मुंबई : आज गुरुवार, 24 नोव्हेंबर 2022. बुधवारी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळून आला होता. त्याचे राजकीय पडसाद आज देखील उमटण्याची शक्यता आहे. त्यासोबत मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा, आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा यावरुनही राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ शकतात. महाराष्ट्रातील राजकारणासह महत्त्वाच्या शहरांतील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि मोठ्या बातम्यांचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
पुढील आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ घेणार पियुष गोयल यांची भेट
केंद्राशी संबंधित असणाऱ्या पिकांच्या हमीभावाविषयी करणार चर्चा
उद्या राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पियुष गोयल यांना लिहीणार पत्र
सोयाबीनची आयात थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी
मुख्यमंत्र्यांच पत्र उद्या पाठवलं जाणार
पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक
आजच्या रविकांत तुपकरांच्या बैठकीत निर्णय
विश्वसनीय सूत्रांची माहिती
Marathi News LIVE Update
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा
ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांची मागणी
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एकतंत्री स्वभावाचा घेतला खरपूस समाचार
ही तर त्यांची पाकिस्तानी मानसिकता, आमचंच खरं असल्याची हेकेखोर भूमिका
सीमा प्रश्नावरुन गोऱ्हे ही आक्रमक
Marathi News LIVE Update
बफे यांच्या चार धर्मादाय संस्थामार्फत अनेक संस्थांना आर्थिक मदत
गरीब, शेतकरी, महिलांच्या कल्याण योजनांसाठी सढळ हाताने देणगी
बफे यांनी गरिबांसाठी खुला केला खजिना
6125 कोटी रुपयांचे केले दान, मनाच्या श्रीमंतीने सर्वच भारावले
राजू शेट्टी यांचे उद्याचे आंदोलन आठवडाभर स्थगित
स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर चक्कजाम आंदोलन करणार होती
मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी आज दिवसभर झालेल्या चर्चेनंतर निर्णय
मुख्यमंत्र्यांकडून 29 तारखेला शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावणं
29 तारखेची चर्चा फिस्कटली तर 3 डिसेंबरला ताकदीने रस्त्यावर उतरणार
Marathi News LIVE Update
लॉरेन्स बिष्णोईचा ताबा एनआयकडे
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या न्यायालयीन कोठडीत
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कोठडीत
दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप
Marathi News LIVE Update
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार मोडले
त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं आहे
आमचं सरकार आल्याने ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली -शिंदे
Marathi News LIVE Update
सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय घेईल
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
बेळगाव, निपाणी प्रश्नी न्यायालयात भांडतोय
माझ्याकडून कुठलेही चिथावणीखोर वक्तव्य नाही-फडणवीस
Marathi News LIVE Update
पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता
कच्चा तेलाच्या कॅपिंगचा रशियाचा निर्णय
भाव निश्चित करण्याचा धोरणाचा मोठा परिणाम
भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता
जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी
दादा भुसे यांच्या अचानक भेटीने प्रशासनाची धावपळ
चंद्रपूर : बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या भिवकुंड नाला परिसरात असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना, परिसरात मोठा तणाव, शेकडोचा जमाव रस्त्यावर उतरला
राज्यपालांच्या तोंडून हे वाक्य आले मला क्षणभर काहीच कळाले नाही
राज्यपालांनी जे वक्तव्य केले त्याला आधार काय ?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांसाठी आयुष्य वेचले,
देशात अनेक योद्धे होऊन गेलेत मात्र त्यांच्यात शिवाजी महाराज यांच्यात मूलभूत वेगळेपण हेच आहे, शिवाजी महाराजांनी लोकांसाठी लढायला केल्यात
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक
गेल्या 24 तासांपासून त्यांची तब्येत खालावली
डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू
गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांची माहिती
नवी दिल्ली : नोटबंदी निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र सरकारकडून 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर, नोटबंदी निर्णय योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार संपूर्ण देशाचे लक्ष
मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर
दिल्लीच्या पतियाळा कोर्टात होणार सुनावणी
जॅकलिनच्या जामिनाबाबत होणार निर्णय
Jacqueline Fernandez arrives at Patiala House Court in Delhi in connection with the Rs 200 crores money laundering case involving conman Sukesh Chandrashekhar. pic.twitter.com/T8IjtaC9Bu
— ANI (@ANI) November 24, 2022
औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीत भीषण अपघात, भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू, मृतांमध्ये दोन सख्या बहीण भावांचा समावेश
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल, मुख्यमंत्री कार्यालयातून रविकांत तुपकर यांना भेटीचं निमंत्रण, २.३० वाजता रविकांत तुपकर हे सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्र्यांना भेटणार
विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक
10:30 वाजता दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आणि विक्रम गोखले यांच्या पत्नी माहिती देणार
मीडियात निधनाच्या बातम्या आल्यानंतर विक्रम गोखले यांच्या पत्नीचे स्पष्टीकरण
नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढला
नाशिकमध्ये आणखी 5 बालकांमध्ये गोवरची लक्षणं
यापूर्वी 4 बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईला पाठवले
मालेगावात आता पर्यंत 56 रुग्ण आढळले
11 जणांची प्रकृती चिंताजनक
नाशिक मनपाकडून स्वतंत्र कक्षाची निर्मिती
औरंगाबाद शहरातील दूध डेअरी सिग्नलवर कारचा भीषण अपघात..
रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी बॅरिगेट्स ला धडकली कार..
रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात..
पुणे : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी करवाई, गोव्यातून आलेली ८७ लाखांचं विदेशी मद्य जप्त, दोन आरोपींना पोलीसांकडून बेड्या
नाशिक : गोवरचा धोका वाढला, नाशिकमध्ये आणखी 5 बालकांमध्ये गोवरची लक्षणं, मालेगावात आता पर्यंत 56 रुग्ण आढळले असून 11 जणांची प्रकृती चिंताजनक
मुस्लिम महिलेला पुढे करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला
मुंब्र्यातील घटना आणि त्यासाठी दाखल केलेला गुन्हा मी कधीही विसरणार नाही- आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे भाजप सरकारवर आरोप
मालेगाव : चांदवडच्या राहुल घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, सहा जण जखमी, एका ट्रकची दुसऱ्या ट्रक सह दोन खासगी बसला धडक
पुणे : पुणेकरांना थंडीपासून दिलासा, शहरातील तापमान १४ अंशाच्या वर, पुढील चार ते पाच दिवस पुण्यात थंडी कमीच राहणार, हवामान खात्याचा अंदाज
पुणे : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, थोड्याच वेळात हेल्थ बुलेटिन जारी केलं जाणार