मुंबई: आज दिनांक 23 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते संध्याकाळी पाच वाजता श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते शरयू नदी घाटावर आरती होणार आहे. 5:45 वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. अयोध्येतून मोदी काय घोषणा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.