अरे उठा इथून… कराडच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांना अजितदादांनी हुसकावले?

| Updated on: Jan 13, 2025 | 1:00 PM

हार्वेस्टर घोटाळ्याची कल्पना अजित पवार यांना देऊनही काही उपयोग झाला नाही, असा गंभीर आरोप फसवणूक झालेल्या यंत्रमालकाने केला आहे. वाल्मिक कराड आणि त्याचा दोन साथीदारांनी अनुदान म्हणून शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे

अरे उठा इथून... कराडच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या शेतकऱ्यांना अजितदादांनी हुसकावले?
Follow us on

हार्वेस्टर घोटाळ्याची कल्पना अजित पवार यांना देऊनही काही उपयोग झाला नाही, असा गंभीर आरोप फसवणूक झालेल्या यंत्रमालकाने केला आहे. वाल्मिक कराड आणि त्याचा दोन साथीदारांनी अनुदान म्हणून शेतकऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. फसवणूक झालेले शेतकरी आता विविध शहरांतून समोर येऊ लागले आहेत. खंडणी, धमकीचा परळीचा पॅटर्न समोर येत असताना आता हार्वेस्टर अनुदान घोटाळ्याचे बीड कनेक्शन समोर आले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर हार्वेस्टर घोटाळ्याचे आरोप होत असून तो आणखी अडचणीत सापडला आहे. या आरोपांत तत्कालिन कृषीमंत्री धनंयज मुंडे हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची अजित पवारांना कल्पना होती, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, असा आरोपही फसवणूक झालेल्या यंत्रमालकाने केला आहे.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनीच सारा घटनाक्रम सांगून कराडसह सर्वांवरच आरोप केले आहेत. ऊसतोडणीच्या हार्वेस्टरचं थकलेलं अनुदान मिळवून देतो असं म्हणत कराडच्या साथीदारांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना खोटं आमिष दाखवलं, आणि 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेऊन नंतर मारहाणही केल्याचा आरोप होत आहे. 2024 साली सह्याद्री अतिथीगृहावर कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडसोबत झालेली बैठक, त्यानंतर नवी मुंबई आणि परळी येथील अनुसया हॉटेलमध्ये दिलेले पैसे, याचे फोटो , व्हिडीओही शेतकऱ्यांनी दिलेत.

वाल्मिक कराडने ऊसतोड शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एक जुना व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसचा आहे. या व्हिडीओत अनेक हार्वेस्टिंग मालक, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भेटताना दिसले. या हार्वेस्टिंग मालकांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची सह्याद्रीवर भेट घेतली होती. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

कृषीमंत्री माझ्या जवळचे आहेत, तातडीने अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मिकने शेतकऱ्यांना आमिष दाखवले होते. प्रत्येकी 8 लाख रुपये द्या असं म्हणून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप करण्यात आला. मात्र ते अनुदान अद्यापही मिळालेले नसून त्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाणही करण्यात आली, असाही आरोप लावण्यात आला आहे.

शेतकऱ्याने सांगितली आपबिती

हार्वेस्टर मशिनचे शासकीय अनुदान मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला प्रत्येक शेतकऱ्याने आठ लाख रुपये दिल्याचा आरोप अमर पालकर या शेतकऱ्यानं केला. 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहामध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडेंना भेटून ८ लाख रुपये देत असल्याची कल्पना देखील दिली होती. त्यावर मुंडेंनी लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ, असंही सांगितलं होतं. राज्यातील 141 हार्वेस्टर मालकांनी प्रती हार्वेस्टर 8 लाख रुपये वाल्मिक कराडला दिले. परळी आणि पनवेल मध्ये पैसै दिले. नवी मुंबईतील पनवेल येथील देवीस रेसियडन्सीमधील 17 नंबर रुममध्ये वाल्मिक कराड, नामदेव सानप, व जितु पालवे या तिघांकडे पैसै दिले, असं अमर पालकर यांनी सांगितलं. तिथले फोटोही आहेत, असं त्यांनी नमूद केलं.

अजित पवारांचा कानाडोळा ?

आरोपानुसार, सह्याद्री अतिथि गृहावरच 8 लाख रुपये देण्याचं ठरलं, मात्र कराडने त्यांना नवी मुंबईतील देवीस रेसिडन्सी या हॉटेलवर यायला सांगितलं. त्यांच्या दाव्यानुसार, याच हॉटेलमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने 8 लाख रुपये कराड आणि पालवे यांच्याकडे सुपूर्त केले. तर उरलेल्या शेतकऱ्यांनी परळीत जात वाल्मिक कराड आणि दुसरा साथीदार नामदेव सानप यांना हे पैसे दिले. ही सर्व रक्कम 11 कोटी 20 लाखांच्या घरात होती. अनेक महिने उलटूनही अनुदान मिळालं नाही. अनेक महिने लोटूनही पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांनी कराडकडे पैशांसाठी तगादा लावला, त्यावर अनेक शेतकऱ्यांना परळीत बोलावून त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आता शेतकरी करत आहेत.

या घटनेची स्वत: अजित पवारांना ही कल्पना आहे, अजित दादा यांच्या मतदारसंघातले 101-2 जणांचे त्यात पैसे आहेत. त्यांच्या कानावर या गोष्टी गेल्या आहेत, त्यांना कल्पना आहे, पण त्यांनी लक्ष दिलं नाही, विचारच केला नाही मात्र त्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.