Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 30, 2022 | 11:17 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breaking
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज दिनांक 30 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. महागाई काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. महागाईचा मोठा फटका हा सध्या मध्यमवर्गीय ग्राहकांना बसत आहे. आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील परतीच्या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला असून, गहू, ज्वारी आणि बाजरीच्या दरात वाढ झाली आहे. गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 250 ते 300 रुपये वाढ झाली असून, ज्वारीचे दर प्रति क्विंटल 500 ते 700  रुपयांनी वाढले आहेत. तर तांदुळाच्या दरातही 500 रुपयांची वाढ झाली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यातून येणाऱ्या गव्हाचं प्रमाण कमी झाल्यानं गव्हाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Oct 2022 11:20 PM (IST)

    रवी राणा ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

    आमदार रवी राणा ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

    बच्चू कडू आणि रवी राणा यांची समोरासमोर चर्चा होणार

  • 30 Oct 2022 10:42 PM (IST)

    बच्चू कडू मुंबईत दाखल

    आमदार बच्चू कडू मुंबईत दाखल झाले आहेत

    कडू लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल होणार


  • 30 Oct 2022 09:57 PM (IST)

    गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू

    –  गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील दुर्घटनेत 60 जणांचा मृत्यू
    – बचाव पथकाचं रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरु

  • 30 Oct 2022 07:15 PM (IST)

    गुजरात मोरबीमध्ये पूल कोसळला

    Marathi News LIVE Update

    गुजरात मोरबीमध्ये पूल कोसळला

    दूर्घटनेवेळी पुलावर 500 जण असल्याची माहिती

    मच्छू नदीवरील पूल कोसळल्याची घटना

    अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता

  • 30 Oct 2022 05:51 PM (IST)

    अमरावतीत इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू

    Marathi News LIVE Update

    अमरावतीत इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू

    मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

    मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यात येणार

    दोन मजली इमारती कोसळण्याची घटना

  • 30 Oct 2022 05:13 PM (IST)

    बाळासाहेब लांडगे यांच्या स्पर्धेत सहभागी न होण्याचे आवाहन

    Marathi News LIVE Update

    बाळासाहेब लांडगे यांच्या स्पर्धेत सहभागी न होण्याचे आवाहन

    महाराष्ट्र कुस्ती संघाला भारतीय कुस्ती संघाचे पत्र

    भारतीय कुस्ती संघाच्या पत्रात स्पर्धेत सहभागावर बंदी

    अन्यथा भारतीय कुस्ती संघ कारवाई करेल

  • 30 Oct 2022 04:52 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने मला फरक पडणार नाही

    Marathi News LIVE Update

    उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने मला फरक पडणार नाही

    शहाजीबापू पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    भाजप, शिंदे गटाच्या 200 जागा निवडून येतील

    शहाजीबापूंनी दाखविला विश्वास

    सांगोला मतदारसंघात जाहीर सभेसाठी ठाकरे गट आग्रही

  • 30 Oct 2022 04:18 PM (IST)

    माझं नाव बच्चू असले तरी आम्ही लहान नाही, आरपार करु

    Marathi News LIVE Update

    माझं नाव बच्चू असले तरी आम्ही लहान नाही, आरपार करु

    आमदार बच्चू कडू यांचा पुन्हा इशारा

    काही निर्णय कडू असतात पण घ्यावे लागतात

    अमरावतीतील कार्यक्रमात कडू यांची शाब्दिक बॅटिंग

  • 30 Oct 2022 03:17 PM (IST)

    हरिभाऊ बागडे राजकारणातून निवृत्त होणार

    Marathi News LIVE Update

    हरिभाऊ बागडे राजकारणातून निवृत्त होणार

    बागडे नाना यांनी केली निवृत्तीची घोषणा

    पक्ष ज्याला उमेदवारी देईल ते मान्य करणार

    बागडे यांनी पक्षावर सोपवली पुढील जबाबदारी

  • 30 Oct 2022 02:31 PM (IST)

    प्रहारच्या कार्यकर्त्यांची इच्छा आरपारच्या लढाईची

    Marathi News LIVE Update

    प्रहारच्या कार्यकर्त्यांची इच्छा आरपारच्या लढाईची

    बच्चू कडू यांनी दिला इशारा

    राणांसोबत बसण्याची इच्छा नाही- कडू

    योग्य उत्तर आलं तर ठीक, अन्यथा माघार नाही

    रवी राणा-बच्चू कडू यांच्या वादात मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

  • 30 Oct 2022 02:29 PM (IST)

    उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडालाय – आदित्य ठाकरे

    आदित्य ठाकरे यांचा ट्विट करत शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा

    उद्योग, कृषी क्षेत्राचा खोके सरकारवरील विश्वास उडालाय

    ‘सॅफ्रन’ राज्याबाहेर गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांच पुन्हा ट्विट

  • 30 Oct 2022 02:17 PM (IST)

