सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (Mhaisal)ग्रामपंचायतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. म्हैसाळ ही जयंत पाटील (Jayant Patil) यांची सासुरवाडी आहे. 17 जागांच्या या ग्रामपंचायतीत जयंत पाटील यांचे पाहुणे राऊळे उभे होते. मात्र भाजपने इथे मोठा विजय मिळवला. जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायतीत भाजपचा एकतर्फी विजय झाला. (In Mhaisal Gram Panchayat Jayant Patil relatives defeated by BJP)
म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला तब्बल 15 तर राष्ट्रवादीला फक्त 2 जागांवर विजय मिळाला. इतकंच नाही तर म्हैसाळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झालं. भाजपाने इथे सत्ता खेचून आणली असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सासुरवाडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. जयंत पाटलांचे मेहुणे मनोज शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील यांचा लहान मेहुणा, मोठ्या मेहुण्याची पत्नी आणि मेहुण्याची मुलगी पराभूत झाली.
राज्यात 16 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यांनतर आज संपूर्ण महाराष्ट्रात मतमोजणी होत आहे. सध्या समोर आलेल्या चित्रानुसार शिवसेनेने मुसंडी मारली असून 371 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय प्राप्त केला आहे. तर भाजपचीही विजयी घोडदौड सुरु असून एकूण 373 जागांवर भाजप आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरासरी 250 जागांवर आघाडीवर आहेत.
दरम्यान, जयंत पाटील यांचे मेहुणे, मेहुण्यांची पत्नी आणि मेहुण्यांची मुलगी अशा एकूण सर्वांचाच पराभव झाला. ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जाणाऱ्या असाल्या तरी जयंत पाटील यांच्या नातेवाईकांचा झालेला हा पराभव सध्या चर्चाचा विषय ठरतो आहे.
पालघर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पालघर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायती 3 पक्षाकडेhttps://t.co/n3hMIP6MhQ#गुलालकुणाचा #Grampanchayatelection #GramPanchayatElectionResults
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या :
निवडणुकीचे प्रत्येक अपडेट लाईव्ह LIVETV
(In Mhaisal Gram Panchayat Jayant Patil relatives defeated by BJP)