मुंबई : आज दिनांक 7 नोव्हेंबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आज औरंगाबामध्ये सिल्लोड येथे सभा घेत आहेत. यानिमित्त सभास्थळी एक लाखांहून अधिक लोकांची गर्दी जमा होईल, असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. सभास्थळी जय्यत तयारी सुरु आहे. तर
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बुलढाण्यात सभा घेणार. आदित्य सभेवर ठाम. आदित्य ठाकरे आज अकोल्याच्या दौऱ्यावर. शेतकऱ्यांशी संवाद साधणार. पालघरमध्ये दोन बसची समोरासमोर धडक. 25 प्रवासी जखमी. जीवितहानी नाही.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांची सभा
अवघ्या थोड्या वेळातच होणार सभेला सुरुवात
सिल्लोड नगरपरिषदेच्या मैदानात होत आहे श्रीकांत शिंदेंची सभा
सभेला शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे देखील राहणार उपस्थित
नगर जिल्ह्यातून जाऊन दाखवा, तुमच्या गाड्या फोडणार, निलेश लंके यांचे सत्तार यांना आव्हान
महसूलमंत्री अब्दुल सत्तार हा एक सरडा आहे
सत्तार याने सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरला, त्याला सत्तेचा माज आला आहे
सत्तार तू लाल दिव्याच्या गाड्या घेऊन ये, तुझ्या गाड्या फोडून टाकेन. नगर जिल्ह्यातून जाऊन दाखवच
सत्तार राज्यातील महिलांच्यावतीने तुझा निषेध करतो, निलेश लंके यांनी ललकारले
ठाण्यातील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर करण्यात येत आहे आंदोलन
अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील तयार करण्यात आला आहे
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आंदोलन
मुख्यमंत्र्याच्या सुपुत्राने महागाई कमी करावी
आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषण करावे
शेतकऱ्यांना मदत देण्याची इच्छा या आजोबांनी व्यक्त केली आहे
आजोबा म्हणतात मी आणीबाणी पहिली पण एवढी महागाई पहिली नाही
इंदिराबाई गरिबांसाठी महागाई कमी करत होत्या
आजच्या सभेत मुख्य मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना मदत द्यावी एवढीच आजोबांची अपेक्षा
बेस्टमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा मनसेचा आरोप
त्याबाबत योग्य ती कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांना देणार निवेदन
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे काही वेळात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते व व्यापाऱ्यांचे आंदोलन
एका व्यापाऱ्याच्या दुकानात चोरी झाल्याने पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याचा व्यापारांचा आरोप
तर दुसरीकडे अडते व व्यापारी यांचं आंदोलन असल्याने शेतमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक
अमरावती बाजार समिती बंद, बाजार समितीत पोलिसांचा चोख बंदोबस्त
शेतमाल खरेदी होत नसल्याने बाजार समितीत आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा दिला होता इशारा
ट्रॅक्टर खरेदीच्यावेळी दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तीस देऊन फसवणूक केल्याची दिली होती तक्रार
भोकरदन येथील सोनालीका ट्रॅक्टर शोरूमने फसवणूक केल्याचे जिल्ह्याधिकारी यांना दिले होते निवेदन
संतोष पाटोळे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते बदनापूर तालुक्यातील आहेत
खरेदीच्यावेळी दिलेले धनादेश परस्पर दुसऱ्या व्यक्तींस देत फसवणूक केल्याचे म्हणणे
प्रकाश सुर्वे यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची सुपारी दिली?
प्रकाश सुर्वे यांच्या नावाने ऑडियो क्लिप व्हायरल
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येसाठी प्रकाश सुर्वे यांनी दिले पैसे?
ऑडियो क्लिप मधील दाव्यामुळे एकच खळबळ
मुख्यमंत्री प्रकाश सुर्वेंची चौकशी करणार?
श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी
सभेला एक लाख लोक येणार असल्याचा आयोजकांचा दावा
जिल्हा परिषद मैदानावर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची तयारी पूर्ण
सभेला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल राहणार उपस्थित
छगन भुजबळांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
कार्यालय जैसे थे ठेवण्याची केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नाशिकमधील सिडको कार्यालय बंद करण्याचा प्रशासनाने घेतला निर्णय
सिडको कार्यालय औरंगाबादला हलवण्याची प्रशासनाची तयारी
मात्र कार्यालय हलवण्यास भुजबळांचा देखील विरोध
– आज संध्याकाळी भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मध्ये प्रवेश करणार आहे
– तेलंगणामध्ये मोठा प्रतिसाद या यात्रेला पहावयास मिळत आहे.
– रात्री 9 वाजता नांदेडमध्ये राहुल गांधींची पदयात्रा सुरु होणार
सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वाचा निकाल
सरन्यायाधीशांसह पाच न्यायाधीशांच घटनापीठ निर्णय देणार
चारही न्यायाधीशांचे निर्णय वेगवेगळे
सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायाधीश माहेश्वरी यांचा एकत्रित निर्णय
बाकी तीन न्यायाधीशांचा वेगवेगळा निर्णय
बहुमत असेल तोच निर्णय अंतिम असणार
सरन्यायाधीश उदय ललित यांच्यासह न्यायाधीश रवींद्र भट, दिनेश माहेश्वरी, जे बी पार्डी वाला आणि बेला एम त्रिवेदी यांचा घटनापीठामध्ये समावेश
5 डीवायएसपी, 50 पोलीस अधिकारी आणि एसआरपीएफच्या एका तुकडीसह 450 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त
आदित्य ठाकरे संवाद दौरा आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
महा-ई सेवेप्रमाणे रेशनिंग दुकानात आता ह्या सर्व मल्टिपर्पज सुविधा मिळणार राज्य शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे
ह्या उपक्रमाची शहरा प्रमाणे ग्रामीण भागातील पुरवठा विभागाने तयारी सुरू केलीय
हे सेवा केंद्र सुरू करण्याआधी सेवा केंद्र कशा प्रकारे चालवायच त्याच रेशनिंग दुकांनधारकाना देणार प्रशिक्षण
श्रीकांत शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी
सभेला एक लाख लोक येणार असल्याचा आयोजकांचा दावा
जिल्हा परिषद मैदानावर श्रीकांत शिंदे यांच्या सभेची तयारी पूर्ण
सभेला अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल राहणार उपस्थित
आदित्य ठाकरे यांची बाळापूर शहरात शेतकरी संवाद यात्रा
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार
शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यादाच आदित्य ठाकरे पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर…
बॅटरीवर चालणाऱ्या हत्तींसाठी लागणारे उपकरण गेले चोरीला
इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यापूर्वी देखील चोरीच्या घटना
बोटॅनिकल गार्डन सध्या वनविभागाच्या ताब्यात
मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे चांगल्या प्रकल्पाचे नुकसान