मुंबई : राज्याच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. आज विविध घडामोडी घडत आहेत. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात राज्याला काय-काय मिळतं हे पाहणं महत्वाचं असेलच. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. सलग तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस ही सुनावणी होणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, अन् गावखेड्यात काय सुरू आहे, याचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. राज्याच्या समाजकारणात, राजकारणात, अर्थकारणात अन् मनोरंजन तसंच क्रीडा क्षेत्रात नेमकं काय घडतंय, याचा थोडक्यात आढावा आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. दिवसभरातील महत्वाच्या सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर….
खाद्यतेल स्वस्त, गव्हाचे सीलबंद पीठाचे पॅकेट स्वस्त
इतर पदार्थांची, वस्तूंची यादी फार मोठी
सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट पार कोलमडले
दूध, अंडी, ब्रेड आणि इतर वस्तूंचे भाव कधी होतील कमी
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबतही नागरिकांना हवाय दिलासा, वाचा बातमी
श्रीमंत उद्योजक भारत सोडून कुठे घेत आहेत आश्रय
देश सोडण्यामागची प्रमुख कारणं तरी कोणती
दहा वर्षांत 2 लाख 25 हजार भारतीयांनी सोडले नागरिकत्व
अजूनही अनेक जण वेटिंग लिस्टमध्ये, कधी थांबणार हे सत्र, वाचा बातमी
महागाई भत्त्यावर उद्या उमटणार मोहर
4 टक्के महागाई भत्ता मिळण्याची शक्यता
1 मार्च रोजी कॅबिनेटची बैठक होणार, त्यात निर्णयाची शक्यता
आता 38 टक्के नाही तर महागाई भत्ता 42 टक्क्यांवर, वाचा सविस्तर
इतक्या जणांनी पाकिस्तानचे घेतले नागरिकत्व
कंगाल पाकिस्तानमध्ये या कारणासाठी घेतला आश्रय
पाच वर्षांत इतक्या भारतीय नागरिकांनी सोडला देश
देश सोडण्यामागची ही आहेत प्रमुख कारणे, वाचा बातमी
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण
बुधवारी पुन्हा सुनवाणी होणार
मंगळवारी ठाकरे गट व शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद
याच आठवड्यात सुनावणी संपणार
नवी दिल्ली : बोम्मई केसमध्ये अपात्र आमदारांना मतदानाचा अधिकार होता – कौल,
सरकार हे बहुमतात आहे की नाही हे बहुमत चाचणीतच राज्यपाल ठरवू शकतात,
बोम्मई केसचा दाखला आम्हाला बांधील असल्याचे धीरज कौल यांनी युक्तिवाद केला आहे,
आमदारांच्या भूमिकेनंतर बहुमत चाचणी बोलावली असे कौल यांनी म्हंटलं आहे.
आमदारांनी समर्थन काढले, त्यानंतर बहुमत चाचणी
ठाकरे यांच्यांवर विश्वास नाही, असे आमदारांनी स्पष्ट केले होते
त्यानंतर राज्यपालांनी परवानगी दिली
ठाकरे गटाचे सर्व मुद्दे खोडून काढले
नवी दिल्ली : शिवसेनेने परवापर्यन्त युक्तिवाद संपवावा,
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या वकिलांना सूचना,
आज दुपारनंतर एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करणार,
ठाकरे गटाच्या वकिलांचे मुद्दे खोडून काढणार ?
