आज 7 डिसेंबर. अनेक घडामोडी घडत आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकीचा निकाल आहे. मतमोजणीला सुरूवात (Delhi MCD Election Result Counting) झाली आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये काटें की टक्कर पाहायला मिळत आहे. तसंच राज्यातही विविध घडामोडी घडत आहेत. मुंबई, पुणे नाशिकसह अन्य जिल्ह्यातही घडणाऱ्या घडामोडींकडेही आपलं लक्ष असेलच. सगळे अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचायला मिळणार आहेत.
नवी दिल्ली :
महाविकास आघाडीचे खासदार उद्या पुन्हा आंदोलन करणार
संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील खासदार पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात
राज्यपाल हटाव मागणीसाठी खासदार आंदोलन करणार
खासदार विनायक राऊत हे उद्या पुन्हा स्थगन प्रस्ताव मांडणार
छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यपालांनी बदनामी केल्याप्रकरणी चर्चेसाठी खासदार राऊत स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांना देणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्या खासदार आंदोलन करणार – सूत्रांची माहिती
मुंबई
तुम्हाला एक बेळगावची नोटीस आली तर तुमची पॅन्ट पिवळी झाली
मला बेळगावमध्ये अटक झाली होती तरी मी नाही घाबरतो…
तुम्ही फक्त बोलतात पण एकनाथ शिंदे यांनी किती निर्णय घेतले हे नाही बघितलं
शिंदे आणि फडणवीस हे सक्ख्या भावासारखे काम करतात
आम्ही कधी घाबरलो नाही…
आणि ते बोलत आहेत की केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार म्हणून
जळगाव
कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या सीमावादाचा प्रश्न आता चिघळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांची टीका
महाराष्ट्राच्या वाहनांची कर्नाटकमध्ये तोडफोड
प्रांतवाद चिघळला असून त्यात समन्वयाचा अभाव
केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज
हा वाद वाढला पाहिजे, असं राज्य सरकारला वाटतं
महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडीगांनी आमच्यावर हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा
जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ, आंदोलन करू
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना माफी मागायला भाग पडू
पुणे :
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई
2 लाख प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली होती कारवाई
कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना दाखल झाली होती तक्रार
चार दिवसांपूर्वी दाखल करण्यात आला गुन्हा
आज पोलीस विभागाकडून करण्यात आलं निलंबन
Marathi News LIVE Update
हिमाचल प्रदेशात काँग्रेसमध्ये भूंकप
काँग्रेसच्या नेत्यांची हकालपट्टी
काँग्रेसमधून 30 नेत्यांवर कडक कारवाई
नेत्यांची 6 वर्षांसाठी पक्षातून केली हकालपट्टी
बेळगाव :
बेळगाव विमानतळावरची स्पाईस जेटची सेवा कायमस्वरूपी बंद
10 डिसेंबर पासून विमानसेवा बंद करण्याचा निर्णय
स्पाईस जेट कंपनीचा मोठा निर्णय
बेळगाव-दिल्ली, बेळगाव-बेंगलोर विमानसेवा ही कायमस्वरूपी बंद करणार
कंपनीच्या निर्णयामुळे प्रवाशांसमोर मोठं संकट
विमानसेवा बंद करण्याचे कारण अस्पष्ट
नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 2016 मध्ये नोटाबंदी चुकीच्या पद्धतीने घोषित करणाऱ्या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवलाय.
सर्व पक्षकारांना 2 दिवसांत लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले आहे
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटाबंदीच्या निर्णयाशी संबंधित प्रक्रियेची कागदपत्रे सीलबंद कव्हरमध्ये सुपूर्द करण्याची परवानगी दिलीय.
