Maharashtra Latest Breaking News Live : तब्बल सव्वा तासांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ला रवाना

| Updated on: Apr 12, 2023 | 8:55 AM

Maharashtra Live News : देश-विदेशातील बातम्या. तुमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि तुमच्या गावातील बातमी. वाचा टीव्ही 9 मराठीवर. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Maharashtra Latest Breaking News Live : तब्बल सव्वा तासांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे मातोश्रीला रवाना
Follow us on

मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर घडामोडींची शक्यता आहे. कोरोनाची रूग्णसंख्या वाढते आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय होतेय. भाजप नेते विनोद तावडे यांच्या आईचं आज निधन झालं आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह राज्यातील महत्वाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला इथे वाचायला मिळतील. तसंच क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील बातम्याही तुम्ही इथे वाचू शकता. त्यामुळे दिवसभर ताज्या अपडेट्ससाठी टीव्ही 9 मराठीला फॉलो करा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Apr 2023 08:58 PM (IST)

    शहापूर तालुक्यात दोन ठिकाणी वीज पडली

    झाडाखालील तीन जनावरांचा मृत्यू; झाडाने घेतला पेट

    एका दहा वर्षीय मुलीला वीजेचा झटका लागल्याने जखमी

  • 11 Apr 2023 07:45 PM (IST)

    माविआतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी भेट

    शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट होणार

    उद्धव ठाकरे स्वत: शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार

    या दोन्ही बड्या नेत्यांची रात्री आठ वाजता भेट होणार असल्याची माहिती समोर

    माविआतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद

    मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीचं म्हणणं, तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं


  • 11 Apr 2023 07:41 PM (IST)

    सततच्या अवकाळीमुळे होणारे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    धाराशिव :

    – घरात बसून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावं लागतं

    -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरे पिता-पुत्रावर टीका

    – शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले म्हणून मी पहायला आलो

    – शेतकरी हा प्रचंड उध्वस्त झाला आहे. त्यामुळे मी स्वतः येथे आलो

    – नुकसान भरपाई पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही.

    – सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही जे निर्णय घेतले ते शेतकऱ्यांच्या हिताचे.

    – एनडीआरएफचे नियम बदलून डबल मदत केली. नुकसान भरपाईचे क्षेत्र वाढवले.

    – सततच्या अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान आम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले.

  • 11 Apr 2023 07:37 PM (IST)

    थोड्याच वेळात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार

    माविआतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी भेट

    सिल्व्हर ओकवर दोन्ही नेत्यांची होणार भेट

  • 11 Apr 2023 06:44 PM (IST)

    सावरकरांनी माफी मागितली यामध्ये सावरकरांचा अपमान नसून ती वस्तुस्थिती; भालचंद्र मुणगेकर

    – सावरकर जेलमध्ये असताना त्यांचे आणि कुटुंबियांचे जे हाल झाले त्याबद्दल काँग्रेसला कृतज्ञता वाटते

    – काँग्रेसचे माजी खासदार आणि नियोजन समितीचे सदस्य डॉ. भालचंद्र मुनगेकर यांचे विधान

    – सावरकरांचा मुद्दा हा महाविकास आघाडीचा अजेंडा नाही, त्यामुळे सावरकरांच्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट

    – मी सावरकर नाही, मी गांधी आहे असं राहुल गांधी म्हणाले

    – सावरकरांनी जशी माफी मागितली तशी मी माफी मागणार नाही असंही राहुल गांधींनी स्पष्ट केलं

    – सावरकरांनी माफी मागितली यामध्ये सावरकरांचा अपमान नसून ती वस्तुस्थिती

    – याचा अर्थ सावरकरांनी 1911 मध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सेल्युलर जेलमध्ये जाणे ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही.

