Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 13, 2022 | 7:20 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

मुंबई : आज सोमवार, 12 डिसेंबर 2022. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण समारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणीही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यातील रस्ते अपघातांचं प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. सहलीला निघालेल्या बसचा अपघात झाल्याच्या दोन घटना रविवारी घडल्या. त्यातील एका अपघातात दोघे विद्यार्थी ठार झाले. या अपघाताच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Dec 2022 11:18 PM (IST)

    नवी मुंबई : पोलिसांनी जप्त केला 61 लाखांचा गुटखा

    महापे एमआयडीसी येथे आयशर ट्रकची पोलिसांकडून तपासणी

    चालक सागर गोहेल याची चौकशी करत घेतली ट्रकची झडती

    प्रतिबंधित असलेला तब्बल 61 लाख रुपयांचा गुटखा आढळला

    गुटख्याची अनधिकृत वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  • 12 Dec 2022 07:11 PM (IST)

    अहमदनगर : अवकाळी पावसाची हजेरी

    कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस

    सकाळपासून होते ढगाळी वातावरण

    सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात

    अर्धा तास दमदार पावसाची हजेरी

    अचानक आलेल्या पावसाने अनेकांची धावपळ

    अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना फटका


  • 12 Dec 2022 06:22 PM (IST)

    सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील 253 कोटी रुपयांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेला राज्य सरकारकडून मंजुरी

    सांगली 

    अखेर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील 253 कोटी रुपयांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेला राज्य सरकारकडून मंजुरी

    स्थायी समितीचे सभापती धिरज सूर्यवंशी यांची माहिती

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच या योजनेच्या कामाचा होणार शुभारंभ

    केंद्राकडून 84 कोटी राज्य सरकार 92 कोटी निधी देणार

    तर महापालिका 76 कोटींचा स्व हिस्सा देणार

  • 12 Dec 2022 06:17 PM (IST)

    सांगलीत 253 कोटी रुपयांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेला राज्य सरकारकडून मंजुरी

    सांगली :

    अखेर सांगली मिरज कुपवाड महापालिकेतील 253 कोटी रुपयांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेला राज्य सरकारकडून मंजुरी

    स्थायी समितीचे सभापती धिरज सूर्यवंशी यांची माहिती

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच या योजनेच्या कामाचा होणार शुभारंभ

    केंद्राकडून 84 कोटी. राज्य सरकार 92 कोटी निधी देणार

    तर महापालिका 76 कोटींचा स्व हिस्सा देणार

  • 12 Dec 2022 05:29 PM (IST)

    शिंदे – बोम्मई यांच्यात भेट

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात संवाद

    सीमा वादात पहिल्यांदा शिंदे आणि बोम्मई यांची भेट

    अहमदाबाद विमानतळावर झाली भेट

    गुजरातचे नवे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त होतो उपस्थित

    शपथविधीनंतर आपआपल्या राज्यात परत जात असताना शिंदे आणि बोंम्मई यांची विशेष कक्षात झाली भेट

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा होते उपस्थित

  • 12 Dec 2022 05:20 PM (IST)

    राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर

    पुणे : 

    – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर,

    – दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार,

    – पुणे दौऱ्यात राज ठाकरे वसंत मोरेंची भेट घेणार याकडे लक्ष,

    – आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची भेटीगाठी घेणार

  • 12 Dec 2022 03:54 PM (IST)

    सोने लुटण्याचा प्रयत्न फसला

    मुंबई : सोन्याची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने सोने चोरीचा प्रयत्न केला

    रोम्बे पोलिसांनी आरोपींचा हा डाव उधळून लावला

    सोन्याची किंमत दोन कोटी ४७ लाख ५० हजार इतकी आहे

    सोने घेऊन जाणाऱ्याचा फोन बंद येत होता

  • 12 Dec 2022 03:46 PM (IST)

    पोलीस ठाण्यातील सिलिंडर अचानक फुटला

    मुंबई : खेरवाडी पोलीस स्टेशनच्या भांडार कक्षमध्ये जप्त केलेला सिलिंडर अचानक फुटला.