याच आठवड्यात प्रकरण संपवायचं आहे- सरन्यायाधीस
शिवसेनेनं परवापर्यंत युक्तिवाद संपवावा- सरन्यायाधीश
शिवसेनेकडून नीरज कौल आज आणि उद्या युक्तिवाद करणार
सिब्बल म्हणतात, राज्यपालांना माहीत होते, ही फुट नाही
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी प्रतोद नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला
प्रतोद पदाची निवड बेकायदेशीर -कामत
अध्यक्षांच्या निर्णयाला कामत यांचा आक्षेप
१० व्या सूचीतील अधिकारांचा आमदारांकडून गैरवापर- सिंघवी
शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला- सिंघवी
ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं जाऊ शकतं- सिंघवी
शासनाच्या आदेशाला जिल्ह्यात केराची टोपली
पुसदच्या कातखेडा परीक्षा केंद्रावरून पोतीभर कॉपी जप्त
पुसदच्या उपजिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या भरारी पथकाची कारवाई
पुसदच्या कातखेडा येथील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रकार
7 वर्ग खोल्यातून कॉपी, गाईड, चिठ्य्या असे पोतीभर कॉपी जप्त
10 व्या सूचीतील अधिकारांची कक्षा ठरवावी- सिंघवी
सिंघवींकडून श्रीमंत पाटील केसचा दाखला
अपात्र झाल्यास पुन्हा निवडणूक लढवावी लागते- सिंघवी
आमदार अपात्र झाल्यास मंत्रीपदाची शपथ घेता येत नाही- सिंघवी
ठाकरे गटाचे वकील अभिषक मनु सिंघवी यांनी जुनेच अध्यक्ष आणण्याची मागणी केली
दहाव्या सूचीच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर
दहाव्या सुचीच्या अधिकाऱ्यांची कक्षा ठरवावी लागेल
पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीचे वाचन
ठाकरेगटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद
सिंघवी यांच्याकडून किहोटो केसच्या दाखल्याचं वाचन
पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींचंही सिंघवी यांच्याकडून वाचन
27 जूनची परिस्थिती जैसे थे हवी- सिंघवी
प्रकरण अध्यक्षांकडे सोपवायचं असेल तर जुन्या अध्यक्षांना परत आणा- सिंघवी
सुप्रीम कोर्टाने राज्यपालांच्या विरोधात अनादर नोटीस काढावी. राज्यपालांनी राजकीय हेतूने निर्णय घेतले. मविआ सरकार पाडण्यासाठी राज्यपालांच्या हालचाली होत्या – अभिषेक मनु सिंघवी
ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनुसिंघवींचा युक्तीवाद सुरू
सत्तासंघर्षावर आजपासून तीन दिवस सुनावणी
कांदा उत्पादक शेतकरी उतरणार रस्त्यावर…
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांचा रास्ता रोको…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन…
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर – मनमाड महामार्गावर रास्ता रोको..
पुरस्कार मिळणार म्हणून आनंदी होती अभिनेत्री…
नावाची घोषणा झाल्यानंतर पुरस्कार घेण्यासाठी धावली, पण त्यानंतर जे घडले ते धक्कादायक… वाचा सविस्तर
नाशिकची बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विरुद्द नागपूरच्या सेंट जॉन्स हायस्कूलमध्ये प्री-क्वार्टर फायनलचा सामना झाला. वाचा सविस्तर….
‘चला खेळूया फुटबॉल’, पुण्यात फुटबॉलचा थरार सुरु आहे. त्यासाठी खास जर्मनीहून फुटबॉलपटू आले आहेत. वाचा सविस्तर….
स्वस्तात सोने-चांदीची खरेदीची संधी
वायदे बाजारात सोने-चांदीवर दबाव
सराफा बाजारात सोने-चांदीच्या किंमतीत घसरण
उच्चांकी स्तरापेक्षा सोने-चांदीत मोठी तफावत
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव घ्या जाणून, वाचा बातमी
खारकोपरला जाणारी ट्रेनचा झाला अपघात
सकाळी 9 वाजताची घटना
ट्रेन नेरुळ येथून खारकोपरला जात होती
सकाळच्या सुमारास चाकरमानी ट्रेनमध्ये असताना घडला अपघात
व्हीप हा एक प्रकारचा चाबूक आहे आणि तो चाबूक एकनाथ शिंदे यांच्याकडे अजूनही आहे
कोर्टाच्या ऑर्डरमध्ये व्हीप लावू नका असं कुठेही म्हटलं नाही
वकील सिद्धार्थ शिंदे यांची माहिती
येत्या आठवड्यातच सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
आज अभिषेक मनु सिंघवी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद करणार
या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केलं ठार
कॉन्स्टेबलकडून 6 सिमकार्ड, 1 युपी पोलिसांचा गणवेश, 1 कार, 4 मोबाईल फोन जप्त
याशिवाय एक वायफाय राऊटर, बनावट शिक्के आणि बनावट आधार कार्डही जप्त
नागपूरच्या मेडिकलमध्ये वर्षभरात २३७ शिशूंचा मृत्यू
मेडिकलमध्ये नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण २.४६ टक्के
दरवर्षी का वाढतेय नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण?
