विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आता एक्झिट पोल हाती आले आहेत. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 27 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जाग मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 28 ते 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला 16 ते 35 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर 12 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना दोन ते आठ जागांचा अंदाजा पी मार्कने वर्तवला आहे.
दरम्यान एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन एक्झिटपोलमध्ये महायुतीच्या अधिक जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 27 ते 50 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 18 ते 28 जाग मिळण्याची शक्यता आहे.