मुंबई: आज दिनांक 8 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यातील मान्सून परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारणपणे 10 ऑक्टोबरला मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा मान्सूच्या परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा इशारा दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र या पवासाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे.