मुंबई : आज दिनांक 18 ऑक्टोबर 2022 जाणून घेऊयात देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या राज्यभरात पाऊस सुरू आहे. मात्र पुण्यात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. रात्री अडीचपर्यंत पुण्यात कोसळधार पाऊस झाला. पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली, मात्र अनेक भागात पाणी साचलं आहे. पुणे-सोलापूर हायवेवर पाणी साचल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलं असून, प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिर आणि पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं. पावसाचा जोर कमी झाल्यानं पहाटेपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक शहरात ड्रोन उड्डाणावरील बंदीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आदेश
आतापर्यंत एकूण 17 ड्रोन जप्त
लष्करी आस्थापनांमध्ये अज्ञात ड्रोनची घुसखोरी झाल्याने दिले होते आदेश
Marathi News LIVE Update
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
आता लवकरच बोनस आणि वेतनही
दिवाळीनिमित्त राज्य सरकारकडून महामंडळाला 45 कोटींची भेट
एसटी कर्मचाऱ्यांना कमीतकमी अडीच हजार रुपये बोनस मिळणार
Marathi News LIVE Update
आबासाहेब पाटील, रमेश केरे पाटील बदनामी प्रकरण
बदनामी प्रकरणी मुंबईत 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
सोशल मीडियातून बदनामी केल्याचे प्रकरण
केरे पाटलांनी विष घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न
Marathi News LIVE Update
ड्रोनचा वापर केल्यास शेतीत अमुलाग्र बदल
देशाचा जीडीपी दीड टक्क्यांनी वाढेल
तर पाच लाख तरुणांच्या हाताला मिळेल रोजगार
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या अहवालात दावा
Marathi News LIVE Update
शिंदे गटातील सरंपच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मतदारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखविला
हे गोरगरिबांचे सरकार असल्याचे दाखवून दिले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
निवडणुकीत विजयी सरपंच वर्षावर
Marathi News LIVE Update
मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका
राज्य सरकार याचिका दाखल करणार
सरकार ठोठावणार पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत घेतला निर्णय
महिला IPL चे सामने कधी होणार? किती टीम्स असतील. सर्व डिटेल्स जाणून घ्या….वाचा सविस्तर....
T20 World Cup 2022 मध्ये आव्हान टिकवून ठेवण्यासाठी श्रीलंकेला आजच्या मॅचमध्ये विजय मिळवणं आवश्यक होतं, वाचा सविस्तर.
Marathi News LIVE Update
उभ्या पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार
देवेंद्र फडणवीस यांची माहिती
3 वर्षे मदत मिळाली नाही, शेतकऱ्यांची भावना होती
अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत केलेली आहे
NDRF च्या निकषांच्या पुढे जाऊन मदत केल्याचा केला दावा
Marathi News LIVE Update
धारावीच्या विकासातील अडसर दूर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
दिल्लीत घेतली धारावीच्या पुनर्विकासासाठी वैष्णव यांची भेट
समृद्धी महामार्गालगत हायस्पीड ट्रेन आणि कॉर्गो ट्रेनचे काम ही करणार
मुंबई ते सोलापूर वंदे भारत रेल्वे सुरु करणार
रेल कम रोड, असा वापर करण्याचे अश्विनी वैष्णव यांचे निर्देश
IND vs NZ T20 WC Warm up Matches Live Streaming: एका क्लिकवर जाणून घ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचे डिटेल्स.
Marathi News LIVE Update
‘गर्जा महाराष्ट्र’ गीताला राज्यगीताचा दर्जा
गाण्यातील दोन कडवी राज्यगीतात घेतली जाणार
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
Marathi News LIVE Update
अंधेरी पोटनिवडणुकीतील माघारीवरुन भाजपवर टीका
पोटनिवडणुकीतून भाजपनं पळ काढला
ठाकरे गटाला छळायचा भाजपचा प्रयत्न
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला पलटवार
धनुष्यबाण गोठवंल तरी तुम्ही मशाल घेऊन निघाला आहात
शिवसैनिकांची ठाकरे यांनी थोपटली पाठ
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) अध्यक्ष पदी रॉजर बिन्नी आणि सचिव पदी जय शाह यांची आज बिनविरोध निवड झाली.
त्याबद्दल शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मिलिंद नार्वेकर एमसीए कार्यकारिणी निवडणुकीत शरद पवार-आशिष शेलार गटातून सदस्य पदासाठी उमेदवार आहेत
पाकच कोट्यवधींच होणार नुकसान, वाचा सविस्तर….
Marathi News LIVE Update
वैभव नाईकांची संपत्ती 7 ते 8 कोटींनी वाढली
आता तर मालमत्तेत 25 कोटींची वाढ
तक्रारदार प्रदीप भालेकर विनायक राऊतांचाच माणूस
नाईकांनी कागदपत्रे एसीबीकडे द्यायला पाहिजे होती
पुरावे असल्यानंच यंत्रणा चौकशी करतात
नितेश राणे यांची घणाघाती टीका
Marathi News LIVE Update
उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही
नितेश राणे यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना पाहुनच आईस्क्रिमचा कोन
अशी निशाणी निवडणूक आयोगाने दिली
थेट हल्ला करण्याची ठाकरेंमध्ये हिंमत नाही
शिक्षकांचा मुलगा वात्रट निघाला
ठाकरे मातोश्रीमध्ये बसून फक्त मज्जा बघतात
नितेश राणेंची ठाकरेंविरोधात चौफेर टीका
Marathi News LIVE Update
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार वेतन
पगार दिवाळीआधी करण्याचे देवेंद्र फडणवीसांचे आदेश
बोनस तर बोनस दिवाळीपूर्वीच वेतनही
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच पगार
122 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही नामीबियाने विरोधी टीमला घाम फोडला…. वाचा सविस्तर
Marathi News LIVE Update
राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार एकाच मंचावर
भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं तिन्ही नेते एकाच मंचावर येणार
ठाकरेंनी भारत जोडो यात्रेचं निमंत्रण स्वीकारलं
भारत जोडो यात्रेत तीन मोठे नेते एकाच मंचावर दिसणार
Marathi News LIVE Update
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं वाटोळं केले
अजित पवार यांचा भाजपवर प्रहार
शहरातील उड्डाणपूल का पाडावे लागेलत?
दुर्घटनांना जबाबदार कोण?
अजित पवारांची भाजपवर चौफेर टीका
Marathi News LIVE Update
बुलढाण्यातील शिवसैनिक मातोश्रीवर दाखल
लवकरच महाराष्ट्र दौरा काढणार, उद्धव ठाकरे यांची ग्वाही
बुलढाण्यातील कार्यकर्त्यांसोबत ठाकरे यांची चर्चा
भाजपचे काही कार्यकर्ते ठाकरे गटात करणार प्रवेश
T20 World Cup 2022 आधी वॉर्मअप मॅचमध्ये स्विच हिटचा फटका ग्लेन मॅक्सवेलच्या अंगाशी आला असता…पहा VIDEO
मुंबई विमानतळ आज सहा तासासाठी बंद ठेवण्यात आले आहे
धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी विमानसेवा बंद आहे
सकाळी 11 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानसेवा बंद असेल
या कामामुळे शेकडो विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय.
पुणे-नागपूर तिकिटांचे दर दुप्पट
ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी जोरात
तिकिटांच्या दरावर अंकुश कोणाचा?
पूरग्रस्तांना हवी तशी मदत मिळत नसल्याचा सरकारवर आरोप
तातडीने मदत देण्याची मागणी
अन्न धान्याचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी
T20 World cup 2022 मध्ये पाकिस्तानच्या ‘या’ चार कमकुवत बाजू आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर विजय मिळवू शकते. वाचा सविस्तर….
साताऱ्यात पुराच्या पाण्यात बापलेकीसह अर्टिंगा कार बुडाली
साताऱ्याच्या सोमंथळीदी हृदय हेलावणारी घटना, दोघांचा मृत्यू
कारमध्ये पाणी येऊन वडील आणि मुलगी आतच अडकले
छगन मदने आणि प्रांजल मदने अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे
सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान घडली दुर्दैवी घटना
मातोश्रीबाहेर बुलडाण्यातील शिवसैनिक आक्रमक
शिवसैनिकांकडून शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी
50 खोके एकदम ओक्केच्या घोषणा
बुलडाण्यातील शिवसैनिकांची आज मातोश्रीवर बैठक
शरद पवार, फडणवीस, एकनाथ शिंदेंची उद्या डिनर डिप्लोमसी
MCA निवडणुकीबाबत डिनर डिप्लोमसी
सत्तांतरानंतर पहिल्यांदाच तिघे एकत्र येणार
उद्या सायंकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम येथील MCA लौंउज येथे डिनर डिप्लोमसीचे आयोजन
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
उद्यापासून दहावीचे परीक्षा अर्ज भरायला होणार सुरुवात
19 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरता येणार अर्ज
तर बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे
5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली वाढवून
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं परिपत्रक केलं प्रसिद्ध !
शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या दमदाटी
अजितदादांकडून शेलक्या शब्दात समाचार
‘अशी असभ्य भाषा वापरणं योग्य नाही’
‘ही भाषा महाराष्ट्राची संस्कृती नाही’
शिखर बँक चौकशी प्रकरण
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रतिक्रिया
‘चौकशीला सहकार्य करणार’
फडणवीस वरीष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
अंधेरी पोटनिवडणूक माघारी नंतर फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
फडणवीस यांचा आज एक दिवसाचा दिल्ली दौरा
केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना
खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर क्रॅश, 6 ठार
एका गावात हेलिकॉप्टर कोसळलं
सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
एकूण 8 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती, 6 जण ठार
केदारनाथपासून दोन किमीच्या अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं
गरुरचट्टीमध्ये हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना
हेलिकॉप्टर दुर्घनटेचं कारण अस्पष्ट
बुलडाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आज ठाकरे गटात प्रवेश
भाजपबरोबरच राष्ट्रवादी, वंचितचे कार्यकर्तेही करणार प्रवेश
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
सांगलीत आईची आपल्या दोन कोवळ्या मुलांसह आत्महत्या
विहिरीत उडी घेऊन आईनं मुलांसह जीव दिल्यानं खळबळ
सांगलीतल्या जत तालुक्यातील सिंदूर येथील धक्कादायक घटना
9 महिन्याच्या मुलासह 2 वर्षांच्या मुलीसोबत आईची विहिरीत उडी
IND vs NZ Warmup Match: न्यूझीलंड विरुद्ध कशी असेल टीम इंडियाची Playing 11. वाचा सविस्तर….
रमेश केरे पाटलांच्या कुटुंबियांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची केली मागणी
जे जे रुग्णालयात पोलीस रमेश केरेंचा जबाब नोंदवणार असल्याची माहिती
अतिवृष्टी व कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील माळेगाव येथील घटना
प्रेम धनु पवार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव
बँक ऑफ महाराष्ट्र व खाजगी बँकेचे 2 लाखाचं होतं शेतकऱ्यावर कर्ज
चाकण ते आळंदी फाटा 4 किलोमीटर वाहनाच्या रांगा
महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक बंद
एकेरी वाहतूक सुरु असल्याने मोठी वाहतूक कोंडी
अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
व्हिडिओमध्ये या आगीचं रौद्ररुप पाहायला मिळत आहे
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान
आमदार संजय शिरसाट एअर एम्ब्युलन्सने मुंबई दाखल
हार्टअटॅक आणल्यामुळे औरंगाबादेतून मुंबईत आणलं
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट उपचारासाठी मुंबईत
तातडीने औरंगाबादहून मुंबईत आणलं गेलं
संजय शिरसाट यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात होणार पुढील उपचार
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला
शोपिया जिल्ह्यामध्ये ग्रेनेड हल्ला, उत्तर प्रदेशचे 2 रहिवासी ठार
शनिवारी झालेल्या काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर पुन्हा खळबळ
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात अतिरेकी कारवायांची पुन्हा दहशत
लांडग्यांच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार, 4 शेळ्या जखमी
लाखंदूर तालूक्यातील मांदेड येथील घटना
पशुपालकाचे 60 हजार रुपयांचे नुकसान
मनसे नेते मनोज चव्हाणांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
पोलिसांना दिवाळी बोनस देण्याची पत्रातून मागणी
‘सणासुदीच्या काळात पोलिसांचं आर्थिक समाधान व्हावं’
युवा सेनेची राज्यपालांकडे भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या पीएचडीच्या चौकशीची मागणी
राज्यपालांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी
युवा सेनेने काल मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु यांना पत्र लिहून सोमय्या पिता-पुत्राच्या मुंबई विद्यापीठाने दिलेल्या Phd ची चौकशी करण्याची मागणी केली होती
सामान्यतः पीएचडी पूर्ण करण्यासाठी 3 वर्षे इतका कालावधी लागत असताना सोमय्या पिता पुत्रांना 14 महिन्यांतच ती कशी मिळाली? युवा सेनेचा मुद्दा
तसंच सोमय्या पिता पुत्राच्या पीएचडीशी संबंधित कागदपत्रे विद्यापिठाकडे उपलब्ध का नाहीत?, युवा सेनेचा सवाल
सिल्लोडमध्ये गुलाबराव पाटील आणि रावसाहेब दानवेंमध्ये टोलेबाजी
अडीच वर्षांपूर्वी आमचं लव्ह मॅरिज तुटलं – गुलाबराव पाटील
आपलं लव्ह नाही तर अरेंज मॅरिज होतं, रावसाहेब दानवेंचा टोला
लव्ह मॅरेज तर महाविकास आघाडीबरोबर केलं होतं – दानवे
आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा धक्का
संजय शिरसाठ औरंगाबादहुन उपचारासाठी मुंबईला रवाना
एअर अंबुलन्स ने संजय शिरसाठ मुंबईला रवाना
काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात सुरू होते उपचार
आज सकाळी तातडीने उपचारासाठी मुंबईला रवाना
पुणे स्टेशन परिसरात स्थिती पुन्हा पूर्ववत
रात्री झालेल्या पावसामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात साचलं पाणी
रेल्वे तिकीट घराजवळ साचलेल्या पाण्याचा अखेर निचरा
पुण्यातील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत
शिवभोजन थाळीचे तीन महिन्यांचे अनुदान मिळाले नाही
शिवभोजन थाळी केंद्र चालवणाऱ्या चालकांच्या अडचणी वाढल्या
जुलै महिन्यापासूनची अनुदानाची रक्कम प्रलंबित
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर
आज दुपारी 1 वाजता फडणवीस दिल्लीत दाखल होणार
अंधेरी पोटनिवडणुकीतील माघारीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा
दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा?
गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट
म्हशीच्या दूध खरेदी दरात 2 रुपये वाढ
गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची वाढ
म्हशीच्या दूध विक्री दरातही 3 रुपयांची वाढ
शुक्रवारपासून होणार नव्या दूध दरवाढीची अंमलबजावणी
पुण्यात रात्री अडीच वाजेपर्यंत मुसळधार पाऊस
पहाटेपासून पावसाची विश्रांती, मात्र अनेक भागात पाणी साचलेलंच
पुणे-सोलापूर हायवेवर पाणी साचल्यानं वाहनांच्या रांगा
पुण्यातील रस्त्यांना रात्री आलं नद्यांचं स्वरूप
प्रसिद्ध दगडूशेठ मंदिर आणि पुणे स्टेशनमध्येही पाणी शिरलं
कोंढवा, हडपसर, येवलेवाडी भागात रस्ते जलमय
पहाटेपासून पाणी ओसरण्यास सुरूवात, पावसाची विश्रांती