    – पण त्या सर्व प्रक्रियेमध्ये सावरकरांनी सहा वेळा माफी मागितली ही सुद्धा वस्तुस्थिती

  • 11 Apr 2023 06:41 PM (IST)

    हसन मुश्रीफ यांना तूर्तास अंतरिम दिलासा

    मुंबई हायकोर्टात आजच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी अंतरिम दिलासा देण्याची मागणी मान्य

    मुंबई सत्र न्यायालयाने 3 दिवसांचं अंतरिम दिलासा केला मान्य

    14 एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांच्यावर कुठलीही  कारवाई न करण्याचा सत्र न्यायालयाचा ईडीला निर्देश

    मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा बाबत निकाल दिल्यानंतर अॅड. आबाद पोंडा कोर्टरूममध्ये दाखल

    मुंबई हायकोर्टात अपील करण्यासाठी त्वरीत ऑर्डर कॉपी मिळण्याची केली मागणी

    न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी केली त्वरीत मान्य

    मुश्रीफ यांचे आणि  ईडी वकिलांना देताय त्वरीत डिजिटल ऑर्डर

  • 11 Apr 2023 06:40 PM (IST)

    पुण्यात मेघगर्जनेसह रिमझिम अवकाळी पावसाला सुरुवात

    पुणे :

    – पुण्यात मेघगर्जनेसह रिमझिम अवकाळी पावसाला सुरुवात

    – कात्रज,सिहगड रोड परिसरात पाऊस सुरू

    – पुण्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे

    – अवकाळीचे ढग दाटून आल्यानंतर शहरात विविध ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालीय

    – अचानक सुरू झालेल्या ह्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली

    – दिवसभराच्या उकड्यापासून पुणेकरांना दिलासा

  • 11 Apr 2023 06:39 PM (IST)

    वायनाडमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो

    केरळ :

    वायनाडमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो

    प्रियंका गांधीही रोडशो मध्ये सहभागी

    संसदेमधील निलंबनानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी वायनाड मध्ये दाखल

    राहुल गांधी यांच्या रोड शोला मोठा प्रतिसाद

     

     

  • 11 Apr 2023 06:20 PM (IST)

    पुण्यातील उपनगरांमध्ये पावसाची हजेरी

    सिंहगड रोड कात्रज धायरी परिसरात पावसाच्या रिमझिम सरी

    पुण्यात आज आणि उद्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आला होता

    दिवसभर उघडल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मात्र शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात

    उकाड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा

  • 11 Apr 2023 05:21 PM (IST)

    हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं ठरणार महत्त्वाचं

    महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा कोर्टाने सर्वात मोठा झटका दिला आहे.

    हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

    मुंबई सेशन्स कोर्टाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला

    सेशन्स कोर्टाच्या या निकालानंतर आता हसन मुश्रीफ मुंबई हायकोर्टात जातात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार

    हसन मुश्रीफ हे सध्या ईडी कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे.

  • 11 Apr 2023 05:20 PM (IST)

    नांदेड दंगल प्रकरणाचा निकाल लागला, माजी आमदार, त्यांच्या पुत्रासह 18 जणांना सक्तमजूरी

    नांदेड :

    नांदेडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनातील अनेकांना सक्तमजूरीची शिक्षा

    या प्रकरणी शिवसेनेच्या माजी आमदार अनुसया खेडकर आणि त्यांचे पुत्र महेश खेडकर यांच्यासह 19 जणांना सक्तमजूरी

    सरकारी मालमत्तेचे करण्यात आले होते नुकसान

    अनेक पोलीस, नागरिकही झाले होते जखमी

    राज्य परिवहन मंडळाच्या 8 बसचे झाले होते नुकसान

  • 11 Apr 2023 05:11 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का

    मुंबई सत्र न्यायालयाने हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

  • 11 Apr 2023 04:44 PM (IST)

    कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना

    पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला पतीने शिवीगाळ करत केली मारहाण

    सनकी पती पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला चावला

    दोन्ही पोलीस कर्मचाऱ्याला केली मारहाण

    कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मारहाण करणाऱ्या महेश माने याला पोलिसांनी केली अटक

  • 11 Apr 2023 04:16 PM (IST)

    नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाडी बामणी गावामध्ये दाखल

    धाराशिव जिल्ह्यातील वाडी बामणी या गावामध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाडी बामणी गावामध्ये दाखल

    ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे देखील वाडी बामणी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित आहेत

     

  • 11 Apr 2023 04:09 PM (IST)

    कोरलई गावचे माजी सरपंच यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली

    किरीट सोमय्या यांनी रश्मी उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले घोटाळा आरोप केल्यानंतर पोलिसांची चौकशी सुरु असताना प्रसाद मिसाळ यांना ताब्यात घेण्यात आले होते.

    दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला होता.

    पोलिसांनी सात दिवसाची मागितली होती.

    कोठडी न्यायालयाने दोन दिवसाची दिली कोठडी

  • 11 Apr 2023 03:41 PM (IST)

    यंदा देशात कसा असणार पाऊस

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा देशात 96 टक्के पाऊस पडणार आहे. यापूर्वी स्कायमेटने वेगळा अंदाज काढला होता. परंतु तो आयएमडीने खोडला आहे.

    सविस्तर वाचा

  • 11 Apr 2023 03:31 PM (IST)

    राहुल गांधी वायनाडमध्ये दाखल

    निलंबनानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच स्वतःच्या मतदारसंघात

    सावरकरांबाबतच्या वक्तव्याचे पोस्टर्स वायनाडमध्ये

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचाविरोध असतानाही काँग्रेसकडून वायनाडमध्ये पोस्टरबाजी

    मी सावरकर नाही मी माफी मागणार नाही या आशयाचे वायनाडमध्ये पोस्टर्स

    राहुल आणि प्रियांका गांधी यांची थोड्याच वेळात रॅली आणि रोडशो

  • 11 Apr 2023 03:08 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशीव दौऱ्यावर

    उस्मानाबादचे नामांतर धाराशीव झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच धाराशीव दौऱ्यावर येत आहेत

    धाराशीव जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री धाराशीव दौऱ्यावर

    धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मोर्डी, धारूर, वाडी बामणी गावातील नुकसानीची पाहणी करणार

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री साधणार संवाद

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुळजापूर येथील हेलिपॅडवर दाखल

  • 11 Apr 2023 02:34 PM (IST)

    ‘खरा मुख्यमंत्री कोण गद्दार की गद्दारी करायला लावणारा’

    आदित्य ठाकरेंचा अप्रत्यक्ष देवेंद्र फडणवीसांना टोला

    राजकारणातून ठाकरे परिवाराला भाजपला संपवायचंय- आदित्य ठाकरे

  • 11 Apr 2023 02:31 PM (IST)

    शेतकऱ्यांनी केला मार्ग बंद

    अंबरनाथमध्ये शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोड या राज्य महामार्गाची एक मार्गिका बंद केली आहे. १९७२ साली झालेल्या भूसंपादनात एमआयडीसीनं एक जागा संपादित केल्याचं दाखवून दुसऱ्याच जागेवर रस्ता आणि पाईपलाईन टाकली. त्यामुळं दोन्ही जागा मागील ५० वर्षांपासून अडकून पडल्याचं सांगत शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी एमआयडीसीला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या कालावधीत प्रश्न न सुटल्यास पूर्ण राज्य महामार्ग बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

  • 11 Apr 2023 01:56 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांचा खुलासा

    माझ्या बोलण्याचा ध चा मा केला गेला

    बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर

    बाळासाहेबांमुळेच मुंबईतील हिंदू जिवंत राहिला

    बाबरी मशीद पाडताना सर्व हिंदू होते

    ढाचा पाडताना सर्व हिंदू होते

  • 11 Apr 2023 01:52 PM (IST)

    सोलापूरच्या विस्कळीत पाणी प्रश्नावर भाजपा आक्रमक

    सोलापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर मटका फोडत आंदोलन

    भाजपाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी एकत्र येत प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी

    सोलापुरात अनियमित आणि दूषित पाणी पुरवठा होतोय त्यामुळे भाजप आक्रमक झालीय

    ऐन उन्हाळा आणि सणासुदीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त

    भाजपच्या वतीने महापालिका प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत मटका फोडो आंदोलन करण्यात आले

