मुंबई : आज दिनांक 10 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला निवडणूक आगोचा पुढील निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण या चिन्हाचा उपयोग करता येणार नाहीये. तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये. त्यामुळे आज ठाकरे गट आणि शिंदे गट निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचे पर्याय सादर करण्याची शक्यता आहे. यातील एक, एक चिन्ह दोन्ही गटाला निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. याच चिन्हावर अंधेरी पूर्ण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ठाकरे गटाला लढवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आज देखील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
सांगली
निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह देताच मिरजेत शिवसेना ठाकरे गटाकडून जल्लोष
मशाली पेटवून ढोलताशांच्या तालावर केला जल्लोष
मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात केला मशाल या चिन्हाचा जल्लोष
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जयघोष करीत शिवसैनिकांनी केला एकच जल्लोष
जळगाव
ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्ह मिळाल्याने जळगावात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जल्लोष
पेटती मशाल घेऊन शिवसैनिकांनी शहरातून काढली रॅली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत केला एकच जल्लोष
पेटती मशाल हे चिन्ह महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचा शिवसैनिकांनी केला निर्धार
गद्दारांनी चिन्ह गोठवलंय पण खुद्दारांचं रक्त पेटवलंय अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी केलं शक्ती प्रदर्शन
दादा भुसे
आम्ही सर्व शिवसैनिक भाग्यवान आहोत.
हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव आम्हाला मिळालं
याठिकाणी न्याय झाला असं मी म्हणेन
चिन्हसंदर्भात उद्या योग्य तो निर्णय होईल
ही तात्पुरती व्यवस्था आहे
कायद्याच्या चौकटीत राहून आम्हाला धनुष्य बाण जे चिन्ह मिळेल
शिवसैनिक म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद आहे, असं मला वाटत नाही
कुणाचा जय, कुणाचा पराजय हे मानणारे आपण कार्यकर्ते नाही
शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहे त्यावर मार्गक्रमण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत
नवी दिल्ली
शिंदे गटाला दिलेल्या नावावर ठाकरे गटाचा आक्षेप ?
उद्याच्या याचिकेत शिंदे गटाच्या नावाचाही उल्लेख केला जाणार सूत्रांची माहिती
बाळासाहेब यांच्या नावावर ठाकरे गटाचा आक्षेप
ठाकरे गट बाळासाहेब यांच्या नावाबाबत कोर्टात दाद मागणार सूत्रांची माहिती
मुंबई
मशाल चिन्ह मिळताच ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
ठाकरे गटातील नेते खासदार अरविंद सावंत यांनी मशालच चिन्ह हातात घेत गाणं बोलत केला आनंद व्यक्त
उषःकाळ होता होता
काळरात्र आली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
असे गाणे अरविंद सावंत यांनी गात आनंद व्यक्त केला
पंढरपूर आमदार शहाजी बापू पाटील
बाळासाहेबांची शिवसेना हे नाव योग्य
निवडणूक आयोगाने 40 आमदारांनी 12 खासदारांच्या मताची कदर केली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर विरोध केला
त्यांच्या विचाराचीच लोक आता शिंदे साहेबांसोबत आहेत
बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीला विरोध केला तर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मैत्री करतात ही एक मोठी तफावत आहे
नैतिकतेने बाळासाहेबांच्या विचाराने काम करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा आज मोठा विजय झाला
नवी दिल्ली
उद्या दिल्ली उच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार
नवी दिल्ली
उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह
2004 साली समता पक्षाची नोंदणी रद्द झाली, त्या पक्षाचे चिन्ह मिळालं
त्रिशूल धार्मिक असल्याने आणि दोन्ही गटांनी दावा केल्याने चिन्ह रद्द केले
उगवता सूर्य हे डीएमके पक्षाचे यापूर्वीचे चिन्ह आहे
मुंबई
ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” नाव आणि “मशाल” चिन्ह मिळाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जल्लोष
अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे आणि निवडणुकीपूर्वी नवीन नाव आणि नवीन चिन्ह ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे
अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसैनिक जल्लोष करताना दिसले
शिंदे गटाला तीनही नवीन चिन्ह सादर करावे लागणार
उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत शिंदे गटाला तीन नवीन चिन्ह सादर करावे लागणार
