मुंबई : आज शुक्रवार, 25 नोव्हेंबर, 2022. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावाद पुन्हा उफाळून आलाय. या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासांत राज्याच्या वेगवेगळ्या भागात अपघातांची मालिका पाहायला मिळालीय. या पार्श्वभूमीवर राज्यातील अपघातांच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तसंच राज्यपाल पदावरुन भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्याची भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागणीवर आज काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचंय. सोबतच राज्यातील थंडीचे अपडेटही जाणून घेणार आहोत. शिवाय श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आज नेमके काय खुलासे समोर येतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोबतच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्बेतीविषयीचे प्रत्येक अपडेटचा आढावाही या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
Marathi News LIVE Update
आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम दिलासा
हायकोर्टाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयात कायम
एल्गार परिषद प्रकरणात दाखल गुन्ह्यात जामीन
हायकोर्टानंतर सर्वोच्च न्यायालयात ही दिलासा
शिव्या नाही घालणार तर काय आरती करणार का?
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा नव्या व्हिडिओतून सवाल
हर्षवर्धन जाधव यांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांना व्हिडिओतून केली होती शिवीगाळ
शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ ट्रोल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचा नवा व्हिडीओ व्हायरल
अमरावती शहरातून चांदूर रेल्वे स्टेशनकडे येत असताना मच्छी तलावाजवळ झाला अपघात
अपघातात जिवीतहानी नाही, सर्व प्रवासी सुखरूप
रस्त्याच्या खाली एसटी बस उतरली
अमरावती-वर्धा जाणारी पूलगाव डेपोची होती बस
किमान 3700 रुपये भाव द्या, तर कर्नाटकच्या गुळावर बंदीच्या मागणीसाठी गूळ उत्पादक ठाम
तीन दिवसापासून सौदे होत नसल्याने आज गूळ उत्पादकांसह व्यापाऱ्यांचीही मार्केटकडे पाठ
मंगळवारी उद्यासाठी आलेली वाहन मार्केट यार्डमध्येच थांबून
चार दिवसानंतरही तोडगा निघाला नसल्याने गूळ सौद्याचा वाद चिघळणार
पुणे : विक्रम गोखले यांच्या तब्बेतीत आश्वासक सुधारणा होत आहे, पुढील 48 तासात व्हेंटिलेटरवर काढले जाण्याची शक्यता, डॉक्टरांची माहिती
स्वतंत्र मराठवाडा राज्य मागणीच्या संवाद परिषद हॉलची परवानगी रद्द
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांचे तात्काळ आदेश
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार होता कार्यक्रम मात्र जिल्हा परिषदेने परवानगी केली रद्द
परिषदेसाठी शासकीय सभागृह दिल्यानंतर टीका झाली त्यानंतर परवानगी केली रद्द
5 हजार रुपये भरून आयोजकांनी चव्हाण सभागृह केले होते बुक मात्र ते बुकिंग केले रद्द
ॲड गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर फाडल्याने तणाव
ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांनी लावले खासदार हेमंत गोडसे यांचे बॅनर
निधी खासदारांनी दिला म्हणून त्यांचे बॅनर
दोन गटांमुळे नगरसेवकांची मात्र गोची
ठाकरे गटाच्या नगरसेविका हर्षदा गायकर यांची खंत
विकास कामांचा आणखीही निधी देणार असल्याचे खासदारांनी दिले आहे आश्वासन
पुणे मुंबई एक्स्प्रेस वे वर खोपोली जवळ 5 गाड्यांचा विचित्र अपघात वाहनांचे मोठे नुकसान, अनेकजण गंभीर जखमी
लाखो लिटर पाणी गेलं वाया, अनेक घरांत शिरलं पाणी
रस्त्यावर सगळीकडे झाला चिखल
अनेक ठिकाणी साचले मातीचे ढिगारे
पहाटे 3 वाजता टाकी झाली ओव्हरफ्लो
आज दुपारी 4 वाजता संवाद परिषदेचं आयोजन
मराठवाडा आणि विदर्भ स्वतंत्र व्हावा, या मागणीसाठी अॅड गुणरत्न सदावर्ते आग्रही
संवाद परिषदेसाठी लावलेले गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर्स उस्मानाबादेत फाडण्यात आले
अज्ञातांनी फाडले गुणरत्न सदावर्ते यांचे बॅनर्स
उस्मानाबादमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद अरविंद केजरीवाल तीन दिवस गुजरात दौऱ्यावर
26 नोव्हेंबरला भावनगर, 27 नोव्हेंबरला जामनगर आणि 28 नोव्हेंबरला सुरतमध्ये सभा
आम आदमी पक्षाच्या उमेदवारांसाठी केजरीवाल यांचा गुजरात दौरा
थंडीची लाट ओसरली, पुणे वेधशाळेची माहिती, वाचा कुठे किती तापमान?
नांदेड: पंचवीस लाखाहून अधिक रक्कम असलेली एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, नांदेडच्या गजबजलेल्या मालेगाव रोडवरच्या भावसार चौकातील घटना
त्रंबकेश्वरच्या पुरोहितांची ‘ ‘नित्य गंगा आरती’ सुरू करण्याची मागणी
दादा भुसे यांची भेट घेऊन गंगा आरती साठी निधी देण्याची केली मागणी
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या आधारतीर्थ आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खूनाचा अखेर उलगडा, आश्रमातीलच तेरा वर्षीय बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ, अलोक शिंगारे या मुलाचा मंगळवारी सकाळी आढळला होता संशयास्पद रित्या मृतदेह
रत्नागिरी : कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवानखवटी ते विन्हेरे दरम्यान ओवर हेड वायर तुटल्याने परिणाम, अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबल्या
अंबरनाथ : घशात मासा अडकून ६ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत, अंबरनाथमधील उलन चाळ परिसरातली हृदयद्रावक घटना, खेळता खेळता बाळाने तोंडात टाकला मासा, श्वास अडकल्याने बाळाचा तडफडून झाला मृत्यू