  • 11 Apr 2023 01:11 PM (IST)

    उद्धव ठाकरेंची मागणी

    – चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या किंवा शिंदेंनी राजीनामा द्यावा – उद्धव ठाकरे

    – बाळासाहेबांच महत्व कमी करण्याची भाजपाची चाल – उद्धव ठाकरे

    – मनावर ठेवलेला दगड भाजपाला जड होतोय – उद्धव ठाकरे

    –  यांचं गोमुत्रधारी हिंदुत्व काही कामाच नाही – उद्धव ठाकरे

    – यांचं बुरख्याच रुप लोकांसमोर येऊ लागलय – उद्धव ठाकरे

  • 11 Apr 2023 01:09 PM (IST)

    भरकटलेला जनता पक्ष बाळासाहेबांचा अपमान करतोय – उद्धव ठाकरे

    – ‘भरकटलेला जनता पक्ष बाळासाहेबांचा अपमान करतोय’

    – ‘आता कुणाला जोडे मारणार, की स्वत:च थोबाड फोडणार’

    – उद्धव ठाकरेंचा सवाल

     

  • 11 Apr 2023 01:08 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी केली शिंदे यांची मिमिक्री

    उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करुन केली टीका

    कल्याणमध्ये शिंदे यांनी काय केले होते ते मिमिक्री करुन सांगितले

    आता शिंदे यांनी युती तोडावी, अन्यथा बाळासाहेब यांचे नाव घेऊ नये

    एकतर चंद्राकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा शिंदे यांनी राजीनामा द्यावा

    बाबरी मशीद पाडली जात असताना हे शांत बसले होते

  • 11 Apr 2023 01:06 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे – उद्धव ठाकरे

    – उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे – उद्धव ठाकरे

    – बाळासाहेबांचा एवढा अपमान कधी झाला नव्हता – उद्धव ठाकरे

  • 11 Apr 2023 01:05 PM (IST)

    बाबरी शिवसैनिकांनीच पाडली

    बाबरी शिवसैनिकांनीच पाडली- उद्धव ठाकरे

    आता चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    चंद्रकांत पाटील यांनी लालकृष्ण आडवाणी यांचा व्हिडिओ ऐकावा

    बाळासाहेबांचा ऐवढा अवमान आतापर्यंत कोणी केला नाही

     

  • 11 Apr 2023 12:39 PM (IST)

    बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल

    थोड्याच वेळात येणार भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल
    विशेष सकारी वकील उज्वल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल
    मृत्यूदंड की जन्मठेप होणार याकडे जिल्हावासीयाचे लक्ष
    तब्बल नऊ वर्षानंतर हत्याकांडाचा निकाल आज येणार
  • 11 Apr 2023 12:33 PM (IST)

    रामनवमीच्या शोभायात्रेतील घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका

    रामनवमीच्या शोभायात्रेत देशभरात अनेक ठिकाणी वादावादी आणि हिंसा

    शोभायात्रेत झालेल्या घटनेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    येत्या 17 एप्रिलला होणार सुनावणी

    हिंदू फ्रंट फॉर जस्टिस संघटनेकडून याचिका दाखल

    देशभरात झालेल्या घटनांबाबत चौकशी करण्याची याचिकेद्वारे मागणी

  • 11 Apr 2023 12:06 PM (IST)

    RCB vs LSG 2023 : फक्त सामना, मैदान वेगळं, पण प्रसंग तोच, VIDEO मधून पहा Dhoni vs Karthik मधला मोठा फरक

    RCB vs LSG 2023 : ‘तू MS Dhoni नाहीस’, फॅन्सचा Dinesh Karthik वर संताप. कालच्या मॅचमध्ये दिनेश कार्तिकची चूक रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला भोवली. त्यामुळे फॅन्सच नाराज होणं स्वाभाविक आहे. वाचा सविस्तर….