शिंदे गटाने त्रिशुल, उगवता सूर्य, गदा ही तीन चिन्हे निवडणूक आयोगाला सादर केले होते
दुसरीकडे ठाकरे गटाने त्रिशुल उगवता सूर्य, गदा आणि मशाल हे चिन्ह सादर केले होते
निवडणूक आयोगाने दोनही गटाची धार्मिक चिन्ह रद्द केली होती
त्यामुळं शिंदे गटाचं गदा हे चिन्ह रद्द केलं आहे
तर दुसरीकडे दोनही गटाने त्रिशुल आणि उगवता सुर्य हे चिन्ह सादर केले होते
दोनही गटाने दावा केलेले हे चिन्ह आता रद्द करण्यात आले आहे
शिंदे गटाला तीनही नवीन चिन्ह सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले
नवी दिल्ली
राजधानी नवी दिल्लीत ठाकरे गटाची बैठक सुरू
खासदार अनिल देसाई यांची वकिलांसोबत बैठक
खासदार विनायक राऊत यांच्या घरी बैठक सुरू
दिल्ली हायकोर्टातील याचिका आणि इतर बाबींबाबत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती
एकनाथ शिंदेंकडून कॅव्हेट दाखल
दिल्ली हायकोर्टात केले कॅव्हेट दाखल
आमची बाजू ऐकूण घेतल्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर निर्णय देऊ नये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हायकोर्टाला विनंती
हायकोर्टात उद्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता
बुलढाणा – शिक्षण संस्था अध्यक्षाचा मृत्यू
शेगाव पोलिसांत चौघांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा
संजय मुरारका यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मानसिक धक्का बसल्याने तब्यत बिघडली
मुरारका कॉलेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
रोहित पवारांचा बारामती अॅग्रो साखर कारखाना
साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा
भाजप नेते राम शिंदे यांची साखर आयुक्तांकडे मागणी
गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपूर्वी सुरू करून कायद्याचा भंग केला
कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, सीईओंवर गुन्हे दाखल करा
शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेच्या वाढीसाठी घालवलं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे. शिवसेना पक्षात दुभंगला आहे, पूर्णतः मोडला गेला आहे.ही बाब फक्त राज्याच्याच नाही तर शिवसेनेच्या दृष्टीनेही हिताची नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया
नवीन चिन्ह शिवसेनेसाठी क्रांती घडवेल
भविष्यात आम्ही आधिक सक्षम होऊ
अनेक पक्षांची चिन्ह गोठवली गेली आहेत – राऊत
नवी दिल्ली : शिंदे गटाचे वकील निवडणूक कार्यालयात दाखल
शिंदे गटाकडून दोन चिन्ह दिल्याची माहिती
उगवता सूर्य आणि त्रिशूल या चिन्हांवर शिंदे गटाचा दावा
ऐनवेळी शिंदे गटाने आपली तिन्ही चिन्हं बदलली सूत्रांची माहिती
पुण्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पुण्यात पोस्टरबाजी
चिन्ह गोठलंय पण रक्त पेटवलंय आशयाचे पोस्टर
आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेबत ठाकरे, जय महाराष्ट्र
ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार
दिल्ली हाय कोर्टात उद्या सुनावणी होणार असल्याची माहिती
आज सुनावणी होणार नसल्याचंही स्पष्ट
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयविरोधात ठाकरे गटाची हायकोर्टात धाव
पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात
भरधाव स्विफ्ट कार हायवेवर उलटली
भीषण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही
स्विफ्टमधील प्रवासी अगदी थोडक्यात बचावले
सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडला अपघात
अपघातामुळे काही काळ हायवेवरील वाहतूक खोळंबली
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना कार उलटली
मनसेकडून मुंबईपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
मनसेची उद्या रंगशारदामध्ये महत्वाची बैठक
पालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे करणार मार्गदर्शन
पदाधिकाऱ्यांना वॉर्डनिहाय नियोजनाबाबत मार्गदर्शन
सपा नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन
वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सुरू होते उपचार
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी
गेल्या अनेक दिवसांपासून मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते
MCA निवडणुकीसाठी आशिष शेलार आज अर्ज भरण्याची शक्यता
उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
शरद पवार गटाकडून भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात
आशिष शेलारांनी अर्ज दाखल केल्यास 11 वर्षांनंतर क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी अशी चुरशीची लढत रंगणार
20 ऑक्टोबरला MCA ची निवडणूक होणार आहे.