    स्टोरेज रूममध्ये कार्यरत अधिकारी सहाय्यक पोलीस अरविंद खोत जखमी झाले.

    जखमी अरविंद खोत यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    ही घटना आज दुपारी 12.30 वाजता घडली.

    अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.

  • 12 Dec 2022 03:34 PM (IST)

    कणकवली ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या; नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची तक्रार

    कणकवली ग्रामपंचायत निवडणुकीत लोकशाहीची हत्या

    नितेश राणेंकडून निधीबाबत वक्तव्यामुळे खळबळ

    माझ्या आवडीचा सरपंच जर नाही निवडून नाही आला तर निधी देणार नाही

    नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

    राणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

  • 12 Dec 2022 03:15 PM (IST)

    धनुष्य बाण चिन्हा बाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू

    दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज

    निवडणूक आयोगात दहा ते बारा वकील उपस्थित

    शिंदे गटाकडून कुणीही लोकप्रतिनिधी निवडणूक आयोगात उपस्थित नाही

    ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई निवडणूक आयोगाच्या सुनावणीला उपस्थित

     

  • 12 Dec 2022 01:41 PM (IST)

    औरंगाबाद- माजी खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक

    – शहरात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या भव्य दिव्य वंदे मातरम सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

    – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घटन झाले होते.

    – मात्र या कार्यक्रमाला कोणीही शिवसेना पदाधिकाऱ्याला बोलवण्यात आले नव्हते

    – त्यामुळे आज पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन भारत मातेचे पूजन करून सभागृहात प्रवेश केला

     

  • 12 Dec 2022 01:34 PM (IST)

    जंगली महाराज रस्त्यावर राष्ट्रवादीचं धरणे आंदोलन

    पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचं धरणे आंदोलन

    जंगली महाराज रोडवरील झाशीच्या राणी पुतळ्याजवळ राष्ट्रवादीच मूक आंदोलन

    राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 12 Dec 2022 12:46 PM (IST)

    झोडगे येथे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला

    नाशिक : मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, बोरी अंबेदरी सर्मथनार्थ झोडगे येथे शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

  • 12 Dec 2022 12:26 PM (IST)

    परळी: जिथे कोणीच बोलण्याची हिम्मत दाखवित नाही तिथं मी बोलतेय- पंकजा मुंडे

    आजचे मौन कुण्या व्यक्ती विरुद्ध नाही

    अप्रिय घटना बद्दल आहे

     

  • 12 Dec 2022 12:09 PM (IST)

    टोइंग विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन

    नाशिक : टोइंग विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन.
    अगोदर पार्किंगची जागा द्या ,नंतर वाहने उचला आप ची मागणी, टोइंगच्या नावाखाली सुरू असलेली माफियागिरी बंद करण्याची देखील मागणी

  • 12 Dec 2022 11:07 AM (IST)

    अवैध धंद्यांवरील धडक कारवाई राज्यभर ठरतेय चर्चेचा विषय

    नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची अवैध धंद्यांवरील धडक कारवाई राज्यभर ठरतेय चर्चेचा विषय, गेल्या 40 दिवसातच तब्बल 749 गुन्हे दाखल तर 852 आरोपी अटक, एकूण 87 लाखांचा मुद्देमाल करण्यात आला हस्तगत, अवैद्य दारूचे सर्वाधिक गुन्हे.

