मुंबई : आज सोमवार, 21 नोव्हेंबर, 2022. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी आज प्रमुख संशयित आरोपी आफताब पुनावाला यांची नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात थंडीने कुडकुडला. कोणत्या जिल्ह्यात किती पारा घसरला आहे, याचा आढावा घेणारच आहोत. सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावरुन सुरु असलेल्या वादासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे आजही पडसाद उमटण्याची चिन्ह आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे रविवारी एकाच व्यासपीठावर होते. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संघर्षात ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. या पार्श्वभूमीवरही राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज औरंगाबाद मार्गे गुजरातला जाणार आहे. तर दुसरीकडे पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर आता नेमकी काय सुरक्षेची पावलं उचलली जातात, याकडेही आज लक्ष असेल.
औरंगाबाद :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज औरंगाबादेत मुक्काम
थोड्याच वेळात औरंगाबाद विमानतळावर दाखल होणार राहुल गांधी
हॉटेल रामा इंटरनॅशनल मध्ये करणार राहुल गांधी मुक्काम
उद्या सकाळी राहूल गांधी जाणार भारत जोडो यात्रेत
औरंगाबाद शहारातील मुकुंदवाडी चौकात राहुल गांधींचे होणार जंगी स्वागत
औरंगाबाद विमानतळावर राहुल गांधींच्या चाहत्यांची मोठी गर्दी
मुंबई :
I LOVE U रसना, हे वाक्य कुणी ऐकलं नसेल असं नाही
लहानांपासून मोठ्याना या रसनाने एकेकाळी वेड लावलं,
आजही रसना घराघरात मिळतं,
याच रसना कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे आज 85 व्या वर्षी निधन झाले
नवी दिल्ली :
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरण
हत्येप्रकरणातील सहा दोषींची सुटका करण्याच्या निर्णयावर काँग्रेस याचिका दाखल करणार
सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर रोजी सुटका करण्याचे निर्देश दिले होते
नलिनी श्रीहरनसह आरोपींची झालीय सुटका
केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल
आता काँग्रेस पक्षही दोषींच्या सुटकेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणार
उद्या 22 नोव्हेंबर रोजी 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये 93 सभांच आयोजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या चार सभा, जेपी नड्डा यांच्याही चार सभा
हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येकी तीन सभा
मनोज तिवारी, विनोद तावडे, कैलास चौधरी, रवी किशन यांच्याही होणार जाहीर सभा
उद्या एकाच दिवसात 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये जाहीर सभांचे आयोजन
इंडोनेशियात भूकंपाचे तीव्र झटके
भूकंपात 20 जणांचा मृत्यू, जवळपास 300 लोक जखमी
इंडोनेशियाच्या जावा बेटावर 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप
या परिसरात तीव्र उतार आहे आणि स्पीड गन बसवण्यात आले आहेत
मात्र अचानक स्पीड गन दिसल्यानंतर वाहनधारक गाडीचा स्पीड कमी करतात
मात्र गाडी कंट्रोल न झाल्यानं अपघात घडतात. कालही तोच प्रकार घडला
खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांबाबत होणार चौकशी
पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे विशेष अधिकार समिती, आज पुन्हा चौकशी
दुपारी 3 वाजता होणार लोकसभा सचिवालयात बैठक
खासदार राणा यांनी केलेल्या आरोपणबाबत आरती सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण द्यावं लागणार
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यां विरोधात नागरिक आले रस्त्यावर
पोलिसांनी सुरू केली नागरिकांची धरपकड
पेठ रोड वरील खड्ड्यांमुळे या रस्त्यावर अनेक अपघात
रस्त्यांवरील खड्ड्या विरोधात नागरिकांचा उद्रेक
मुंबई : आम्हाला तुमची काळजी, राहुल गांधी यांनी केली फोनवरुन संजय राऊत यांच्या तब्बेतीची विचारपूस, सध्या मुघलांच्या काळातलं राजकारण सुरु आहे, राऊतांचा विरोधकांना निशाणा, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं संजय राऊत यांच्याकडून भरभरुन कौतुक, सध्या राजकारणात कडवटपणा, राहुल गांधी यांनी केलेला फोन ही माझ्यासाठी प्रेमाची झुळूक- संजय राऊत
बीबी का मकबऱ्याच्या मिनाराचा कोपरा ढासळला..
जागतिक वारसा सप्ताह सुरू असताना मीनाराचा ढासळला कोपरा..
या घटनेनंतर पुरातत्त्व विभागाने मकबरा परिसर पर्यटकांसाठी केला बंद..
दीड वर्षांपूर्वी डागडुजी केले असतानाही ढासळला कोपरा..
रन वेच्या देखभाल दुरुस्तीचे या काळात होणार काम
4 डिसेंबरनंतर धावपट्टी उड्डाणासाठी होणार सुरू
कोणत्याही विमानाचे लँडिंग टेक ऑफ राहणार पूर्णपणे बंद
उद्योजक, पर्यटकांमध्ये मात्र नाराजी
आधीच अलायन्स एअर आणि स्टार एअरने सेवा केली आहे बंद
काँग्रेसकडून नवा विरोधी पक्षनेता कोण असणार , राजकीय वर्तुळात चर्चा
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा
दिग्विजय सिंह, जयराम रमेश यांची नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत
सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अंतिम निर्णय घेण्याची शक्यता
पुणे : नवले ब्रिजवरील वाहतूक पूर्वपदावर, नुकसान झालेल्या गाड्या बाजूला काढल्या,गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, एकूण 48 गाड्यांच्या अपघातात 10 जण जखमी
मुंबई : हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात हुडहुडी, तापमान 10.4 अंश सेल्सिअस वर, बोचऱ्या थंडीने गोंदियावासी हैराण
नवी दिल्ली : गुजरात मधील मोरबी पुल दुर्घटना, दुर्घटनेबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, न्यायालयीन चौकशी करण्याची याचिकेत मागणी, मोरबी पूल दुर्घटनेत 137 जणांचा झाला होता मृत्यू
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरण, संशयित आरोपी आफताबची आज नार्को टेस्ट होण्याची शक्यता, दिल्ली पोलीस करणार नार्को टेस्ट, नार्को टेस्टनंतर श्रद्धाच्या हत्येचे गूढ उकलण्याची शक्यता