प्यात ईव्हीएममध्ये घोळ नव्हता. त्यानंतर सहा आणि सातव्या टप्प्याला ईव्हीएम मध्ये ट्रॅप लावला. विधानसभेच्या निवडणुकीतही ईव्हीएम मशीनला ट्रॅप लावल्याचा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे.

अजित पवार यांच्यावरच आता रडायची वेळ येईल

“जर ईव्हीएम मशीनला ट्रॅप लावला नसता तर अजित पवार 20 हजार मतांच्या फरकांनी पडले असते. या ट्रॅपमुळेच अजित पवार विजय झाल्याचाही आरोप उत्तमराव जानकर यांनी केला. अजित पवार यांच्यावरच आता रडायची वेळ येईल हा उत्तम जानकर आहे, अजित पवार यांनी लक्षात ठेवावे. हा या विषयाचा तळ गाठणार आहे, असेही ते म्हणाले. त्यावर अजित पवारांनी विरोधक ईव्हीएमचे नाव घेऊन रडत आहेत”, अशा शब्दात या टीकेला जानकर यांनी उत्तर दिले आहे.

“दिल्लीच्या निवडणुकीत जर ईव्हीएमला ट्रॅप लावला तर नक्कीच पकडले जाल, नाही लावला तर भाजपा हद्दपार होईल. ज्यावेळेस उत्तम जानकर यांचा राजीनामा होईल, त्यावेळेस अजित दादा तुम्ही सत्तेतून बाहेर असाल एवढे मी खात्रीने सांगतो. राम सातपुते मध्ये मध्ये चोच घालू नका, कुठेतरी कात्रीत मुंडके सापडून तुझा कार्यक्रम होईल,” अशा शब्दात उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांना उत्तर दिले आहे.