मुंबई : आज बुधवार, 30 नोव्हेंबर 2022. सुप्रीम कोर्टात आज दोन महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहेत. बेळगाव सीमाप्रश्नासोबत आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत सुनावणी होईल. या सुनावणीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घेणार आहोत. शिवाय राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर आता कोकण दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. दुसरीकडे पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला.. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींसह श्रद्धा हत्याप्रकरणी आज नेमके काय खुलासे होतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, उद्या आरोपी आफताब पुनावाला याची नार्को टेस्ट होणार आहे. या घडामोडींवरही आज दिवसभर आपली नजर असेल. महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडी, ताज्या अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूजचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
पुणे :
उद्या प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची होणार लाडू तुला
अपंग मंत्रालय सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे करणार कार्यक्रम
लाडू तुला करून फुलांची उधळण केली जाणार
अपंग आयुक्त कार्यालयात होणार कार्यक्रम
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेकडून कार्यक्रमाचं आयोजन
Marathi News LIVE Update
सोन्यावरील उत्पन्न आता ठरणार कर पात्र?
केंद्र सरकार कर लावण्याच्या तयारीत
सोन्यावरील उत्पन्नावर कॅपिटल गेन टॅक्स लावण्याच विचार
आगामी अर्थसंकल्पात होऊ शकते तरतूद
धुळे : मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांना लुटणारी टोळी जेरबंद, एक महिला सदस्यासह 7 जणांना अटक
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू
शहरातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात
महावितरणच्या गेटवर पोलीस बंदोबस्त
जसं औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होत, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, मंगलप्रभात लोढा यांचं विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
औरंगाबादेत राष्ट्रवादीचं जनआक्रोश आंदोलन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शेतकरी प्रश्नांसाठी आंदोलन
आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
सोलापूर जिल्ह्यातील 18 ते 20 गावे कर्नाटकात जाण्यास उत्सुक
जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी घेतला निर्णय
बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असोच्या घोषणा, अक्कलकोट तालुक्यातील तडवळ तालुक्यात ग्रामस्थ एकवटले
रोड, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने घेतला निर्णय
एसीबीने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार कारवाई
धस यांच्यासह पाच जणांवर अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल, आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल
2019 मध्ये देवस्थानची जमीन बळकाविल्याचा धस यांच्यावर ठपका
आज मराठा संघटना प्रतिनिधी आणि शिवप्रेमींची बैठक
बैठकीत 3 डिसेंबरच्या रायगडावरील कार्यक्रमाच्या नियोजनावर होणार चर्चा
सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरुवात
सिंधुदुर्ग : मालवणात पाच खलाशांसह मासेमारी नौका बेपत्ता, सिंधुदुर्गात खळबळ, सोमवारी मध्यरात्री पासून मालवण तळाशील समुद्रातून नौका खलाशांसह गायब, नौकेची सिग्नल यंत्रणा बंद होऊन झाली बेपत्ता झाल्याचा संशय
रॅगिंग करणाऱ्या सहा जणांची इंटर्नशिप रद्द, वसतिगृहातूनही बाहेर काढलं
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीचा तातडीचा निर्णय
रॅंगिंग करणाऱ्या सहा जणांविरोधात लवकरंच पोलीसांत तक्रार दाखल होणार
रॅगिंग करत एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मारली झापड
टोयोटा किर्लोस्कर ग्रुपचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
टोयोटा कारला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं
औरंगाबादेत रिक्षाचालकांनी संप पुकारला
उद्या दिवसभरासाठी संप पुकारला
रिक्षा चालकांच्या संपत 15 संघटना सहभागी
रिक्षा मीटरच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात संप
पुणे : येत्या 4 तारखेला शिंदे गटाचा मेळावा, मेळाव्यात सगळ्याच पक्षातून लोक शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भागगिरेंचा दावा, खासदार श्नीकांत शिंदे ,नरेश मस्के , शिवाजी आढळराव पाटलांच्या उपस्थितीत होणार मेळावा
प्रताप गडावर सोहळ्यासाठी शिवप्रेमींची गर्दी
पालखी सोहळ्याला सुरवात
अफजल खानच्या कबरीची सुरक्षा वाढविली
ट्रक आणि पिकअपचा अपघात
पिकअपमधील 7 जण जखमी.
जखमीना ससून रुग्णालयात केलं दाखल
खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाट उतरताना तीन ते चार वाहनांचा अपघात, एक ठार, तर 100 फूट खाली पडलेल्या कंटेनर केबिन मध्ये अडकलेल्या चालकाला वाचावीण्याचे प्रयत्न सुरु, एका कंटेनरसह आणखी एका ट्रकची चालक कॅबिन दरीत कोसळली
मुंबई : सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या २० डिसेंबरपर्यंत स्थगित, राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून आदेश जारी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही सुरू असल्याने तणाव टाळण्यासाठी निवडणुका लांबणीवर
नवी दिल्ली : तामिळनाडू मधील जलीकट्टू आणि महाराष्ट्र राज्यातील बैलगाडी शर्यती बाबत आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी