शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने काकडी गावाची सत्ता गमावली. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या भाची आणि माजी भाजप आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांच्या गटाचा विजय झाला. तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या गटाला पराभवाची धूळ चाखावी लागली. (Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)
कोपरगावात काकडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटाने सत्ता खेचून आणली. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या गटाची काकडी गावात सत्ता होती. यंदा भाजपच्या स्नेहलता कोल्हे गटाने 11 पैकी 8 जागांवर विजय मिळवला.
कोण आहेत स्नेहलता कोल्हे?
शिर्डी विमानतळासाठी निधीची घोषणा
काकडी गावात शिर्डी विमानतळ असल्याने मुख्यत्वे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. निवडणुकीच्या तोंडावर आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून 300 कोटींचा निधी विमानतळ आणि गावाच्या विकासासाठी देण्याची घोषणा करुन घेतली होती, परंतु मतदारांनी कौल भाजपच्या पारड्यात टाकल्याचं दिसत आहे.
विखे पाटलांना मूळगावी धक्का
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. (Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)
लोणी खुर्द हे राधाकृष्ण विखे-पाटलांचं गाव आहे. या गावात विखे पाटलांची 20 वर्षांपासून सत्ता होती. 17 पैकी 13 जागांवर परिवर्तन पॅनेलनं विजय मिळवल्यानं अवघ्या 4 जागांवर विखे पाटील समर्थकांचं पॅनेल विजयी झाले.
संबंधित बातम्या :
राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा धक्का,लोणी-खूर्द गावातील सत्ता गमावली
कोपरगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, राष्ट्रवादीच्या आमदारासमोर विखेंच्या भाचीचं आव्हान
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE |महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया
(Ahmednagar Kakadi Gram Panchayat Snehalata Kolhe beats Ashutosh Kale)