महाराष्ट्रात आता नवं ‘फडणवीस सरकार’ अस्तित्वात आलं आहे. आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची देवगिरी बंगल्यावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील तीन दिवस राज्यावर पाऊसाचे सावट आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्र राज्यावर पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या, ‘शेजारील बांगलादेशात हिंदू मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. त्यापैकी बहुतांश दलित आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. काँग्रेस पक्ष गप्प बसून आता फक्त मुस्लिम मतांसाठी सावधपणे ओरड करत आहे. या प्रकरणी काँग्रेस, सपा आणि त्यांचे समर्थक एकाच थाटात आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या केंद्र सरकारने पुढे येऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.’
12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय प्लेसेज ऑफ वर्शिप एक्ट 1991 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणार आहे. तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. ही सुनावणी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
वाराणसीच्या स्वरवेद महामंदिरात शताब्दी महोत्सवात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “प्रत्येक काम देशाच्या नावाने व्हायला हवे, आमचे वैयक्तिक अस्तित्व नाही. आपला देश सुरक्षित असेल तर आपला धर्मही सुरक्षित आहे, आपला धर्म सुरक्षित असेल तर आपणही सुरक्षित आहोत.
शिंदे शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाच्या संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय. संजय राऊत जेलमध्ये जाऊन आलेले संत आहेत. संजय राऊत सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. राऊतांकडे सकाळ-संध्याकाळी भोंगा वाजवण्याचं काम आहे, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी हल्लबोल केला आहे.
सांगलीतून मोठी बातमी समोर आली आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात 18 डिसेंबर रोजी सांगलीत नागपूर-रत्नागिरी हायवेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
चंपाषष्ठी निमित्ताने धुळे शहरातील प्राचीन खंडेराव मंदिरात भाविकांची गर्दी झाली. भाविकांनी यावेळी भंडारा उधळला. मंदिरा बाहेर अर्धा किलो मीटर पर्यंत भाविकांची दर्शनासाठी रांग लागली.
मरकडवाडी ग्रामस्थांना निवडणूक आयोगा घाबरलं आहे, त्यामुळेच गावकऱ्यांची धरपकड सुरु असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला. त्याचा निषेध म्हणून आज शपथ घेतली नाही. पण वैधानिक अधिकार मिळवण्यासाठी शपथ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. पण इंडिया आघाडीत समन्वय नसेल आणि सर्वांना घेऊन सोबत घेऊन जात नसेल तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करेल असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
जनतेने दिलेलं बहुमत आहे की ईव्हीएम- निवडणूक आयोगाने दिलेलं बहुमत आहे. तेव्हा मारकडवाडीतील लोकांनी मॉक पोल मागितला. तो होऊ दिला नाही. त्यामुळे जनतेचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही. उद्या आम्ही शपथ घेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कोणत्याही प्रकारचा समन्वय महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत पाहायला मिळाला नाही, असा घरचा आहेर अबु आझमी यांनी दिला.
धुळ्यात सोमवारी विशाल मशाल मोर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मशाल मोर्चा सोबतच ईव्हीएमची अंतयात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळापर्यंत मशाल महामोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे.
उद्या शपथ घेऊन नंतर ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात यावे अशी चर्चा झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिले. ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते.
मारकडवाडी गावात शरद पवार येण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे पोस्टर झळकू लागले. या गावातून भाजपला सर्वाधिक १००३ मते मिळाली होती. या मतांचा उल्लेख ही या पोस्टरवर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार मारकडवाडी येथे उद्या येत आहे. या दौऱ्याबाबत माजी आमदार राम सातपुते यांनी डिवचणारे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “उद्या मारकडवाडीत मा.शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला ” असे असे ट्विट करत माजी आमदार राम सातपुते यांनी विरोधकांना डिवचले.
पैठण विधानसभेचे आमदार विलास भुमरे हे रुग्णालयात आहे. त्यामुळे ते आज शपथ घेऊ शकत नाहीत. त्यांना एक महिनाभर रुग्णालयातच उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे एक महिन्यानंतर विलास भुमरे यांच्या शपथविधीसाठी विशेष व्यवस्था करून त्यांना आमदार पदाची शपथ दिली जाणार आहे.
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होते आहे. या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक भक्तांनी जेजुरी गडावरती श्री.खंडेरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. भक्तांना दीड हजार किलो वांग्याचे भरीत आणि पाचशे किलो बाजरीच्या भाकरीचा प्रसाद दिला जाणार आहे.
नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर आयशर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. ट्रक बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
मधुकरराव पिचड यांच्या इच्छेनुसार अकोले शहरातील भाजप कार्यालयात काही वेळ ठेवण्यात आले पार्थिव. पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने नागरिक अंत्यदर्शनाला. अकोले एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ती महाविद्यालयातील प्रांगणात नागरीकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येणार पार्थिव. दुपारी चार वाजता राजूर गावात मधुकरराव पिचड यांच्यावर होणार अंत्यसंस्कार.
बांगलादेशी इस्कॉन या मानवतावादी आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात बांगलादेश सरकार अन्याय व अत्याचार करत असल्याचा निषेधार्थ पुणे शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन. पुण्यातील बालगंधर्व चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जातेय.