नोट बंदी बाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे देशाचं लक्ष
Marathi News LIVE Update
काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली
महाराष्ट्रातील वाहनांवर दगड फेक करणाऱ्यांवर कडक करावाई करणार
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना दिली माहिती
Marathi News LIVE Update
कोल्हापुरात माविआच्या नेत्यांची बैठक
सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय पाटील यांची उपस्थितीत
चंद्रकांत पाटील, शंभुराज देसाईंना बेळगावात जायचंच नव्हतं
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नी बैठकीत राज्य सरकारवर आगपाखड
मराठी भाषिकांच्या पाठीशी उभं राहण्याची रणनीती
कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची थोड्याच वेळात बैठक
आंदोलनाची दिशा ठरवणार
सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय पवार, विजय देवणे यांची उपस्थिती असणार
सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी रणनीती ठरवली जाणार
कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल घेणार ठोस निर्णय
बैठकीकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा तसेच सीमा वासियांचे लक्ष
नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथक नाशिकमध्ये
गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरूळ परिसरात घडली होती बलात्काराची घटना
द्विसदसीय पथकाने केली आश्रम शाळेची पाहणी, सोबत राज्य महिला व बाल विकास आयोगाचेही सदस्य
आश्रम शाळेच्या संचालकाने केला होता आश्रम शाळेतील ७ विद्यार्थिनींवर बलात्कार
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र शिनोळी बॉर्डर वर महाराष्ट्र- कर्नाटक वाहतूक सुरु
महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी
नाशिकच्या त्रंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला मिळणार सुरक्षा कवच
त्रंबकेश्वर चे 97 किलोमीटर क्षेत्र ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित
त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा देखील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र
त्रंबकेश्वरमधील ब्रम्हगिरी परिसरात मागच्या काही दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू होतं
प्रतिबंधित क्षेत्रात आता कोणतंही उत्खनन करता येणार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सह्याद्री अथितिगृहात मुंबईतील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक होणार
या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसदर्भात रणनिती ठरवील जाणार
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष येणारी मुंबई महापालिका निवडणुक एकत्र लढणार यांचे स्पष्टं संकेत
या युतीत आणखी कुणाला सहभागी करायचे, यावरही होणार चर्चा, अन्न मराठा संघटनांना सोबत घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस
कर्नाटक मध्ये गेलेल्या बस पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्या
कर्नाटक पोलीस व परिवहन खात्याने बस बंद ठेवण्याचे दिले आदेश
बसमधील प्रवाशांना अश्रू झाले अनावर
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे औरंगाबादमध्ये पडसाद
कर्नाटकाच्या बसला फासले काळे, भगव्या अक्षरात जय महाराष्ट्र लिहिले
उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासले
बस स्थानकावर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली
मध्यवर्ती बस स्थानकावर ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत कर्नाटकच्या बसला काळे फासले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून यावर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ
रेपो रेटमध्ये 0.35 टक्क्यांनी वाढ
आता रेपो रेट 5.90 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर
होम लोनसह सर्व प्रकारची कर्जे होणार महाग
एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीयाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र शिनोळी बॉर्डर वर महाराष्ट्र- कर्नाटक वाहतूक सुरु
महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाण्याऱ्या प्रत्येक वाहनाची कर्नाटक पोलीसांकडून कसून चौकशी
प्रदूषणामध्ये होत आहे वाढ
हवेची गुणवत्ता 326 AQI
मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात
जालन्यात आज कडकडीत बंद पाळला जाणार
महाविकास आघाडीकडून आज जालना बंदची हाक
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या निषेधार्थ पुकारला बंद
सकाळपासून जालना शहरातील अनेक दुकाने बंद
बंदचे अवाहन करण्यासाठी रॅलीला सुरुवात
रॅलीत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे सहभागी
जालना शहरात कडकडीत संप पाळला जातोय
कर्नाटक बँकेचे नावाला काळे फासत लिहिले जय महाराष्ट्र
तुमच्याही गाड्यांना काचा आहेत म्हणत स्वराज्य संघटनेचा इशारा ‘
कर्नाटक सरकारच्या विरोधात नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने केली जोरदार घोषणाबाजी
ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आंदोलन करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाचे खासदार दोन मागण्या करणार
राज्यपालांना हटवण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार
सीमा प्रश्नाबाबत चर्चा करण्याची मागणी ठाकरे गटाचे खासदार करणार
खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आंदोलन करणार – सूत्रांची माहिती
बेळगाव डेपोमधून निघालेल्या महाराष्ट्राच्या बसेस थांबवल्या
बेळगाव पोलिसांनी बसेस थांबवल्या
प्रवाशांना फुटले रडू गोवाहूण कलकुंद्री लग्न कार्याला जाण्यासाठी आले होते
त्यांना बेळगाव महारष्ट्र बस कर्नाटक पोलिसांनी आडवले
बससेवा पुन्हा बंद झाली
सभागृहात कर्नाटक महाराष्ट्रात सीमावादावरून निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा व्हावी
स्थगन प्रस्तावाची पाठवली नोटीस
पहिल्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार सभागृहात आक्रमक होणार
राजधानी दिल्लीकडे देशाच्या नजरा
आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये कांटे की टक्कर
दिल्लीच्या महापलिका सत्तेच्या चाव्या कुणाकडे? आज स्पष्ट होणार
दिल्ली महापालिका निवडणूक
महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू
सुरुवातीला 20 हजार पोस्टल मतांची मतमोजणी होणार
त्यानंतर इतर मतदारांच्या मतमोजणीला सुरुवात होणार
42 ठिकाणी होणार मतमोजणी
1349 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार