मुंबईः आगामी गुढी पाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिधापत्रिका धारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शिदा पत्रिका धारक1 कोटी 63 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. हे कार्ड असलेल्या नागरिकांना केवळ 100 रुपयात महत्त्वाच्या चार गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.
केशऱी कार्ड धारक अर्थात शिक्षापत्रिका धारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर पामतेल असा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिनाभर ही योजना सुरु राहील. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. ई-पॉसद्धारे १०० रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात हा शिधा दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे प्रक्रिया सुरु केली जाईल. तसेच 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279रुपये प्रति संच या दरानुसार 455कोटी 94लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी 5177. 38 कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे 68 हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.
प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा सुरु होऊन तो 85 कि.मी. लांब आहे. नदीच्या उजव्या तीराने जाणारा कालवा 97 कि.मी. आहे. या दोन्ही कालव्यातून 68 हजार हेक्टर सिंचन होणे अपेक्षित आहे. 2017 पर्यंत या प्रकल्पाचे कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता, कोपरगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणप्रर्वण भागातील 182गावांना सिंचनाचा लाभ होईल.