मेडिकलमध्ये तीन वर्षांत ६१८ नवजात बालकांचा मृत्यू
माहिती अधिकारात धक्कादायक वास्तव पुढे
राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे हतबल आहे
सरकारला जागं करण्यासाठी 3 मार्चला आम्ही जन आक्रोश मोर्चा काढणार- रोहिणी खडसे
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार
शिंदे गटाच्या वकिलांकडूनसुद्धा युक्तीवाद होण्याची शक्यता
पुण्यात उद्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन
एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर
राज्य भरातून विद्यार्थी उद्या पुण्यात येणार
पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी बसणार उपोषणाला
सरकार जाणून बुजून आम्हाला त्रास देत आहे
सरकारने ताट वाढलं पण ते रिकामे ठेवलं
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार
आम्ही आंदोलनावर ठामच
विद्यार्थ्यांचा सरकार आणि आयोगाला इशारा
महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धनगेकर यांच्या विजयाचे बॅनर झळकले
पुण्याच्या सारस बागेजवळ बॅनर लावले होते ज्यात त्यांचा उल्लेख आमदार असा करण्यात आला होता
रात्रीतून हे बॅनर काढण्यात आले
चार महिन्यात श्वसनाच्या आजाराचे ५० टक्के रुग्ण वाढले
सिमेंट रस्त्यांची धुळ आणि वाहनांचं प्रदूषण ठरतेय डोकेदुखी
ॲाक्टोबर ते जानेवारी वाढलं नागपुरातील प्रदूषण
इंदूर कसोटीत फक्त एकट्या केएल राहुलवर दबाव नसेल, आणखी एक भारतीय प्लेयर आऊट ऑफ फॉर्म आहे. वाचा सविस्तर…..
‘चला खेळूया फुटबॉल’, आजपासून पुण्यात क्वार्टर फायनलचा थरार. वाचा सविस्तर…..
आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
राज्यातील प्रमुख शहरांतील इंधनाची किंमत किती
22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात
त्यानंतर देशात इंधनाच्या किंमतीत मोठी तफावत नाही, वाचा बातमी
फुलगोबीला भाव मिळत नसल्याने मधूकर शिंगणे असं शेतकऱ्याचं नाव आहे
एकरी 60 हजार रूपये खर्च करून शेती केली मात्र बाजारात पिकाला भावच नाही
शेवटी संतप्त होऊन शेतात मेंढ्याना चरायला सोडले
कोल्हापूर
पुरातत्व विभागाचे अधिकारी अंबाबाई मंदिरात दाखल
दोन अधिकाऱ्यांकडून अंबाबाई मूर्तीची केली जाणार पाहणी
अंबाबाई मूर्तीची अनेक भागात निश्चित झाल्याची धक्कादायक माहिती काल झाली होती उघड
माहिती समोर येताच पुरातत्त्व विभागाला आली जाग
पुरातत्व विभागाचे अधिकारी तातडीने अधिकारी तातडीने मंदिरात
लासलगाव (नाशिक) ब्रेकिंग
-कांदा लिलावाला झाली सुरुवात
-ठिकठिकाणाहून शेतकरी कांदा घेऊन दाखल
-कांद्याला किती भाव मिळतो, हे बघणे महत्त्वाचे
नोटीशीला 30 दिवसांत उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
पुढील 60 दिवसांत महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार ही कारवाई केली जाईल- राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ
पाच महिन्यात २०० गटाराच्या झाकनांची चोरी
मनपा आयुक्तांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश
माजी नगरसेवीका आभा पांडे यांनी दिली होती चोरीची तक्रार
झाकनं चोरीला गेल्यामुळे शहरातील २०० गटार उघडे
कसबा पोटनिवडणुकीसंदर्भातली भाजपच टेन्शन वाढवणारी बातमी
भाजपच्या बालेकिल्ल्यातच मतदान घटले
पोटनिवडणुकीत मतदान होताना प्रभाग क्रमांक 15 मध्ये पाच टक्के कमी मतदान झाले आहे
तर 16, 17, 18, 19 आणि 29 या प्रभागात मतदानाच्या टक्केवारीत अर्धा ते दोन टक्के फरक पडलेला आहे.