मुंबईत आजपासून 9 डिसेंबरपर्यंत विधानसभेच विशेष अधिवेशन. विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीला सुरुवात. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर निवडून आलेल्या आमदारांना शपथ देत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाच आमदारांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत. भाजपकडून अतुल सावे आणि प्रशांत बंब यांच्या नावाची चर्चा. शिंदे गटाकडून संजय शिरसाट, रमेश बोरणारे आणि विलास भुमरे यांच्या नावाची चर्चा. काही नव्या दमाच्या आमदारांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता. जिल्ह्यातील दोन महिला आमदारही मंत्रीपदासाठी इच्छुक. संजना जाधव आणि अनुराधा चव्हाणही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती.
विरोधी पक्षातले आमदार आज शपथ घेणार नाहीत. EVM च्या मुद्यावर विरोधा पक्षाचे आमदार आज आवाज उठवणार आहेत. विशेष अधिवेशनात विरोधी आमदार EVM चा मुद्दा मांडणार आहेत.
जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली असून सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत.
अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी व कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे.
चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं व अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करत आहे असे गुलाबराव देवकर म्हणाले.
राज ठाकरे यांना खेळवलं जातंय, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाच्या हातातलं खेळणं झालंय. भाजप सांगेल त्या प्रमाणे ते भूमिका घेत आहेत हे काल देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालंय – संजय राऊतांची टीका
भाजपसोबत जाताच बेनामी मालमत्ता मुक्त करण्यात आली. प्रफुल पटेलांची प्रॉपर्टीदेखील 8 व्या दिवशी मोकळी केली, लवकरच नवाब मलिकांची संपत्ती सोडवली जाईल – संजय राऊतांचा आरोप. शिंदे , पवारांनी भीतीपोटी पक्ष सोडला अशी टीकाही त्यांनी केली.
मला कोणावरही टीका करायची नाही, पण कुडाळला मागे नेण्याचं काम आधीच्या आमदारांनी केलं असं निलेश राणे म्हणाले.
आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांनी सांगितलं.
मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात तिन्ही नेते चर्चा करतील… लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल… राज ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय फडणवीसांचा वैयक्तिक… असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
कपालेश्वर मंदिरातील चार दान पेट्यांमध्ये सुमारे अकरा लाख रुपये झाले होते जमा… दोन महिन्यात भाविकांनी दिले भरभरून दान… पाच पैकी एक पेटी चोरीला गेल्याने चार दानपेट्यांची मोजणी पूर्ण… दानपेटीच्या वादांमुळे धर्मदाय आयुक्तांकडून करण्यात आल्या होत्या सील… सील केलेल्या चार दानपेटींची मोजणी पूर्ण
गृहमंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंपुढे 3 भाजपचे 3 पर्याय- सूत्र… महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांबाबत विचार करा, असा शिवसेनेला भाजपचा सल्ला… शिवसेनेला या ३ खात्यांच्या पर्यांयांपैकी १ पर्याय निवडावा लागणार… गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही… ऊर्जा, गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी… अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंधरवाड्यात हिट अँड रणच्या दोन गंभीर घटना झाल्यानं खळबळ…. इंदिरानगर मधील घटनेतील दीपक पाठक यांचा उपचारादरम्यान मृत्यू… तर गंगापूर रोडला माजी आरटीओ अधिकाऱ्यांच्या पत्नीने घेतला होता दाम्पत्याचा बळी… नाशिक शहरातील हिट अँड रणच्या दोन्ही घटनांनी नाशिककरांमध्ये संताप… कार चालकांवर गंभीर गुन्हे दाखल करून कारवाईची नागरिकांची मागणी…
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणालीद्वारे वाहनावर नजर असणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रीम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित कॅमेरे बसविण्यात आले आहेत.रडारतंत्राचा वापर करुन वाहनांचा वेग मोजण्यात येत आहे. वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविल्यास अशा वाहनाना ई-चलान देण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
HAL निर्मित ‘तेजस’ चे नाशिकमधून मार्चपर्यंत चाचणी उड्डाण होणार आहे. 60 HTT प्रशिक्षणार्थी विमानांची बांधणी सुरू करण्यात आली आहे. 2025 पर्यंत पाहिले चाचणी विमान उड्डाण घेणार आहेत. विमान निर्मितीचे दोन्ही प्रकल्प नशिकसाठी महत्वाचे आहेत. सुट्टे भाग,यंत्रसामग्री स्थानिक पातळीवर तयार होणार असल्याने उद्योजकांना देखील फायदा होणार आहे. 50 एअर कार्गो द्वारे निर्यात होणार आहे. HAL कडून देशभरात होणार 83 तेजसची निर्मिती करण्यात आली आहे.
जॉगिंग ट्रॅकवर ड्रग्ज विक्री सुरू असतांना पोलिसांचा छापा टाकण्यात आला आहे. नाशिक पोलिसांची ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ६१.५ ग्रॅम ड्रग्जसह चौघे नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई करण्यात आली आहे. संशयित वडाळा गावातील असल्यानं छोटी भाभीचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची देवगिरी बंगल्यावर गर्दी आहे. शपथविधी झाल्यानंतर मंत्र्यांच्या बंगल्यावर भेटणाऱ्यांची संख्या वाढली. आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आहे. अधिवेशनाला जाण्यापूर्वी अजितदादा कार्यकर्त्यांना भेटणार आहेत.