  • 12 Dec 2022 11:03 AM (IST)

    अनिल देशमुख यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा

    मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh Bail News) यांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, ईडीनंतर आता सीबीआय प्रकरणातही अखेर जामीन मंजूर, कोर्टाचा अनिल देशमुख यांना मोठा दिलासा

  • 12 Dec 2022 10:30 AM (IST)

    पुण्यातील रिक्षाचालकांचे आज पुन्हा आंदोलन

    अल्टिमेटम देऊन देखील मागण्या मान्य न झाल्याने आज पुन्हा आंदोलन

    आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षाचालक संघटनेचे चक्का जाम आंदोलन,

  • 12 Dec 2022 10:24 AM (IST)

    स्लॅब कोसळून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

    पनवेल : सुखापूर येथे इमारतीचा स्लॅब कोसळून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

  • 12 Dec 2022 10:07 AM (IST)

    आगीत पार्किंग मधील 15 दुचाकी जळून खाक

    पिंपरी चिंचवड : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पार्किंग मधील 15 दुचाकी जळून खाक, पहिल्या मजल्यावर अडकलेल्या 3 मुलांसह चार जणांची आणि एका श्वानाची सुखरुप सुटका, त्रिवेणी नगर तळवडे येथील घटना

  • 12 Dec 2022 09:55 AM (IST)

    Instaवरून ट्रेडर इन्व्हेस्टर ला रिक्वेस्ट पाठवणे पडले महागात

    पिंपरी चिंचवड : इस्टग्रामवरून ट्रेडर इन्व्हेस्टर ला रिक्वेस्ट पाठवणे पडले महागात, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाची क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 71 हजारांची आर्थिक फसवणूक, हिंजवडीमधील घटना, के. सुरेश कट्टमंची असं फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव

  • 12 Dec 2022 08:56 AM (IST)

    अमित ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बोलावली विद्यार्थी सेनेची बैठक

    मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बोलावली विद्यार्थी सेनेची बैठक, आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या करणार नियुक्त्या, पदं मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच, अमित ठाकरे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी युवकांच संघटन करणार मजबूत.

  • 12 Dec 2022 08:51 AM (IST)

    शिंदे गुजरातच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार

    ठाणे : आज दुपारी गुजरात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शपथविधीला हजेरी लावणार, सकाळी 9.30 वाजता ठाण्यावरुन गुजरातसाठी रवाना होणार

  • 12 Dec 2022 08:16 AM (IST)

    संलग्न मेडिकल दुकानातून औषधे घेण्याची सक्ती नाही!

    पुणे :

    संलग्न दुकानातूनच औषधे घेण्याची सक्ती नाही, अन्न आणि औषध विभागाचा आदेश,

    रुग्णाच्या नातेवाईकांना संलग्न रुग्णालयातुन औषध घेण्याची सक्ती करता येणार नाही,

    सक्ती करणे नियमबाह्य असून रुग्णालयावर कायदेशीर करण्याची एफडीएची तंबी.

  • 12 Dec 2022 08:08 AM (IST)

    अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज फैसला

    मुंबई : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज फैसला, अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो का, याकडे राज्याचं लक्ष, सीबीआय प्रकरणात अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, याआधीच ईडीच्या प्रकरणी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

    पाहा व्हिडीओ :

     

  • 12 Dec 2022 08:05 AM (IST)

    खासगी बस अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू

    रायगड : खोपोली येथे बोरघाटात झालेल्या खासगी बस अपघातात दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू, खासगी क्लासची सहली घरी परतत असताना घडली दुर्दैवी घटना, वाचा सविस्तर वृत्त

  • 12 Dec 2022 08:04 AM (IST)

    ट्रेकरचा खोल दरीत पडून मृत्यू

    लोणावळा, पुणे : तैलबैल सुळक्यावर क्लाइम्ब करताना ट्रेकरचा पडून मृत्यू, सोमनाथ शिंदे असं ट्रेकरचं नाव, पहाटे सुळक्यावर क्लाइम्ब करताना पाय घसरून खोल दरीत पडून सोमनाथचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने ट्रेकरचा मृतदेह बाहेर काढला

  • 12 Dec 2022 07:29 AM (IST)

    मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव कंटेनरला आग

    नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरला आग, आश्विननगर पाथर्डी फाट्याजवळ अचानकपणे कंटेनरने घेतला पेट, चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर उडी मारल्याचे थोडक्यात जीव वाचला, आगीत ट्रकचं कॅबिन जळून खाक