कसब्यात सर्वाधिक मतदार हे प्रभाग 15 मध्ये आहे
या प्रभागात 51.89 टक्के म्हणजे 37 हजार 237 टक्के मतदान झाले आहे.
गेल्यावेळेच्या तुलनेत 4 हजार 540 मतदान कमी झाले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट
त्यामुळे भाजपच्या बाले किल्ल्यातच कमी मतदान झाल्याने चर्चा सुरु
नाशिक : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने काल तब्बल 10 तास शेतकऱ्यांनी लिलाव केले होते ठप्प,
काल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली होती शेतकऱ्यांची भेट,
दादा भुसे यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचे दिले आश्वासन,
शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्याकडे केल्या सहा प्रमुख मागण्या.
एमपीएससी तांत्रिक विभागाच्या परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी उद्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर
पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी बसणार उपोषणाला
याआधी सरकारने केवळ राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू केला आहे
मात्र तांत्रिक परीक्षांचा विचार सरकारकडून केला गेला नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
आपल्या याच मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा एकदा उद्या पुण्यात आंदोलनाला बसणार आहेत
उद्या सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थी बसणार आंदोलनाला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तर राज्यातील 18 कारखान्यांचा हंगाम संपला,
कोल्हापूर जिल्ह्यातील 15 कारखान्यांचा हंगाम आता अंशता सुरु,
मार्चच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत सर्व कारखाने बंद होण्याचा अंदाज,
यावर्षी राज्यात 141 लाख मॅट्रिक टन उसाचं गाळप,
तर 163.39 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन,
गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाचं गाळप आणि उताऱ्यातही घट.
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या आठवड्यात तीन दिवस होणार सुनावणी,
आज ठाकरे गटाच्या वतीने वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार,
या आठवड्यात सुनावणी संपणार का ? संपूर्ण देशाचे लक्ष,
आज सकाळी साडेदहा वाजल्यापासून घटनापिठासमोर होणार सुनावणी.
नाशिक : मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका,
स्थानिक पातळीवर पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता,
तर दुसरीकडे श्रीकांत ठाकरे देखील आज नाशकात,
युवा सेनेच्या कार्यालयांचे करणार उदघाटन,
रोजगार मेळाव्याला देखील लावणार हजेरी,
दोन युवा नेते आज विविध कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये.
कोल्हापूर महानगरपालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले अखेर निलंबित
प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी काढले निलंबनाचे आदेश
घरफाळा विभागातील आर्थिक अनियमिता प्रकरणी संजय भोसले वर शुक्रवारी झाली होती अटकेची कारवाई
अटकेनंतर न्यायालयाने संजय भोसले याला 6 मार्चपर्यंत दिलीय न्यायालयीन कोठडी
घरफाळा घोटा आणि अनियमितता प्रकरणी आतापर्यंत पाच अधिकारी अनेक कर्मचारी निलंबित
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफळा विभागात एक कोटी 80 लाखाची अनियमिता असल्याचा माजी नगरसेवक भोपाल शेट्टी यांनी केला होता आरोप
संजय भोसले यांच्यावर 46 लाख 23 हजाराची जबाबदारी महापालिकेने केलीय निश्चित
लासलगाव बाजार समितीत आज नियमित वेळेनुसार सुरू होणार कांद्याचे लिलाव
कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने काल तब्बल 10 तास शेतकऱ्यांनी लिलाव केले होते ठप्प
काल पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली होती शेतकऱ्यांची भेट
दादा भुसे यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्याचे दिले आश्वासन
शेतकऱ्यांनी दादा भुसे यांच्याकडे केल्या सहा प्रमुख मागण्या
कसबा विधानसभा मतदारसंघात निकाल आधीच दोन्ही गटाकडून विजयाची बॅनरबाजी
आधी रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर
तर आता हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून देखील पुण्यात बॅनरबाजी
पुण्यातील समाधान चौकात लागले हेमंत रासने यांच्या विजयाचे बॅनर
निकाल आधीच आमदार हेमंत रासने म्हणत समर्थकांकडून रासने यांना शुभेच्छा
तर काल पुण्यातील अनेक चौकात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे देखील बॅनर लावण्यात आले होते
पण आता हे विजयाचे बॅनर हटवण्यात आले असून
मात्र निकाला आधीच दोन्ही गटाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात येत आहे