  • 11 Apr 2023 12:05 PM (IST)

    DC vs MI 2023 : क्रिकेटचा देव मुंबईच्या मदतीला, दिल्ली विरुद्धच्या मॅचआधी एका प्लेयरला दिला मोलाचा सल्ला

    DC vs MI IPL 2023 : मुंबई इंडियन्सला यंदाच्या सीजनमधला पहिला सामना जिंकायचा असेल, तर एका खास प्लेयरने चांगला खेळ दाखवण आवश्यक आहे. त्याला आता खुद्द सचिन तेंडुलकरने मार्गदर्शन केलय. वाचा सविस्तर….

  • 11 Apr 2023 11:24 AM (IST)

    किचनमधील गोडवा हरवणार

    दरवाढीचा फटका, साखर झाली कडू

    उन्हाळ्यात साखरेला प्रचंड मागणी

    मात्र उत्पादनात झाली मोठी घसरण

    अतिरिक्त साखरेच्या निर्यातीच्या निर्णयाचा फटका

    सर्वसामान्य ग्राहक होईल आता हवालदिल, वाचा बातमी 

  • 11 Apr 2023 11:14 AM (IST)

    मुख्यमंत्री करणार पाहणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले झाले. कांदा पिक मातीमोल झाल्याचं पाहायला मिळते आणि शंभर शंभर वर्ष जुनी असलेली जी झाडं आहेत ती उन्मळून पडली आहेत. थेट मदतीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी उद्वीग्नता व्यक्त करत शेतकरी भावूक झाल्याचे चित्र आहे.

  • 11 Apr 2023 11:13 AM (IST)

    केटी आर राव आणि आदित्य ठाकरे यांच्यातली बैठक संपली

    – केटी आर राव आणि आदित्य ठाकरे यांच्यातली बैठक संपली.

    – केटी आर राव यांनी तेलंगणा मॉडेल आदित्य ठाकरेंना दाखवलं.

    – आदित्य ठाकरेंना सोडण्यासाठी केटी आर राव गाडीपर्यंत आले होते.

  • 11 Apr 2023 10:40 AM (IST)

    मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करणार

    या गावात कांदा पिकांचे मोठं नुकसान

    2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान

    नुकसानग्रस्त शेतकरी सोबत आहेत

  • 11 Apr 2023 10:38 AM (IST)

    राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होणार?

    समाज माध्‍यमांमधून राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होणार अशा पोस्ट व्हायरल झाल्यानंतर विखे पाटील यांनी याबाबत आपली भुमिका स्पष्ट केलीय..हे माझ्या बदनामीच षडयंत्र असुन सदर वृत्‍त हे कपोलकल्‍पीत असल्याच विखे पाटील यांनी म्हटले आहे

  • 11 Apr 2023 10:37 AM (IST)

    केटीआर राव आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक सुरू

    केटीआर राव आणि आदित्य ठाकरे यांच्यात बैठक सुरू

    राजकीय घडामोडीवर चर्चेची शक्यता

    बीआर एस पक्षानं महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे

    के सी आर राव मुख्यमंत्री भाजपविरोधात संघटन तयार करतायेत

    आजची आदित्य ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

  • 11 Apr 2023 10:31 AM (IST)

    सोने-चांदीचा लेखाजोखा

    मालामाल केले 100 दिवसांत

    ग्राहक अवघ्या तीन महिन्यात श्रीमंत

    सोने-चांदीने इतका भरमसाठ दिला परतावा

    इतर गुंतवणूक पर्यांयापेक्षा दोन्ही धातूंमुळे कमाई, वाचा बातमी 

  • 11 Apr 2023 10:03 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार

    वनकुटे गावातील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री संवाद साधणार

    दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि घराचं मोठं नुकसान

  • 11 Apr 2023 09:43 AM (IST)

    RCB vs LSG 2023 : टीम इंडियातून बाहेर गेल्यानंतरही नाही सुधरला ‘हा’ खेळाडू, आता IPL मधील करियरही संकटात

    RCB vs LSG IPL 2023 : टीमसाठी संकटमोचक ठरण्याऐवजी ओझ ठरतोय. त्यामुळे त्याला चालू आयपीएल सीजनमध्येही बेंचवर बसावं लागू शकतं. वाचा सविस्तर….

