Farmers protest | दिल्लीच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातून बळ, वाचा काय आहे नियोजन?

| Updated on: Dec 20, 2020 | 10:37 PM

किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी सोमवारी (21 डिसेंबर) दिल्लीकडे कूच करणार आहेत. (Maharashtra farmers Delhi protest)

Farmers protest | दिल्लीच्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातून बळ, वाचा काय आहे नियोजन?
Follow us on

मुंबई : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी सोमवारी (21 डिसेंबर) दिल्लीकडे कूच करणार आहेत. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या वाहन मोर्चात राज्यातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. राज्यभरातील हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्र येतील. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करतील. (Maharashtra farmers will join the protest of Delhi)

अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या वाहन मोर्चाला शुभेच्छा देण्यासाठी केरळचे खासदार आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव के. के. रागेश यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  हमीभावाला संरक्षण मिळावे, केंद्रीय स्तरावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी अशी मागणी के. के. रागेश यांनी संसदेत केली होती. आताच्या तिन्ही शेतकरीविरोधी आणि जनताविरोधी कायद्यांना राज्यसभेत त्यांनी कसून विरोध केला होता. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातून निघणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी ते सोमवारी नाशिक येथे येत आहेत.

मोर्चाचे कसा मार्गस्थ होणार?

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दुपारी 1 वाजता गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेनंतर हा वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करेल. शेकडो वाहने असलेला हा वाहन मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गाने ओझर, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे (वणी) मार्गे सायंकाळी 5.30 वाजता चांदवड येथे मुक्कामी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता चांदवड येथून वाहन मोर्चा पुन्हा सुरू होऊन होईल. तो उमराणे, मालेगांव, धुळे, शिरपूर मार्गे मध्य प्रदेश राज्यात जाईल. मध्य प्रदेशहून राजस्थानमार्गे हा मोर्चा 24 डिसेंबर रोजी दिल्ली येथे पोहोचेल.

शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या ?

शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे या मागण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीला संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे. तसेच, सरकारने किमान आधारभूत किमतीने शेतमाल खरेदी करण्यासाठी सक्षम व्यवस्था उभी करावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांकडून केल्या जाणार आहेत.

 

संबंधित बातम्या :

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार?

भाजपचा अजून एक मित्रपक्ष दुरावणार?, बेनिवाल 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार

तुम्ही ‘ट्रॉली टाईम्स’ वाचलाय? शेतकरी आंदोलकांनीच सुरु केलेला पेपर काय छापतो? वाचा…

(Maharashtra farmers will join the protest of Delhi)