    अमरावतीत दोन मजली इमारत कोसळली

    Marathi News LIVE Update

    अमरावतीत दोन मजली इमारत कोसळली

    इमारतीच्या ढिगाऱ्यात 4 जण अडकल्याची भीती

    प्रभात टॉकीजजवळील इमारत कोसळली

    प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु

  • 30 Oct 2022 01:19 PM (IST)

    रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया

    रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादावर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया

    रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद लवकरच मिटेल, अशी आशा आहे

    हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळतील

    शहाजीबापू पाटील यांचा आशावाद

  • 30 Oct 2022 11:54 AM (IST)

    किरीट सोमय्या यांचे किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप

    किरीट सोमय्या यांचे किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप

    किशोरी पेडणेकर चौकशीला का घाबरतात?- सोमय्या

    आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकर यांची चौकशी करावी

    SRA घोाटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे

    सोमय्या यांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

  • 30 Oct 2022 11:34 AM (IST)

    शिंदे- फडणवीस सरकारचा अंत लवकरच – नाना पटोले

    शिंदे- फडणवीस सरकारचा अंत लवकरच – नाना पटोले

    सरकारमध्ये अंतर्गत खदखद सुरू – नाना पटोले

    अंतर्गत खदखदीमुळे सरकार अडचणीत येणार – नाना पटोले

  • 30 Oct 2022 11:33 AM (IST)

    व्याघ्र प्रकल्पात हिवाळी पर्यटनाला सुरुवात

    चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हिवाळी पर्यटन जोरात

    चंद्रपूर-मोहर्ली मुख्य मार्गावर मधू वाघिणीच्या दर्शनाने पर्यटक आनंदीत

    सध्या याच परिसरात आहे मधू वाघिणीचे वास्तव्य

    अगदी मुख्य रस्त्यावरच वाघिणीचे दर्शन झाल्याने व्याघ्र पर्यटनातला आनंद  द्विगुणीत

    पुढचे सहा महिने ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना मुक्त व्याघ्रदर्शन

    वाघांचे दर्शन हमखास होणार असल्याचा व्याघ्रप्रेमींचा अंदाज

  • 30 Oct 2022 11:29 AM (IST)

    खालापूर टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

    खालापूर टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

    पुण्याकडे जाताना दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

    विकेंड असल्याने मुंबईहून पर्यटक पुण्याकडे जात आहेत

    वाहतूककोंडी सोडविण्याचे काम ट्रॅफिक पोलिस करत आहेत

  • 30 Oct 2022 10:54 AM (IST)

    आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर?

    काही दिवसांआधी टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला.

    त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय.

    सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे.

    नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.

  • 30 Oct 2022 10:42 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीची भाजपाकडून तायरी

    विधानसभा निवडणुकीची भाजपाकडून तायरी

    गुजरातमध्ये राज्यातून भाजप नेत्यांची मोठी फौज जाणार

    विधानसभा निवडणुकीसाठी योगेश सागर यांच्या नेतृत्वात टीम

    12 आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह 50 जणांची टीम जाणार

  • 30 Oct 2022 09:53 AM (IST)

    राणांच्या आरोपांवरुन अंबदास दानवेंचा सरकारवर निशाणा

    राणांच्या आरोपांवरुन अंबदास दानवेंचा सरकारवर निशाणा

    रवी राणांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे- दानवे

    कुठेतरी पाणी मुरतंय, त्यामुळेच रवी राणांचे आरोप – दानवे

    राणांच्या आरोपांवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा

  • 30 Oct 2022 08:11 AM (IST)

    रवी राणा विरूद्ध बच्चू कडू वादात मुख्यमंत्री शिंदे यांची मध्यस्थी

    रवी राणा विरूद्ध बच्चू कडू वादात मुख्यमंत्री शिंदे यांची मध्यस्थी

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवी राणा अमरावतीहून रवाना

    रवी राणा आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्र्यांना भेटणार

    आमदार बच्चू कडूंना देखील मुख्यमंत्र्यांनी भेटीला बोलावलं

    बच्चू कडू राणा यांच्यातील वाद मिटण्याचे संकेत

  • 30 Oct 2022 08:07 AM (IST)

     यंदा राज्यात पडणार कडाक्याची थंडी

    यंदा राज्यात पडणार कडाक्याची थंडी

    प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान झालं थंड

    त्याचा परिणाम राज्यासह देशातील वातावरणावर होणार

    नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान राज्यात कडाक्याची थंडी

    किमान तापमानात घट होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

  • 30 Oct 2022 07:51 AM (IST)

    राज्यातील परतीच्या पावसाचा  रब्बी पिकांना फटका

    राज्यातील परतीच्या पावसाचा  रब्बी पिकांना फटका

    गहु , ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ

    गहू क्विंटलमागे 250 ते 300 रुपयांनी  महागला

    ज्वारी क्विंटलमागे 500 ते 700 रुपयांनी महाग

    गव्हाचे दर आणखी वाढण्याची शक्यता