Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 29, 2022 | 7:09 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us on

मुंबई : आज सोमवार, 28 नोव्हेंबर, 2022. राज ठाकरे यांच्या सभेचे राजकीय पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे. यासोबत महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडींचे अपडेट्सही जाणून घेणार आहोत. शिवाय राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या यांवरही आपली नजर असेल. चंद्रपुरात घडलेल्या रेल्वे फुट ओव्हर ब्रिज दुर्घटनेचे काय अपडेट समोर येतात, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या अपडेट्सचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Nov 2022 09:27 PM (IST)

    सांगलीत पोलीस भरतीसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व्हर डाऊन

    सांगली :

    सांगलीत पोलीस भरतीसाठीचा ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व्हर डाऊन

    अनेक उमेदवारांचा खोळंबा होण्याची शक्यता

    ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने फॉर्म भरण्यात अडचणी

    पहाटे पर्यंत उमेदवारांची सुरू आहे फरफट

    30 नोव्हेंबर अर्ज दखलची अंतिम मुदत

    वेळेत अर्ज न गेल्यास नुकसान होण्याची भीती

  • 28 Nov 2022 09:25 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

    पुणे :

    – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर,

    – राज ठाकरे उद्या सकाळी पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना होणार,

    – कोल्हापुरात राज ठाकरे महालक्ष्मीचं दर्शन घेणार

    – कोल्हापूरहुन राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार


  • 28 Nov 2022 08:38 PM (IST)

    रिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ उद्या पुण्यात राज ठाकरेंची भेट घेणार

    पुणे :

    – रिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ उद्या राज ठाकरेंची भेट घेणार,

    – आपल्या विविध मागण्यासंदर्भात राज ठाकरेंशी चर्चा करणार,

    – उद्या सकाळी 9 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी होणार भेट,

    – राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर

  • 28 Nov 2022 07:27 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला गोवा दौऱ्यावर

    गोवा :

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला गोवा दौऱ्यावर

    मोपा विमानतळाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार

    गोवा राज्यातील झुआरी नदीवरच्या पुलाचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार

    जागतिक आयुर्वेद काँग्रेसचा समारोप मोदींच्या उपस्थितीमध्ये होणार

    गोवा सरकारकडून मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू

  • 28 Nov 2022 06:55 PM (IST)

    श्रद्धा हत्या प्रकरण, आरोपी आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न

    नवी दिल्ली :

    श्रद्धा हत्या प्रकरण

    आरोपी आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न

    आफताब असलेल्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

    मारेकऱ्यांच्या हातात तलवारी असल्याची माहिती

    मारेकरी हे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते

  • 28 Nov 2022 04:53 PM (IST)

    World cup 2023: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाही, ‘या’ राज्यात होऊ शकते वर्ल्ड कप 2023 ची फायनल

    World cup 2023: कुठल्या स्टेडियमवर होणार वर्ल्ड कप फायनल, पुन्हा एकदा त्यावरुन राजकारण रंगणार? वाचा सविस्तर….

  • 28 Nov 2022 04:08 PM (IST)

    Ruturaj Gaikwad ने 159 चेंडूत लावली वाट, तोडले इतिहासातील 5 मोठे रेकॉर्ड

    Ruturaj Gaikwad इतरांपेक्षा एक पाऊल पुढे, कसं ते समजून घ्या….वाचा सविस्तर…

  • 28 Nov 2022 03:15 PM (IST)

    Ruturaj Gaikwad ने ज्याला 7 SIX मारले, तो गोलंदाज कोण आहे? पहा त्याची अजब-गजब 360 डिग्री Action Video

    VIDEO मध्ये या गोलंदाजाची अजब-गजब 360 डिग्री Action पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल….वाचा सविस्तर 

  • 28 Nov 2022 03:13 PM (IST)

    Ruturaj Gaikwad: 6,6,6,6,6,6,6…ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये 7 SIX कसे मारले? पहा VIDEO

    गायकवाडने एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स कसे मारले? ते इन डिटेल जाणून घ्या, वाचा सविस्तर….

  • 28 Nov 2022 02:52 PM (IST)

    17 विदेशी कलाकारांना अटक

    मुंबई : वेब सिरीज बनवणाऱ्या 17 विदेशी कलाकारांना अटक, 10 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश, दहिसर पोलिसांची कारवाई

  • 28 Nov 2022 02:46 PM (IST)

    उदयनराजे भोसले आज मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

    उदयनराजे भोसले आज मोठा निर्णय घेण्याचा तयारीत

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटवण्यासाठी उदयनराजे आक्रमक

    उदयनराजे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार

    मराठा संघटनांच्या पदाधिकार्यासोबतच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुरू होणार

  • 28 Nov 2022 02:33 PM (IST)

    शाळांमध्ये मिळणार मोफत सॅनिटरी नॅपकि

    नवी दिल्ली : देशभरातल्या शाळांमध्ये मिळणार मोफत सॅनिटरी नॅपकिन, सहावी ते बारावी वर्गातल्या विद्यार्थिनींसाठी सर्व राज्यांनी मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि वेगळे स्वच्छतागृह तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

  • 28 Nov 2022 01:55 PM (IST)

    बांग्लादेश दौऱ्याआधी BCCI ने बोलावली इमर्जन्सी मीटिंग, ‘या’ दोन व्यक्तींना हजर राहण्याचं फर्मान

    बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडिया 1 डिसेंबरला रवाना होणार आहे. पण त्याआधी BCCI ने इमर्जन्सी बैठक बोलावली आहे. वाचा सविस्तर…..

  • 28 Nov 2022 01:54 PM (IST)

    Ruturaj Gaikwad: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची तुफानी बॅटिंग, एका ओव्हरमध्ये थेट 7 SIX

    महाराष्ट्राच्या या गुणी फलंदाजाने एका चांगल्या टीमच्या बॉलर्सना कसं धुतलय? किती चौकार-षटकारांचा पाऊस पाडला, ते जाणून घ्या, वाचा सविस्तर….

  • 28 Nov 2022 01:32 PM (IST)

    वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

    वितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

    अकोलनेर गावात 55 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

    पोपट जाधव असं शेतकऱ्याचं नाव

    विद्युत डीपी बंद केल्यामुळे आत्महत्या

    मागच्या आठ दिवसापासून वीज खंडीत केल्याने आत्महत्या

  • 28 Nov 2022 01:24 PM (IST)

    बीडमध्ये खुनातील आरोपीने पोलिसांचा गळा आवळला

    चालत्या वाहनात घडला प्रकार

    चालकाचा ताबा सुटल्याने पोलीसगाडी पलटली

    आरोपीसह तीन पोलीस गंभीर जखमी

    जखमींवर बीडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू

  • 28 Nov 2022 01:23 PM (IST)

    औरंगाबाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

    – ‘समृद्धी महामार्गात राधेश्याम मोपलवार आणि एकनाथ शिंदे यांनी गडबडी केल्या आहेत’

    – त्यामुळे राधेश्याम मोपलवार यांची ईडी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

  • 28 Nov 2022 01:10 PM (IST)

    दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

    दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती

    पतीच्या हत्येप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचने केली मुलासह पत्नीला अटक

    हत्येनंतर मृतदेहाचे केले तुकडे

    मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून फेकत होते तुकडे

    मृत व्यक्तीचं नाव अंजन दास असून पत्नीचं नाव पूनम तर मुलाचं नाव दीपक

  • 28 Nov 2022 12:35 PM (IST)

    अमरावतीत महावितरणच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

    महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात सुरू आहे ठिय्या आंदोलन

    जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा

    रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याची तक्रार

  • 28 Nov 2022 12:26 PM (IST)

    फझल खान कबरीवरील बांधकाम पाडण्याबाबतची याचिका फेटाळली

    नवी दिल्ली : अफझल खान कबरीवरील बांधकाम पाडण्याबाबतची याचिका फेटाळली, राज्य सरकारला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारचा अहवाल ग्राह्य धरला, अफझल खान मेमोरियलचा अर्ज फेटाळला

  • 28 Nov 2022 11:22 AM (IST)

    राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात स्वराज्य संघटना आक्रमक

    पुणे : राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात संभाजी महाराजांची स्वराज्य संघटना आक्रमक, धोतरावर स्वाक्षऱ्या करत करणार राज्यपालांचा निषेध, स्वाक्षरी केलेले धोतर निवेदन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देणार

  • 28 Nov 2022 10:57 AM (IST)

    कोल्हापुरात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात आंब्याची एन्ट्री

    दक्षिण आफ्रिकेतून मालवी आंबा थेट कोल्हापूरच्या बाजार समितीत

    कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याच्या 20 पेट्या दाखल

    डझनला 4 हजार 500 रुपये दर निघाला

  • 28 Nov 2022 10:30 AM (IST)

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक

    डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा निवडणूक

    अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात

    विद्यापीठाच्या मैदान परिसरातील इमारतीत मोजणी सुरू

    10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली

    आज ठरणार विद्यापीठ अधिसभेच्या 10 जागेचे भवितव्य

    एकूण 53 उमेदवार आहेत निवडणूक रिंगणात

  • 28 Nov 2022 10:22 AM (IST)

    आमदार निवासाला नवा लुक

    नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी आमदार निवासाला नवा लुक, आमदार निवासाच्या प्रवेशद्वाराजवळ हॅाटेल प्रमाणे लुक, एखाद्या हॅाटेलप्रमाणे लायटिंग आणि शुशोभीकरण

  • 28 Nov 2022 09:52 AM (IST)

    मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात

    बीड : पाली घाटात मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात, रस्त्यावर ऑइल पडल्याने ट्रक घसरून दुभाजकावर चढला, अपघातामुळे बराच काळ वाहतूक ठप्प

  • 28 Nov 2022 09:46 AM (IST)

    पुण्यात रिक्षा चालकांचा बेमुदत बंद

    12 संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत

    शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पtर्णपणे बंद करण्याची मागणी

    बाबा आढाव यांची संघटना मात्र बंदमध्ये सहभागी नाही

    या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळतोय

  • 28 Nov 2022 09:41 AM (IST)

    जळगावः मी एकनाथ खडसेंच्या सावलीत उभा राहणार नाही – मंगशे चव्हाण

    जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून आमदार मंगेश चव्हाण यांचा खडसेंना घेऊन सर्वपक्षीय बिनविरोध निवडणुकीस प्रखर विरोध

    ज्यांच्यावर आपण एवढे आरोप केले त्यांच्यासोबत कसा गेल्यास लोक तोंडात शेण घालतील

    सोयीसाठी राजकारण केल्यास लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल

    मी निवडणूक लढवणार खडसे बिनविरोध होणार नाहीत

  • 28 Nov 2022 09:36 AM (IST)

    भंडारा जिल्हातील पालांदूर येथील भरवस्तीत चोरी

    घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरवस्तीतील घरात प्रवेश करून केली चोरी

    50 ग्राम सोने व पाच हजार रुपयांपर्यंतची रोख लंपास

    चोरीच्या घटनेने पालांदूर येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

  • 28 Nov 2022 09:34 AM (IST)

    सकल हिंदू संघटनांचा आज नाशिकमध्ये विराट मोर्चा

    लव्ह जिहाद विरोध, गोहत्या बंदी कायदा यासाठी निघणार मोर्चा

    सकाळी 10 वाजता नाशिकच्या बी.डी भालेकर मैदानातून निघणार मोर्चा

    मोर्चात सकल हिंदू संघटना होणार सहभागी

    मोर्चाच्या पार्शवभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 28 Nov 2022 08:57 AM (IST)

    चंद्रपूर- आजपासून अर्ज करता येणार सादर : 59 ग्रामपंचायतींची निवडणूक

    चंद्रपूर जिल्ह्यातील गावागावांत उमेदवारांची चाचपणी,कागदपत्रांसाठी धावपळ

    जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायततीच्या सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारांची गावागावात चाचपणी केली जात आहे

  • 28 Nov 2022 08:10 AM (IST)

    गोंदियात पारा घसरला

    गोंदियात पारा 9.8 अंश सेल्सिअसवर

    थंडीचा जोर चांगलाच वाढला

    चढत चाललेला गोंदिया जिल्ह्याचा पारा पुन्हा मात्र अचानकच पडू लागला आहे

    शनिवारपासून जिल्ह्याचा पारा घसरून किमान तामपान 10 अंशांवर आले होते

    गोंदिया जिल्ह्यात 9.8 अंशांवर नोंद करण्यात आली आहे

  • 28 Nov 2022 08:01 AM (IST)

    रेल्वेमध्ये मिळणार आता स्थानिक खाद्यपदार्थ

    रेल्वेमध्ये मिळणार आता स्थानिक खाद्यपदार्थ, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची आयआरसीटीसीला परवानगी, लवकरच अंमलबजावणी केली जाणार

  • 28 Nov 2022 07:42 AM (IST)

    मराठवाड्यातील 17 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

    मराठवाड्यातील 17 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
     
    मराठवाडा विभागातील 29 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हातून खरिपाची पिकं गेली
     
    शेतकऱ्यांचं दहा लाख 49 हजार हेक्टरचं नुकसान झालंय
     
    1500 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची 17 लाख शेतकऱ्यांना गरज
     
    शेतकरी संकटात असताना सरकारचं दुर्लक्ष
  • 28 Nov 2022 07:34 AM (IST)

    रमेश बोरणारे यांच्या भावासह बारा समर्थकांविरुद्ध गुन्हा

    औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या भावासह बारा समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल, ग्रामपंचायत निवडणूक असताना गावात जाऊन विरोधी पक्षाच्या लोकांना अमिष दाखवून धमकावल्याप्रकरणी गुन्हा

  • 28 Nov 2022 07:31 AM (IST)

    महाराष्ट्र गुजरात सीमेवर महाराष्ट्र पोलिसांची नाकाबंदी

    मालेगाव : महाराष्ट्र गुजरात सीमेवर महाराष्ट्र पोलिसांची नाकाबंदी, गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी सुरू, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसून चौकशी

  • 28 Nov 2022 07:23 AM (IST)

    थोडक्यात मोठा रेल्वे अपघात टळला

    औरंगाबाद : दोन रेल्वे एकमेकांसमोर आल्या, चालकाच्या सतर्कतेमुळे लासुर येथे थोडक्यात मोठा रेल्वे अपघात टळला, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे दोन रेल्वे गाड्या एकाच रेल्वे रुळावर आल्या असल्याचा संशय, नांदेड सिकंदराबात येथील अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी, चालकाने पाचशे मीटर वर डेमु थांबवल्याने टळला मोठा अपघात