म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

| Updated on: May 15, 2021 | 10:10 PM

म्युकरमायकोसिसबाधित रुग्णांवर उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे दिले. (maharashtra government mucormycosis affected patient)

म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
Black Fungal Infection
Follow us on

मुंबई : राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांचे स्वतंत्र पथक करावे असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) वाढते रुग्ण लक्षात घेता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली. (Maharashtra government will form special ward in government hospital for treatment of Mucormycosis affected patient said Rajesh Tope)

एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील नाही

यावेळी बोलताना, “काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनानंतर हे नवे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. या आजारावरील रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टिक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

उपचाराची स्वतंत्र पथक नेमावे

राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात येईल. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमता येतील, असेही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

5000 इंजेक्शन प्राप्त झाले

यावेळी पुढे बोलताना राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णांचा उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांबद्दल माहिती दिली. “या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज 5000 इंजेक्शन प्राप्त झाले असून त्याचे वितरण करण्यात आलेय. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे,” असे टोपे म्हणाले.

दरम्यान, शेवटी बोलताना त्यांनी कोरोना रुग्ण दगावण्याचे कारण सांगितले. काही रुग्ण अंगावर दुखणे काढत आहेत. तसेच काही रुग्ण उपचारासाठी उशिरा दाखल होत आहेत. याच कारणामुळे राज्याचा मृत्यूदर जास्त आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे रुग्ण आल्यास. लक्षण दिसताच आधी चाचणी करावी आणि त्यानंतर उपचार करावेत अशा सूचना सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना दिल्या आहेत, असेसुद्धा टोपे यांनी सांगितले.

इतर बातम्या :

Video | “आजही देवाकडे जास्त न बघता आईकडे बघतो,” मातेची आठवण येताच राज्यातील मोठा मंत्री गहिवरला

फडणवीसजी तुम्हाला माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; नवाब मलिक यांची खोचक टीका

वादळ धडकणार नाही, पण मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, मुसळधार पावसाची शक्यता; महापालिका अ‍ॅलर्ट

(Maharashtra government will form special ward in government hospital for treatment of Mucormycosis affected patient said Rajesh Tope)