मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप (BJP) पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरले. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींपैकी 6 हजारहून जास्त ग्रामपंचायतींवर (Gram panchyat election results) भाजपचा झेंडा फडकेल, असा दावा भाजपकडून करण्यात आला. (BJP will win in more than 6000 gram panchyat election results 2021)
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी मुंबईतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा केला. ही माहिती खोटी नाही. मी आकडेवारीच्या जोरावर हा दावा करत असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले.
आतापर्यंत कोकण म्हणजे शिवसेना असे समीकरण होते. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने हे समीकरण मोडीत काढले आहे. सिंधुदुर्ग, वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. कोकणातील 70 पैकी 55 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. याशिवाय, राज्याच्या इतर भागांमध्येही भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केला.
राज्यभरात सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला (Gram Panchayat Election Results ) सुरुवात झाल्यापासून शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र, आता हा ट्रेंड बदलताना दिसत आहे. भाजपने आता शिवसेनेला मागे टाकत तब्बल 451जागांवर मुसंडी मारली आहे. तर सध्या शिवसेना 425 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहे. एकूणच सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस 320, राष्ट्रवादी 300, मनसे 11 आणि इतर पक्ष 616 ग्रामपंचायतींमध्ये आघाडीवर आहेत.
संबंधित बातम्या:
विखेंच्या भाचीने करुन दाखवलं, राष्ट्रवादीच्या आमदाराची दहा वर्षांची सत्ता खालसा
(BJP will win in more than 6000 gram panchyat election results 2021)