धुळे : धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या. परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवडी येथे दोन जावांमध्ये लढत पाहायला मिळाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. कारण इथे दोन जावांमध्ये थेट लढत होती. आज निकाल लागल्यानंतर आशा रवींद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून, त्यांना एकूण 364 मतं मिळाली आहेत. मोठ्या जाऊबाईंनी धाकट्या जाऊबाई वृषाली पाटील यांचा पराभव केला. वृषाली पाटील यांना 267 इतकी मतं मिळाली. (two sister in law contested election elder one won)
राजकारणात कोण कोणाच्या विरोधात शड्डू ठोकेल याचा काही नेम नाही. यंदा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही अशी काही उदाहरणं समोर आली, ज्यामुळे काही ग्रामपंचायती विशेष चर्चेत आल्या. शिरपूर तालुक्यातील दहिवडी येथे आशा रवींद्र पाटील आणि वृषाली पाटील या दोन जावा चक्का एकमेकांविरोधत उभ्या राहिल्या.
दोघींनीही एकमेकांवरिरोधात जंगी प्रचार केला. गावाच्या विकासासाठी आपणच कसे कटिबद्ध आहोत, हे पटवून सांगण्याचा प्रयत्न दोन्ही जावांनी केला. त्यांनतर येथे 16 जानेवारी रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल आज लागला. ज्यामध्ये मोठ्या जाऊ आशा पाटील यांनी आपल्या लहान जाऊबाईं वृषाली पाटील यांना पराभूत केले. मोठ्या जाऊबाईंना 364 मतं मिळाली तर धाकट्या जाऊबाई वृषाली पाटील यांनी 267 मिळाले. दहिवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या दोन्ही जावा एकमेकांविरोधात उभ्या राहिल्यामुळे या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यांनतर आता मोठ्या जाऊबाई यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात 26,178 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण 46,921 प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.
संबंधित बातम्या :
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : आ. अमोल मिटकरींच्या गावात कोण जिंकलं?, कोण हरलं?
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?
(two sister in law contested election elder one won)