पुणे : टँकरमधून इंधन चोरणाऱ्या सात जणांना अटक, 80 लाखाचा मुद्देमाल जप्त
डेपोमधून इंधन घेऊन बाहेर पडल्यानंतर टँकरमधून धोकादायक पद्धतीने चोरी
लोणी काळभोरच्या कदमवाक वस्तीतील धक्कादायर प्रकार
इंधनाने भरलेले 2 टँकर आणि मुद्देमाल पोलिसांकडून जप्त
सामनातून शिंदे गटाला इशारा
कितीही कट-कारस्थानं करा, बेइमानीचे घाव घाला, शिवसेना संपणार नाही!
शिवसेना पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुश्मनांच्या नरडीचा घोट घेईल
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक
केंद्रीय निवडणूक आयोग कोणाला कोणतं चिन्हा देणार? आज निर्णयाची शक्यता
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हा गोठवलं
नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग आज निर्णय घेणार?
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत काँग्रेस -राष्ट्रावादीचे विचार लादले
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची उद्ध ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेर धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची वेळ – मुनगंटीवार
सुधारण्याचा प्रयत्न करा,अजूनही वेळ गेलेली नाही – सुधीर मुनगंटीवार
परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीरपणे प्रवेश करणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल
2019 ते 2021 या कालावधीत एकूण 182 परदेशी नागरिकांवर गुन्हे
बनावट भारतीय पासपोर्टसह महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप
भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत गुन्हे दाखल
महाराष्ट्रनंतर त्रिपुरा (122), तामिळनाडू (46), पश्चिम बंगाल (17) आणि कर्नाटक (14)चा नंबर
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)ने आकडेवारी जाहीर
भंडाऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलं
16 ऑक्टोबरला मतदान, एकूण 19 ग्रामपंचायतिची निवडणूक
विशेष म्हणजे सर्वाधिक 16 ग्रामपंचायती भंडारा तालुक्यातील
साकोली, पवनी व तुमसर प्रत्येकी एक एक ग्रामपंचायतींच्या निवडणुका
मुंबई उच्च न्यायालयात गुगल इंडियाच्या सीईओंच्या याचिकेवर आज सुनावणी
गुगलचे सीईओंविरोधात कॉपीराईट कायद्यांतर्गत एफआयआर
गुगलच्या अधिकाऱ्यांविरोधातील FIR रद्द करण्यासाठी कोर्टात धाव
मुंबईत सापडलेली बनावट शपथपत्रं घोटाळा प्रकरण
प्रकरणाचा तपास निर्मल नगर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग
बनावट शपथपत्रांसंदर्भात गुन्हे शाखा तपास करणार
ठाकरे गटाने ही बनावट शपथपत्रे बनवल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता.
स्टॅम्प पेपरचा वापर करुन शपथपत्र बनवली होती
नोटरी करणाऱ्यांनीच शपथपत्र बनवल्याचं आलं समोर
दिवाळीपूर्वी डाळींच्या भाववाढीचा सर्वसामान्यांना फटका
तुरीच्या भावात 4 ते 5 रूपयांची वाढ
खाद्यतेलाच्या दरातही प्रतिकिलो 3 ते 4 रुपयांची वाढ