  • 11 Apr 2023 09:42 AM (IST)

    DC vs MI IPL 2023 Preview : पहिल्या विजयासाठी आज Mumbai Indians च्या टीममध्ये काय बदल होतील?

    DC vs MI IPL 2023 Preview : पराभवाची मालिका तोडण्यासाठी रोहित शर्मा आज काय करणार? मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना मागचा सीजन आठवत असेल. मागच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात अशीच झाली होती. वाचा सविस्तर….

  • 11 Apr 2023 09:30 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे धमकीचा कॉल

    “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” बोलून कॉल कट

    डायल ११२ ला प्राप्त झाला कॉल

    सोमवारी रात्री डायल ११२ वर फोन करून दिली धमकी

    वारजे, पुणे येथून कॉल आल्याचं लोकेशन द्वारे उघड

    कॉलर शात्री नगर, धारावीत राहणारा

     

  • 11 Apr 2023 09:30 AM (IST)

    सोने-चांदी खरेदीची आज सुवर्णसंधी

    दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ

    सलग दोन दिवसांपासून भाव वाढीला ब्रेक

    जानेवारी ते मार्च पर्यंत दिला जोरदार परतावा

    सोन्याने दिला 8 टक्के रिटर्न, तर चांदीमुळे चांदी

    सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढण्याची शक्यता, एका क्लिकवर बातमी

  • 11 Apr 2023 09:28 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवणार असल्याचा फोन

    पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर आला फोन

    फोन पुणे येथील वारजेमधून कॉल आला

    मी एकनाथ शिंदे यांना उडवणार असा कॉल ११२ क्रमांकावर कॉल केला

  • 11 Apr 2023 09:21 AM (IST)

    यंदा सरासरीच्या केवळ 94 टक्केच पाऊस- स्कायमेटचा अंदाज

    यावर्षी देशात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज

    स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार जुन ते सप्टेंबर 858 मिमी पावसाची शक्यता

    देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तुट राहण्याची शक्यता

  • 11 Apr 2023 09:13 AM (IST)

    Jyotiba Phule Jayanti 2023 : या सरकारची मोठी घोषणा, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीला सार्वजनिक सुट्टी

    Jyotiba Phule Jayanti 2023 : या सरकारची मोठी घोषणा, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीला सार्वजनिक सुट्टी

    या राज्यात महात्मा फुले जयंतीची सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे, त्यामुळे त्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या आता 30 झाली झाले.

  • 11 Apr 2023 08:56 AM (IST)

    ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज हैदराबाद दौऱ्यावर

    थोड्या वेळात बेगमपेठ विमानतळावर होणार आगमन

    तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची घेणार भेट

    तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांचं मोठं प्रस्थ

    गीतम विद्यापीठात आदित्य ठाकरे करणार विद्यार्थ्यांना संबोधित

    विद्यापीठातर्फे आदित्य ठाकरेंच युवा राजकारणी म्हणून आयोजित संवाद कार्यक्रम

  • 11 Apr 2023 08:50 AM (IST)

    रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार

    रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार

    मुंबई गोवा महामार्गावरील पहिला टोल नाका

    राजापूर तालुक्यातील हातिवले इथला टोल आज सकाळपासून सुरू

    22 डिसेंबर ला स्थानिकांच्या विरोधामुळे टोल वसुली केली होती बंद

    छोट्या गाड्यांसाठी मोजावे लागणार तब्बल 90 रुपये

    तर छोट्या गाड्यांच्या रिटर्न जर्नी साठी मोजावे लागणार 130 रुपये

  • 11 Apr 2023 08:43 AM (IST)

    राज्यात काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव

    परभणी, नांदेडसह औरंगाबादमध्ये दर महागले

    औरंगाबादमध्ये डिझेलच्या किंमतीचा रेकॉर्ड

    कच्चा तेलामुळे अनेक देशांचे बजेट बिघडणार

    इंधनाची 100 डॉलरकडे आगेकूच

    भारतावर होणार मोठा परिणाम

    पेट्रोल-डिझेल150 रुपये लिटर होणार? वाचा बातमी 

  • 11 Apr 2023 08:42 AM (IST)

    राहुल गांधी आज केरळ दौऱ्यावर

    वायनाडमध्ये होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा

    राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधीही केरळ दौऱ्यावर

    लोकसभा सदस्यत्व गेल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी मतदारसंघात

    वायनाडमध्ये आज जाहीर सभा आणि रोड शोचे आयोजन

  • 11 Apr 2023 08:29 AM (IST)

    RCB vs LSG 2023 : Virat Kohli ने ‘त्या’ 10 चेंडूंमध्ये RCB च्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली? सायमन डूलकडून प्रश्नचिन्ह

    विराट आणि अन्य फलंदाजांच्या बॅटिंगमध्ये काय अंतर होतं? त्यामुळे विराट कोहलीच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. वाचा सविस्तर…..

  • 11 Apr 2023 08:28 AM (IST)

    RCB vs LSG 2023 : नजर हटली, दुर्घटना घडली, Dinesh Karthik ची चूक RCB ला भोवली

    RCB vs LSG IPL 2023 : RCB चा लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या पराभवासाठी दिनेश कार्तिकला जबाबदार धरलं जातय. त्याने अशी काय चूक केली? वाचा सविस्तर….

  • 11 Apr 2023 08:13 AM (IST)

    राज्यात पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा

    पुणे

    राज्यात पाच दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा

    वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार

    पुणे वेधशाळेचा अंदाज

    मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील, हवामान विभागाचा अंदाज हवामान

    राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम

    उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

  • 11 Apr 2023 08:06 AM (IST)

    अनुदान वाटप करण्यात जिल्हा उद्योग केंद्र राज्यात प्रथम

    नाशिक ब्रेकिंग

    -अनुदान वाटप करण्यात जिल्हा उद्योग केंद्र राज्यात प्रथम

    -वर्षभरात सुमारे 27 कोटी रुपयांच्या अनुदानाचे करण्यात आले वाटप

    -लाभार्थ्यांमध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश

    -मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून दिले जाते अनुदान

  • 11 Apr 2023 08:06 AM (IST)

    जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये तीस टक्क्यांहून कमी पाणीसाठा

    नाशिक ब्रेकिंग

    -जिल्ह्यातील नऊ धरणांमध्ये तीस टक्क्यांहून कमी पाणीसाठा

    -दहा प्रकल्पांमध्ये साठा टक्क्यांहून कमी पाणी

    -संभाव्य ‘अल निनो’ चे संकट बघता नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब

    -प्रमुख 24 धरणांमध्ये सरासरी 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध

  • 11 Apr 2023 08:00 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा लसीकरण बंद

    कोरोनाची लस येण्यास आणखी एक आठवडा लागणार

    अमरावती शहरासह जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असतानाच प्रतिबंधक लसीचा तुडवला

    जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र जवळपास बंद पडले आहे

    शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर गुरुवारपासून लस नसल्याने लसीकरण बंद असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे

  • 11 Apr 2023 07:54 AM (IST)

    नाशिकच्या वडाळा गावात गादीच्या कारखान्याला लागली आग

    नाशिक : सुमारे वीस ते पंचवीस लाख रुपयांचा माल जळून खाक,

    दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आली आटोक्यात,

    सुदैवाने जीवितहानी नाही.

  • 11 Apr 2023 07:54 AM (IST)

    अवकाळी पावसाने नाशिकमध्ये शेतीचं मोठं नुकसान

    अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील 8 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

    अकरा तालुक्यांतील 145 गावांमधील शेतकरी बाधित

    सटाणा तालुक्यातील सर्वाधिक 5 हजार 600 हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान

    राज्यात सर्वाधिक नुकसान झाले नाशिकमध्ये

    कांदा, गहू, द्राक्ष पिकांचे सर्वाधिक नुकसान