सोलापूर: जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतीच्या निकालांपैकी हाती आलेल्या निकालानुसार 654 ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं 213 तर भाजपनं 175 ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा सांगोल्यातील जवळा ग्रामपंचायतीत दारूण पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिपकआबा साळुंखे यांच्या गटाने 15 पैकी 11 वर विजय संपादित केला आहे. वासूद अकोले ग्रामपंचायतीवर भाजप तालुकाध्यक्ष केदार गटाने शेकापची पन्नास वर्षांची सत्ता उलथवून टाकत दणदणीत विजय मिळवला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 NCP won most Gram Panchayat in Solapur BJP lost in District President Village )
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांना महत्त्व असतं परंतु तालुक्याचे पक्षीय नेते त्या स्थानिक आघाडीचे नेतृत्व करत असतात. वासुद अकोला ग्रामपंचायती रूपाने सांगोल्यात भाजपाने पहिलीच ग्रामपंचायत जिंकली आहे.वासूद अकोला मध्ये मागील पन्नास वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाची एक हाती निर्विवाद सत्ता होती. मात्र, भाजप तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार यांनी ही सत्ता उलथून टाकत भाजपची सत्ता या ग्रामपंचायतीवर आणली आहे.
जवळा ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या गटाचा दारुण पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या गटाने 15 पैकी 11 जागा जिंकत भाजप जिल्हाध्यक्ष यांना धोबीपछाड दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक ग्रामपंचायतीवंर विजय मिळवला आहे. त्या खालोखाल भाजपनं 175 ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. काँग्रेसनं 50 तर शिवसेनेने 97 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.
भाजप -175
शिवसेना -97
काँग्रेस -50
राष्ट्रवादी -213
स्थानिक आघाडी -87
आरपीआय -1
शेकाप -30
रा स प -1
सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.
Gram Panchayat Election Results 2021: पश्चिम महाराष्ट्रात कुणाचं वर्चस्व?, भाजप मोठा, की आघाडीचे प्राबल्य?https://t.co/cl81jAhRhl#गुलालकुणाचा | #GramPanchayatElectionResults | #Grampanchayatelection | #GramPanchayatElectionResults | #Grampanchayatelections2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2021
संबंधित बातम्या:
(Maharashtra gram panchayat election results 2021 NCP won most Gram Panchayat in Solapur BJP lost in District President Village )