मुंबई : आज दिनांक 29 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेणार असा थेट इशाराच आता बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्याचबरोबर आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील कडू यांनी केला आहे. या वादावर आता विविध पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. आज देखील याच पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात.