Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:13 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज 9 नोव्हेंबर 2022. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील आजचा तिसरा दिवस आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे आज सोलापुरात असणार आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये (Solapur) ते काय वक्तव्य करतात, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीसह आसपासच्या काही शहरांमध्ये रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत. या सोबत महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राशी संबंधित राजकीय गाठीभेटींनाही वेग आला आहे. या सर्व घडामोडींवर आज दिवसभर महाराष्ट्राची नजर असणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Nov 2022 08:51 AM (IST)

    नाशिक येथे घडली काळीज पिळवटून टाकणारी घटना

    नाशिक : नराधम आई बापाने रस्त्यावर फेकले नवजात स्त्री जातीचे अर्भक, चुंचाळे परिसरात धक्कादायक घटना आली समोर, कडाक्याच्या थंडीत नवजात बालक रात्रभर रडत कुडकुडले, मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः तोडले नवजात बालकाचे लचके, अति रक्तस्त्रावाने नवजात अर्भकाचा मृत्यू

  • 09 Nov 2022 08:26 PM (IST)

    तुरुंगातून बाहेर आल्यावर देवाचे दर्शन

    Marathi News LIVE Update

    तुरुंगातून बाहेर आल्यावर देवाचे दर्शन

    राऊत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दाखल

    जेलमधून बाहेर येताच राऊत बजरंग बलिच्या दर्शनाला

    राऊतांची आज जामिनावर सूटका


  • 09 Nov 2022 07:28 PM (IST)

    फेसबुकचा 11,000 कर्मचाऱ्यांना नारळ

    Marathi News LIVE Update

    फेसबुकचा 11,000 कर्मचाऱ्यांना नारळ

    सर्वात मोठ्या कर्मचारी कपातीने टेक विश्व हादरले

    Metaचा अतिउत्साह Facebook च्या मुळावर

    नवीन भरतीवर निर्बंध, खर्च कपातीवर लक्ष

  • 09 Nov 2022 07:15 PM (IST)

    अमरावती : दिव्यांग मंत्रालय होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिव्यांगासाठी मोठा निर्णय

    येत्या तीन डिसेंबरला दिव्यांग स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा होईल

    आमदार बच्चू कडू यांची माहिती

    आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला मोठं यश

    प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग व पुनर्वसन केंद्र उभारणार

  • 09 Nov 2022 06:58 PM (IST)

    संजय राऊत तुरुंगाबाहेर आले

    Marathi News LIVE Update

    संजय राऊत तुरुंगाबाहेर आले

    सुटल्याचा आनंद आहे, न्यायालयावरील विश्वास वाढला

    माझी तब्येत ठीक नाही, माध्यमांशी नंतर सविस्तर बोलणार

    संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

  • 09 Nov 2022 06:13 PM (IST)

    ‘See you in Court’

    Marathi News LIVE Update

    ‘See you in Court’

    महिला कर्मचारी इरेला पेटली

    ट्विटरने कामावरुन केले कमी

    6 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा इशारा

  • 09 Nov 2022 05:26 PM (IST)

    Twitter च्या टिकचा रंग बदलणार

    Marathi News LIVE Update

    Twitter च्या टिकचा रंग बदलणार

    टिक आता निळा रंगात नसेल

    ब्लू टिक नव्हे तर ग्रे रंगात असेल टिक

    काही ठराविक युझर्ससाठी असेल ऑफिशियल ग्रे

  • 09 Nov 2022 04:14 PM (IST)

    मी कोर्टाचा आभारी, न्यायदेवतेवर माझा विश्वास

    Marathi News LIVE Update

    मी कोर्टाचा आभारी, न्यायदेवतेवर माझा विश्वास

    संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

    आता मी पुन्हा लढणार, राऊत यांचा इशारा

    पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मिळाला जामीन

  • 09 Nov 2022 04:12 PM (IST)

    संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कुटुंबीयांकडून जय्यत तयारी

    संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कुटुंबीयांकडू जय्यत तयारी

    खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच घर सजलं

    खासदार संजय राऊत यांच्या घराला पोलीस बंदोबस्त वाढवला

    स्वागतासाठी डीजे, ढोलताशेही स्वागतासाठी तयार

  • 09 Nov 2022 04:07 PM (IST)

    मंजूर झालेल्या जामीनावर ईडीकडून स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न

    मंजूर झालेल्या जामीनावर ईडीकडून स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्न

    अवघ्या तीन महिन्यात जामीन मिळवणारे संजय राऊत अपवाद

    जेलबाहेर आल्यानंतत ते थेट मातोश्रीवर जाणार

    खासदार संजय राऊत मातोश्री आणि स्मृतिस्थळावरही जाणार

  • 09 Nov 2022 04:03 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी बोलावली शिवसैनिकांची बैठक

    नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांची उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

    उद्या मातोश्रीवर नागपूर जिल्ह्यातील शिवसेना आणि युवा सेनेची बैठक

    १३ तारखेला नियोजित असलेली बैठक तातडीने उद्या १० तारखेला बोलावली

    उद्धव ठाकरे स्वतः नागपूर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी चर्चा करणार

    फडणवीस यांच्या जिल्ह्यात संघटन बांधणीवर उद्धव ठाकरे यांचा वॅाच

    संघटन बांधणीसोबत उद्या विविध मुद्यांवर होणार चर्चा

  • 09 Nov 2022 03:50 PM (IST)

    भारताला महाशक्ती होण्यासाठी दूरचा पल्ला

    Marathi News LIVE Update

    भारताला महाशक्ती होण्यासाठी दूरचा पल्ला

    महाशक्ती होण्यासाठी उद्योगपतींचा लागणार फौज

    10 हजार अंबानी आणि 20 हजार अडानी हवेत

    नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचे मोठे वक्तव्य

  • 09 Nov 2022 03:47 PM (IST)

    संजय राऊत कोर्टातून बाहेर आल्यावर देवाचं दर्शन घेणार

    आधी हनुमानाचं दर्शन घेणार

    नंतर सिद्धिविनायक मंदिरात जाणार

    उद्धव ठाकरे यांनाही आजच भेटण्याची शक्यता

  • 09 Nov 2022 03:38 PM (IST)

    औरंगाबाद येथे हर हर महादेव चित्रपटावरून राडा

    मराठा संघटना आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात राडा

    चित्रपट शो चालू न देण्यावरून झाला राडा

    फेम तापडिया चित्रपटगृहासमोर झाला राडा

  • 09 Nov 2022 03:27 PM (IST)

    ट्विटर युझर्सलाही मोजावे लागतील पैसे?

    Marathi News LIVE Update

    ट्विटर युझर्सलाही मोजावे लागतील पैसे?

    Elon Musk यांची नवीन योजना

    एका अहवालात करण्यात आला दावा

    ब्लू टिक सोबत ट्विटर वापरासाठीही मोजावी लागेल रक्कम

  • 09 Nov 2022 03:20 PM (IST)

    राऊतांची लवकरच तुरुंगातून सूटका होणार

    Marathi News LIVE Update

    राऊतांची लवकरच तुरुंगातून सूटका होणार

    PMLA कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान

    ईडीची लवकरच हायकोर्टात धाव

    राऊतांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा

  • 09 Nov 2022 03:19 PM (IST)

    सांगोला तालुक्यातील महुद येथे छोटा सत्कार स्विकारून आदित्य ठाकरे मुंबईला जाणार

    सांगोला तालुक्यातील महुद येथे छोटा सत्कार स्विकारून आदित्य ठाकरे मुंबईला जाणार

    सांगोला दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना होणार

    स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन महुद गावाकडे निघाले

    मुंबईला जाताना जेजुरी येथे दर्शनासाठी जाण्याची शक्यता

  • 09 Nov 2022 03:02 PM (IST)

    संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

    संजय राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध

    राऊतांच्या जामिनाविरोधात ईडीची हायकोर्टात धाव

    थोड्याच वेळात सुनावणी

  • 09 Nov 2022 01:50 PM (IST)

    भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!: जयराम रमेश

    नांदेडमध्ये उद्या जाहीरसभा, मल्लिकार्जून खर्गे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार: अशोक चव्हाण

    भारत जोडो यात्रेवर भाजपाची नाहक टीका, भ्रष्टाचाऱ्यांनाच भ्रष्टाचार दिसतो: नाना पटोले

    भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील ९ भारतयात्रींचा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सहभाग.

     

     

     

     

  • 09 Nov 2022 01:39 PM (IST)

    टायगर इज बॅक! सुषमा अंधारे यांचं ट्वीट

    टायगर इज बॅक! सुषमा अंधारे यांचं ट्वीट

    संजय राऊत यांना जामीन मंजूर होताच अंधारे यांची पहिली प्रतिक्रिया

    पीएमएलए कोर्टाकडून संजय राऊत यांचा जामीन मंजूर

    पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने केली होती अटक

    अखेर न्यायालयीन कोठडीतून संजय राऊत यांची सुटका होणार

  • 09 Nov 2022 01:12 PM (IST)

    ब्रेकिंग! संजय राऊत यांना जामीन मंजूर

    ब्रेकिंग! संजय राऊत यांना जामीन मंजूर

    अखेर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका

    विशेष पीएमएलए कोर्टाचा संजय राऊतांना दिलासा

    पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सगळ्यात मोठी अपडेट

     

  • 09 Nov 2022 01:06 PM (IST)

    पुणे : खडकवासला धरणात विवाहितेची आत्महत्या

    पुणे : खडकवासला धरणात विवाहितेची आत्महत्या

    सारीका संदिपान वाकुरे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव

    एकता कॉलनी, उत्तमनगर येथे राहणाऱ्या महिलेच्या आत्महत्येनं खळबळ

    हवेली पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला, पुढील तपास सुरु

  • 09 Nov 2022 01:04 PM (IST)

    ‘सत्तार आणि गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घ्या’

    महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या- मनिषा कायंदे

    राज्यपालांच्या भेटीनंतर मविआ शिष्टमंडळाची अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी

    महाराष्ट्राची नैतिकता शिल्लक आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा सवाल

    ‘सत्तार आणि गुलाबराव पाटील यांचा राजीनामा घ्या’

    मविआच्या महिला शिष्टमंडळाची मागणी

    महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्यानं मविआ आक्रमक

     

  • 09 Nov 2022 12:16 PM (IST)

    दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

    दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

    लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल- दिपाली सय्यद

    ठाकरे गटाला आणखी एक धक्का

    शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार

  • 09 Nov 2022 11:48 AM (IST)

    लातूर : 35 वर्षीय डॉक्टरचा अपघाती मृत्यू

    लातूर : 35 वर्षीय डॉक्टरचा अपघाती मृत्यू

    डॉक्टर निलेश हेडे बाईक अपघातात ठार

    ऊसाच्या ट्रॉलीला दुचाकीची मागून धडक बसून अपघात

    हॉस्पिटल बंद करुन बाईकवरुन गावाकडे निघाले असताना काळाचा घाला

  • 09 Nov 2022 11:46 AM (IST)

    11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

    गोंदिया : नवोदयच्या विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

    मैदानात खेळताना भोवळ येऊन पडला

    संगम खिलेश्वर बोपचे, वय 11, असं मृत विद्यार्थ्याचं नाव

    हृदयविकाराचमुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा संशय

  • 09 Nov 2022 10:42 AM (IST)

    हत्या करुन पळ काढणाऱ्या 8 जणांना सिनेस्टाईल अटक

    चंद्रपूर : हत्या करुन पळ काढणाऱ्या 8 जणांना अटक

    शिर धडावेगळं करुन 8 जणांना स्कॉर्पिओतून पळ

    पळ काढून वर्ध्याला जात असताना मारेकऱ्यांना अटक

    चंद्रपूर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग, सर्व आरोपींना बेड्या

    हत्येच्या अवघ्या काही तासांच्या आतच मारेकरी गजाआड

    चंद्रपुरात पोलिसाांची धडाकेबाज कामगिरी, पुढील तपास सुरु

    आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक

    हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव महेश मेश्राम

  • 09 Nov 2022 10:18 AM (IST)

    महानंद दूध संघाच्या विविध प्रश्नांवर उद्या मंत्रालयात बैठक

    पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    बैठकीत महानंद संघाच्या खालवलेल्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा होणार

    महानंद चालविण्यासाठी एनडीडीबीला देण्याचा निर्णय बैठकीत होण्याची शक्यता

    यापूर्वी 3 नोव्हेंबरला पुण्यात बैठक पार पडली होती

  • 09 Nov 2022 09:57 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार

    गुजरात निवडणुकांसाठी राजधानी दिल्लीत आढावा बैठक

    आज दिल्लीत भाजप राष्ट्रीय नेत्यांची बैठक

    गुजरात निवडणुकीच्या रणणिती बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत जाणार

    संध्याकाळी 7 वाजता होणार दिल्लीत बैठक

  • 09 Nov 2022 09:31 AM (IST)

    मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत

    मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेची वाहतूकही विस्कळीत

    अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड

    कामावर जाण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना फटका

    सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरु

    जलद मार्गावरील लोकलच्या वेळपत्रकावर परिणाम

  • 09 Nov 2022 09:28 AM (IST)

    पुण्यात मतदार जागृती रॅलीला सुरुवात

    केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची मुख्य उपस्थिती

    निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांचाही सहभाग

    महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातून सुरु झाली सायकल रॅली

    आज केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त घेणार पत्रकार परिषद

    सायंकाळी 5 वाजता होणार पत्रकार परिषद

  • 09 Nov 2022 09:25 AM (IST)

    गडचिरोली : नक्षलवाद्यांनीच केली जहाल नक्षलवाद्याची हत्या

    गडचिरोली : नक्षलवाद्यांनीच केली जहाल नक्षलवाद्याची हत्या

    जहाल नक्षलवादी असलेल्या शंकरराव उर्फ वाचम शिवा याची नक्षल साथीदारानेच हत्या केल्यानं खळबळ

    जहाल नक्षलवादी हा दक्षिण गडचिरोली भागातील अनेक नक्षली गटात कार्यरत

    अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या शंकरला नक्षलवाद्यांनीच ठार मारलं

    पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी नक्षलसाथीदारालाच संपवलं

  • 09 Nov 2022 08:51 AM (IST)

    मालमत्तेच्या वादातून वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

    कोल्हापूर : मालमत्तेच्या वादातून वडिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

    कागल तालुक्याच्या व्हन्नूर गावातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना

    मुलगा आणि सुनेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरु

  • 09 Nov 2022 08:48 AM (IST)

    नाशिकमधील देवळाली कॅम्प-भगूर रस्त्यावर तरुण आढळला बेशुद्धावस्थेत

    बहिणीला सासरी सोडण्यासाठी आलेल्या भावाचा खून झाल्याची घटना

    जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

    अमानुष मारहाण झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना

    गणेश पंजाब पठाडे (26, रा. शिरसम, जि. हिंगोली) असे तरुणाचे नाव

  • 09 Nov 2022 08:15 AM (IST)

    अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यावर सामनातून हल्लाबोल

    मुंबई : अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यावर सामनातून हल्लाबोल

    ‘मंत्र्यांना हाकला, नाहीतर महानाट्याची चौथी घंटा वाजायला लागेल’

    तर हे सरकार म्हणजे महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग-सामना

    मुख्यमंत्र्यांच्या महानाट्य टीकेला प्रत्युत्तर

  • 09 Nov 2022 08:13 AM (IST)

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

    जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

    17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

  • 09 Nov 2022 08:12 AM (IST)

    टायर फुटून जीपचा भीषण अपघात

    मालेगाव : टायर फुटून जीपचा भीषण अपघात

    जीप दोन ते तीन वेळा कलंडून 5 जण जखमी

    जीपची दुचाकीलाही धडक, मनमाड-नांदगाव रोडवर अपघात

    जखमींमध्ये दोन लहान मुलं आणि महिलेचा समावेश

    जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

  • 09 Nov 2022 07:50 AM (IST)

    मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिराने

    वेळापत्रक कोलमडल्यानं सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

    कल्याणवरुन CSMT कडे अनेक गाड्या विलंबाने

    मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं प्रवाशांना फटका

  • 09 Nov 2022 07:42 AM (IST)

    भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस

    राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा तिसरा दिवस

    नांदेडच्या शंकर नगरपासून पदयात्रेला सुरुवात

    हजारो कार्यकर्ते भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी

  • 09 Nov 2022 07:34 AM (IST)

    दिल्ली मध्यरात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली

    नेपाळमध्ये भूकंप, 6 जणांचा मृत्यू! भारतातही जाणवले धक्के

    दिल्ली मध्यरात्री भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली

    भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल

    दिल्लीसह जयपूर, पाटणा,उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

  • 09 Nov 2022 07:29 AM (IST)

    संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज निर्णयाची शक्यता

    संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज निर्णयाची शक्यता

    विशेष पीएमएलए कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष

    संजय राऊत सध्या आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत

    31 जुलै रोजी राऊतांना करण्यात आली होती अटक

    पत्राचाळ कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राऊत अटकेत