मुंबई : आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत आली होती. या पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं होतं. आज अखेर या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त प्रत्येक मतदान केद्रावर तैनात करण्यात आला आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मुरजी पटेल यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानं ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांवरून भाजप आक्रमक
मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
मालवणी परिसरातील अवैध घुसखोरांविरोधात कारवाईचे आदेश
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या
बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची मालाड मालवणी परिसरात वाढती संख्या
पोलीस विभागाने तात्काळ पावले उचलावीत
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले निर्देश
घुसखोरांना शोधण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर, शंकर वार, डीसीपी झोन ११ चे विशाल ठाकूर, शिधा वाटप अधिकारी राहुल साळुंखे यांची उपस्थिती
शिर्डीत कॉग्रेसच अधिवेशन झाल त्यानंतर मविआ सरकार पडेल – जयंत पाटील
आता राष्ट्रवादीच अधिवेशन झाल्यानंतर हे सरकार पडेल – जयंत पाटील
‘राष्ट्रवादी फुटणार नाही, राष्ट्रवादी राज्यातील सर्वात खंबीर पक्ष’
‘आपल्या गावचा असा पायगुन आहे हे स्वत:चं जाहीर करणं यासाठी खासदारांच कौतुक’
खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांची टीका
खा. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी फुटणार अस केल होतं वक्तव्य
शिर्डीत उद्यापासुन राष्ट्रवादीचे मंथन शिबीर
बैलगाडा संघटना आणि राज्य सरकार यांच्यात महत्वपूर्ण बैठक सुरू
महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू
बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी न्यायालयीन याचिकेच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक
23 नोव्हेंबर रोजी देशातील बैलगाडा शर्यतीबाबत सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी,
आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर बैठकीचे आयोजन
प्रताप सरनाईकांची 11 कोटींची संपत्ती ईडी ताब्यात घेणार
प्रताप सरनाईकांच्या संपत्तीवर ईडी टाच आणणार
यामध्ये ठाण्यातील 2 फ्लॅट, मिरारोड भागातील फ्लॅटचा समावेश
मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका फेटाळली
दिल्ली हायकोर्टानं समता पार्टीची याचिका फेटाळली
समता पार्टीला दुसरा दणका
यापूर्वीही करण्यात आली होती याचिका
समता पार्टी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
दक्षिण भारताला पुन्हा पावसाचा धोका
5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता
तामिळनाडू, केरळ, पोंडीचेरी भागात जोरदार पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याचा अंदाज
चौगुले यांच्या घराला लागली आग
घरामधील कुशनिंगचे साहित्य जळून खाक
लाखो रुपयाची झाली हानी
आग विझवण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न चालू
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
बच्चू कडू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना
राणांचं वक्तव्य साधारण मला वाद वाढवायचा नाही – बच्चू कडू
मतदारसंघाला निधी दिल्यानं आभार माणण्यासाठी फडणवीसांची भेट – बच्चू कडू
बच्चू कडू देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
राणांच्या वक्तव्यानंतर कडू फडणवीसांकडे नाराजी व्यक्त करणार
बच्चू कडू आज 11 वाजता मुंबईला रवाना होणार
पुढील दोन दिवस बच्चू कडू यांचा मुंबईत मुक्काम
दिल्ली हायकोर्टातल्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर होणार सुनावणी
समता पार्टीच्या याचिकेवर सुनावणी
यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळली होती
समता पार्टीने पुन्हा दुसऱ्यांदा याचिका दाखल
औरंगाबादमध्ये श्रीकांत शिंदे यांची सभा
सात नोव्हेंबरला होणार सभा
सभेच्या पूर्वतयारीसाठी मंत्री अब्दुल सत्तार घेणार बैठक
आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी सभा
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद
गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
निवडणूक चुरशीची होणार?
‘आप’देखील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात
विरारमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या 48 वर्षाच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू
संजय प्रकाश माळी असे त्यांचे नाव असून, विरार पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील चंदनसार चौकी या ठिकाणी ते कर्तव्यावर होते.
संजय माळी चौकीत आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झालेले.
त्यांच्या पक्षात पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे
मुंबई – गोवा महामार्गावर गव्याचे दर्शन
लांजा जवळच्या अंजणारी घाटात गवा
गव्याचा व्हिडिओ व्हायरल
गव्याचा मानवी वस्तीमधील वावर वाढला
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
साडेसहा वाजेपासून मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा
मतदान केंद्राबाहेर चोख पोलीस बंदोबस्त