नागपूर: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची पार पडली आहे. ग्रामपंचायत निकालातील वेगवेगळ्या गोष्टी आता समोर येत आहेत. युवकांपासून ते जेष्ठ नागरिकांचा सहभाग ग्रामपंचायत निवडणुकीत दिसू आला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विविध ठिकाणी करण्यात आलेला जल्लोष राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर जिल्ह्यातील उमेरड तालुक्यातील शीतल सहारे हिची घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. शीतल सहारे यांच्या विजयानंतर गावकऱ्यांनी केलेला जल्लोष चर्चेचा विषय ठरत आहे. शीतल सहारेच्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ( Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Sheetal Sahare Victory rally video viral on social media)
शीतल सहारे ही उमरेड तालुक्यातील सावंगी खुर्द ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभी राहिली होती. शीतलने 24 व्या वर्षीचं ग्रामपंचायतीच्या कारभारात एन्ट्री मिळवलीय. सावंगी खुर्दच्या ग्रामस्थांनी शीतल सहारेच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे. शीतल विजयी झाल्यानंतर तिची थेट घोड्यावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. शीतल सहारे सावंगी ग्रामपचांयतीमध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून विजयी झाली आहे.
अनोख्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा
सावंगी खुर्दच्या ग्रामस्थांनी शीतल सहारे हिच्या विजयाचा जल्लोष अनोख्या पद्धतीनं साजरा केला. गावकऱ्यांनी शीतलची घोड्यावरुन काढली. सावंगी खुर्दच्या ग्रावकऱ्यांनी केलेल्या अनोख्या जल्लोषाची चर्चा सर्वत्र रंगली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयाचा आनंदोत्सव वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आला. कुठं पत्नीनं पतीला उचलून घेतल्याचं पाहायला मिळालं तर कुठं पतीनं पत्नीला उचलून घेतलं.
पुणे जिल्ह्यातील खेडमधील पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. पतीने इतकं मोठं यश मिळवल्याने पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला. या फोटोची राज्यात सर्वत्र चर्चा झाली.
Gram Panchayat Election 2021 Result | माझा कारभारी लय भारी!
कोल्हापुरातील रमणमळा परिसरात मतमोजणी झाली. यावेळी सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. गिरगावातील सतेज पाटील गट आणि ग्रामविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचे कळताच एकच जल्लोष झाला. गिरगावातील अ वॉर्डमध्ये उत्तम पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. उर्वरित दोन जागांवर झालेल्या निवडणुकीत शुभांगी संजीव कोंडेकर आणि शीतल प्रविण चव्हाण यांचा विजय झाला. याशिवाय ब वॉर्डमध्ये उत्तम विष्णू पाटील, अर्चना सावंत आणि अर्चना गुरव यांनी बाजी मारली. क वॉर्डमध्ये जालंदर पाटील आणि वैशाली परीट यांचा विजय झाला. तर ड वॉर्डमध्ये गीता महेश पाटील, संतोष सुतार आणि महादेव कांबळे यांनी गुलाल उधळला.
या विजयानंतर शुभांगी कोंडेकर यांचे पती संजीव कोंडेकर, शीतल यांचे पती प्रविण चव्हाण आणि अर्चना गुरव यांचे पती रामचंद्र यांनी आपल्या पत्नींना उचलून घेऊन व्हिक्टरी साईन अर्थात विजयाचं चिन्हं दाखवून जल्लोष केला. पत्नीच्या विजयांचा जल्लोष करणाऱ्या पतीदेवांचा हा व्हिडीओ उपस्थितांनी शूट केला आणि बघता बघता तो राज्यभरात व्हायरल झाला.
फॉरेन रिटर्न ‘डॉक्टरीण’, ग्रामपंचायतीत वंचित पुरस्कृत पॅनलमधून डॉ. चित्रा कुऱ्हे विजयी https://t.co/GVwbGDDuYz #Hingoli | #Digraswani | #GramPanchayatElection | #GramPanchayatElectionResults | #गुलालकुणाचा | #DrChitraKurhe | @Prksh_Ambedkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2021
संबंधित बातम्या:
स्वीडन ते दिग्रसवाणी, डॉ. चित्रा कुऱ्हेंची ग्रामपंचायतची विजयी कहाणी
(Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Sheetal Sahare Victory rally video viral on social media)