बेळगाव : बेळगावमधील (Belgaum) हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. बेळगावात महाराष्ट्राच्या 5 वाहनावर हल्ला करण्यात आलाय. कन्नड रक्षण वेदिका (Kannad Rakshan Vedika) महाराष्ट्रविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnatak Simavad) पेटण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे. अशातच आता कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे.
कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली.तसंच हे गाड्यांसमोर आणि गाडीखाली झोपले महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेत्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्रातील मंत्री आज बेळगावला जाणार होते. पण आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून आजचा हा दौरा टाळण्यात आला. पण त्यानंतरही आज महाराष्ट्रातून गेलेल्या गाड्यांवर हल्ला करण्यात आलाय. त्यामुळे कर्नाटक सीमाप्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे.
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यामुळे हा प्रश्न शांततेत सोडवावा, यासाठी आज बेळगावला जाणं टाळलं. पण लवकरच आम्ही बेळगावला जाऊ, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शंभुराज देसाई हे दोन मंत्री बेळगावात जाणार आहेत.