मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचं बोललं जातंय. त्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत.राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आलाय. पुण्यात NIA ने मोठी कारवाई केलीय. पुण्यातील रावेतमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील पीएफआय संघटनेशी संबंधित शाळेचे दोन मजले सील करण्यात आले आहेत. मानखुर्द मंडला परिसरात पहाटे तीन वाजता भीषण आग लागली कुठलाही प्रकारचे जीवितहानी झालेली नाही. यासह तुमच्या जिल्ह्यातील, गाव खेड्यातील बातम्या वाचा एका क्लिकवर…
– पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली,
– नवीन नळजोड देणे बंद करण्याचा निर्णय,
– जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय,
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीसंदर्भात निर्णय हाेण्याची शक्यता,
– शहराची तहान भागविण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाइी साधारणत: ७ टीएमसी पाण्याची गरज
मुंबई :
मराठा समाजाची ‘सह्याद्री अतिथीगृहा’वरवर सुरु असलेली बैठक संपली
मात्र काही लोकं नाराज असल्याने त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला
भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात केली गेली घोषणाबाजी
मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना शांत केला
पुणे जिल्ह्यातील 21 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी पाणीसाठा
राज्यभर यंदा मान्सून लांबणीवर
जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नाही
पुणे महापालिकेचे आतापासूनच पाण्यासाठी नियोजन
जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडली पुणे महापालिका अधिकाऱ्यांची बैठक
धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक
पुणे महापालिका करणारं आतापासून पाण्याचे नियोजन
वाशिम :
भारतीय सैन्य दलात प्याराशूट कमांडो म्हणून कार्यरत
19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मूळगावी होणार अंत्यसंस्कार
वाशिम जिल्ह्यात हळहळ व्यक्त
पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावत असताना बर्फाखाली दबल्याने जवानाचा मृ्त्यू
हिंगोली :
जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पडत आहे अवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत
अवकाळी पावसाने अंतर मशागतिची कामे खोळंबली
धुळे :
धुळे जिल्ह्यातील चिखलीपाडा गावामध्ये एका मेणबत्ती बनवायच्या कारखान्याला भीषण आग
आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू
दोन महिला गंभीर रित्या भाजल्या
हिंगोली-जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पडत आहे अवकाळी पाऊस
अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत
अवकाळी पावसाने अंतर मशागतिची कामे खोळंबली
राज्यात शासनाने गुटखाबंदी केली आहै
मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कायद्यात काही बदल केले जातील
अवैध गुटखावाहून नेणाऱ्या वाहनाला कायमस्वरुपी सरकारजमा करण्याचे धोरण केले जाईल.
ओपन जार मध्ये जे पाणी विकले जाते त्या पाण्याला परवाने देवून अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारीत आणणार.
सर्व प्रक्रीया करुनच पाणी विकावे लागणार. दोषी आढळळ्या FDAच्या लाईन ऑफ अॅक्शन नुसार कारवाई होईल
मंत्री संजय राठोड यांची माहिती
धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्याला आग
आगीत होरपळून चार महिलांचा मृत्यू, तर दोघी गंभीर जखमी
जखमींवर नंदुरबार येथील रुग्णालयात उपचार सुरु
पोलिसांकडून एक संशयित ताब्यात
अंबाजोगाई – मोरफळी बसला अपघात
चालकाचा ताबा सुटल्याने बस घाटात कोसळली
अपघातात 9 प्रवाशी किरकोळ जखमी
बसमध्ये 30 प्रवाशी करत होते प्रवास
सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
एकाच कुटुंबातले ९ जण जखमी
तामसा -नांदेड रोडवर अपघातात एकूण १० जण जखमी
भरधाव वेगाने येणाऱ्या कार एकमेकांवर आदळल्या
अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली आहे.
माध्यमात सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत..
महाविकास आघाडी मजबूत आहे. आमच्या सभाही मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत.
अंबादास दानवे यांची माहिती
बीडमध्ये बुट्टेनाथ घाटात एसटी कोसळली
अंबाजोगाई – मोरफळी बसला अपघात
चालकाचा ताबा सुटल्याने बस घाटात कोसळली
अपघातात 9 प्रवाशी किरकोळ जखमी
बसमध्ये 30 प्रवाशी करत होते प्रवास
सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही
कामगारांच्या रोजगारासंबंधी दोघांमध्ये चर्चा
जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीत राहणार- अजित पवार
आमचं वकीलपत्र कोणी घेण्याची गरज नाही – अजित पवार
येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये बालभारतीच्या पुस्तकांच्या किमती वाढणार
बालभारतीच्या पुस्तकांच्या किमती 40 ते 30 टक्क्यांनी वाढवल्या जाण्याची शक्यता
प्रिंटिंग त्याचबरोबर कागदाच्या किमती वाढल्याने शिक्षण विभागाचा निर्णय
शिक्षण मंत्री दीपक केसरकर व शिक्षण तज्ञ मंडळी दोन दिवसात किमती ठरवणार
महागाई वाढल्याने पुस्तकांच्या किमतीही वाढवल्या जाणार असल्याची बालभारती संचालकांची माहिती
राष्ट्रवादी पक्षात अनेक चढउतार आले, पण सध्या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत.
राज्यातील महत्वाचे प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या गेल्या आहेत
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही
माध्यमांमध्ये कोण अंदाज व्यक्त करत आहे, माहीत नाही. परंतु मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊ का? मी राष्ट्रवादीतच राहणार
माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम सुरु आहे
राजकीय चर्चांच्या या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही
महाराष्ट्र भूषण पुरस्कारसंदर्भात आम्हाला राजकारण करायचे नाही
पुरस्कारासाठी १३ ते १४ कोटी खर्च केले, मग त्यासाठी चांगले मंडप का घातले नाही
पुरस्कार विततरण समारंभ पावसाळापूर्वी ढगाळ वातावरण असताना का घेतला नाही
उष्माघाताने १३ जणांचा मृत्यू, हे सरकारचे हे मोठे अपयश आहे. त्यांना अजून मदत द्यावी
या प्रकरणात काय राजकारण करायचे होते का? अजित पवार
माझ्यासंदर्भातील बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही
४० आमदारांच्या सह्या घेतल्या नाही
आम्ही राष्ट्रवादी पक्षातच राहणार आहोत
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपला जपान दौरा सोडून राज्यात परतणार
दोन दिवस आधीच ते दौरा संपवणार
राज्यातील राजकीय घडमोडींमुळे राहुल नार्वेकर दौरा अर्धवट सोडणार
बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे तसेच मॉडरेशन चे काम काम अंतिम टप्प्यात
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली माहिती
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडली तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान पार पडली
बारावीच्या परीक्षेला राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांची नोंदणी तर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दिली होती दहावीची परीक्षा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे 40 आमदारांसमवेत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहे.
तुमच्या मनात जी गोष्ट आहे ती आमच्या मनात अजिबात नाही.
कोणीतरी बातम्या पसरवत आहे.
100 टक्के असं काहीच घडलेलं नाही.
राष्ट्रवादी आणि समविचारी सहकारी पक्ष मिळून शक्तिशाली बनण्याचे प्रयत्न सुरू आहे
अजित पवार भाजपसोबत आल्यास शिवसेना सत्तेबाहेर- संजय शिरसाट
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचे मोठे वक्तव्य
अजित पवार एनसीपीसोबत आल्यास त्यांचे स्वागत
सध्या फक्त चर्चाच सुरु आहेत
राज्यातील राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार माध्यमांशी संवाद साधणार
अजित पवार थोड्याच वेळात माध्यमांसमोर येणार
अजित पवार यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्राचे लक्ष
अजित पवार यांच्यांसंदर्भातील चर्चांवर शरद पवार यांनी केले वक्तव्य
अजित पवार यांच्या चर्चांवर काही तथ्य नाही
अजित पवार यांनी कोणतीही बैठक बोलवली- शरद पवार
शरद पवार –
– पुणे जिल्हा शिक्षण मंडळात काही लाखांच्या घरात विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत
– आज नुसती अंजीराची शेती करून चालणार नाही, त्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे
– आज धान्याच्या बाबतीत पुढे गेलोय
– अंजीर आणि सीताफळ या दोन्ही फळांवर प्रक्रिया केल्याशिवाय गंत्यतर नाही
– इथली तरुण पिढी आज तालुक्याचे राज्याचे नाव वाढवत आहेत
मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नाबाबत आज मुंबईत बैठक
मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे
संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन
मराठा आरक्षणाबाबत भूमिका ठरवण्यासाठी आजच्या बैठकीत होणार निर्णय
काही मराठा संघटनांनी पुन्हा आरक्षणासाठी मोर्चाची हाक दिल्यानं बैठकीचं केल आयोजन
उष्माघाताच्या रूग्णांमध्ये वाढ
नागपूरच्या मेडीकलमध्ये कोल्ड वार्ड सज्ज
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाची तिव्रता वाढली
पाऱ्याने गाठली चाळीशी
उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस नेत्याकडे वक्तव्य
मला एकट्याला भाजपसोबत लढावे लागणार
काँग्रेस नेत्यांकडे उद्धव ठाकरे यांचे खासगीत वक्तव्य
नवीन राजकीय समीकरणांची फक्त चर्चा
अजित पवार यांचे स्पष्टीकरण
नवीन चर्चांना अर्थ नसल्याचा दावा
अतीक आणि अश्रफ हत्याकांड प्रकरण
सर्वोच्च न्यायालयात 24 एप्रिलला होणार सुनावणी
दोघांच्याही हत्ये विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती
उत्तर प्रदेशात आतापर्यंत झालेल्या एन्काऊंटर बाबतही माहिती देण्याची याचिकेत मागणी
24 एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
नाशिक : पण अजित दादा असा निर्णय घेणार नाहीत
जो निर्णय असेल तो पक्षाचा असेल
गेल्या वेळी अजित दादा गेले होते तो देखील पक्षाचा निर्णय होता
आम्हाला शपथ विधी साठी फोन करून बोलावलं होतं
यावेळेस देखील पवार साहेब, अजित दादा निर्णय घेतील
सध्या तरी आम्हाला कोणताही फोन नाही किंवा निरोप नाही
द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा
आमदारांच्या सह्यांचं पत्र लवकरच राज्यपालांकडे देण्याच्या तयारीत
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधीच अजित पवारांसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली?
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने चाहत्यांना दिली गुड न्यूज
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत जाहीर केली प्रेग्नन्सी, वाचा सविस्तर..
अभिनेत्री शहनाज गिलला डेट करण्याच्या चर्चांवर राघवने दिलं उत्तर
“मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा”
“डेटिंगसाठी माझ्याकडे वेळ नाही”, वाचा सविस्तर..
समलिंगी दाम्पत्याला मुलं दत्तक देणे धोकादायक
दावा करत ठोठावला सुप्रीम कोर्टाचा दरवाजा
मुलांच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्याचे मोठे प्रश्न
समलिंगी विवाहाला केला कडाडून विरोध
आज पाच सदस्यीय घटनापीठासमोर याचिकेवर सुनावणी, वाचा सविस्तर
पुण्यातील ब्लु बेल्स शाळेमध्ये असं कोणतंही प्रशिक्षण दिलं जात नाही
या इमारतीच्या खालच्या मजल्यावर शाळा आहे
ती शाळा अजूनही सुरू आहे
चौथा आणि पाचवा मजला डीग्नीटी एज्युकेशन ट्रस्ट ला दिला होता
यामध्ये पीएफ आयच्या कारवाया सुरू होत्या
चौथा आणि पाचवा मजला एन आय एनं जप्त केला आहे
ब्लु बेल्स शाळेनं दिलं स्पष्टीकरण
फक्त या इमारतीत शाळा आहे …
सोने-चांदीचा ग्राहकांना पुन्हा दिलासा
आज भावात झाली मोठी घसरण
पुन्हा रेकॉर्ड करण्यापूर्वी खरेदीची करा लगबग
गुंतवणूकीवर छप्परफाड परतावा, वाचा बातमी
पुण्यात वाहनं व घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्यांला खडकी पोलिसांनी केली अटक
आरोपी हा जामिनावर सुटला होता व पुन्हा चोरी केल्याने आता परत तुरुंगात रवानगी करण्यात आली.
गणेश संजय पोळके असं या सराईत चोरट्याचे नाव..त्याच्याकडून चोरलेल्या ३ कार अन् २ दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त..
चोरीच्या वाहनांचा वापर करून तो घरफोडी करायचा..
चोरीच्या गुन्ह्यात तो तुरुंगात होता, काही दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता..
पुन्हा त्याने चोरीचा मार्ग पकडला अन् पुन्हा तुरुंगात गेला.
या चोरट्यांने अजून कुठे असे गुन्हे केले आहेत का याचा तपास खडकी पोलीस करत आहेत.
– शरद पवार आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर,
– पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे शंकरराव उरसळ यांच्या अर्ध पुतळ्याचे पवारांचे अनावरण,
– तसेच भारतातील पहिल्या अंजीर ज्यूस प्रोडक्टचे शरद पवारांच्या हस्ते लॉंचिंग,
– यावेळी सुप्रिया सुळे, विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती
नवी दिल्ली
महाराष्ट्र सदनातील उपहारगृह बंद
यापूर्वीही उपहारगृह एक आठवडा होत बंद
आज पासून उपहारगृह बंद असल्याची नोटीस
महाराष्ट्र सदनात आलेल्या पाहुण्यांची गैरसोय
सध्या महाराष्ट्र सदनात 100 हून अधिक गेस्ट असल्याची माहिती
उपाहारगृह बंद होण्याचे कारण गुलदस्तात
व्हिडिओ हॉट लाईन
पेट्रोल-डिझेलच्या भाव झाले का स्वस्त
पुण्यानंतर राज्यात ठाण्यात स्वस्त पेट्रोल-डिझेल
परभणीचा महागाईचा काटा काही हलेना
तुमच्या शहरातील भाव घ्या जाणून, एका क्लिकवर
– सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर एलपीजी गॅसने भरलेला टँकर पलटी
– वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गॅसचा टँकर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय
– या टँकर मध्ये जवळपास 17 टन गॅस भरलेला होता, मात्र सुदैवाने अपघातानंतरही गॅस गळती न झाल्याने अनर्थ टळला
– शहरापासून नजीक असलेल्या तळे हिप्परगा गावाजवळ ही घटना घडली आहे.
– हा टँकर रत्नागिरीवरून छत्तीसगड येथे जात असताना ही घटना घडली
– या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले
राजराम सहकारी साखर कारखाना निवडणूक
आमदार विनय कोरे यांनी केला मोठा खुलासा
विधान परिषद निवडणुकीवेळी सतेज पाटील यांनी राजाराम बिनविरोध करण्याबाबत शब्द दिला होता
पण सतेज पाटलांनी शब्द फिरवला आमदार विनय कोरे यांचा आरोप
सतेज पाटील यांना शब्द पाळा असं सांगण्याचा प्रयत्नही मी केला
आमदार कोरे यांचा दावा
कुंभोज येथे सत्ताधारी गटाच्या प्रचार सभेदरम्यान कोरे यांच्या वक्तव्याने चर्चेना उधाण
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात देखील उष्मांघाताचे बळी ?
उष्माघाताने कागल तालुक्यातील 3 जणांचा बळी ?
कागल तालुक्यातील साताबाई पाटील ( वय वर्षे 56) आणि जनाबाई कांबळे (वय वर्षे 80)अस मृत महिलेचे नाव
सत्तापा पाटील ( 54 ) यांचे देखील उष्मांघाताने निधन
तिघांनाही उष्मांचा त्रास झाल्यानंतर मृत्यू झाल्याचे नातेवाईक याच म्हणणं.
मोठी बातमी
ब्रेक नाशिक
– जिथे अजितदादा तिथे नितीन पवार
– नाशिकच्या सुरगाणा मतदार संघाचे आ. नितीन पवार यांचं उघड वक्तव्य
– अजित पवारांमुळेच राष्ट्रवादीत असल्याचा खुलासा
– टीव्ही 9 सोबत बोलतांना केला खुलासा
– पहिल्या दिवसापासून आपण अजित दादांचे समर्थक
– राष्ट्रवादीचे अनेक आमदार अजित दादांसोबत जाणार
– पहाटेच्या शपथ विधी वेळेस देखील दाद सोबत होतो, आणि उद्या काही झालं तरी दादांसोबत
– नाशिक जिल्ह्याचे सगळे आमदार दाद सोबत असणार
भुसावळात १३ एप्रिलनंतर सोमवारी पाचव्या दिवशी कमाल तापमान पुन्हा ४३.३ अंश नोंदवले गेले. शहरातील केंद्रीय जल आयोग कार्यालयात ही नोंद झाली. दरम्यान, पश्चिमी भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे एप्रिलच्या उर्वरित १३ दिवस तापमानाचा ४२ ते ४७ अंशांदरम्यान राहील. प्रामुख्याने २९ एप्रिल रोजी ते उच्चांकी ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
पुण्यातील पीएफआय संघटनेशी संबंधित शाळेचे दोन मजले सील
पुण्यात NIA ची मोठी कारवाई
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने एका समुदायाच्या नेत्यांच्या हत्या करण्यासाठी कट रचला गेल्याचा NIA च अंदाज
काही दिवसांपूर्वी NIA ने याच शाळेवर टाकली होती धाड
पुण्यातील ब्लूबेल स्कूलच्या चौथा आणि पाचवा मजला सील
या शाळेत मुस्लिम युवकांचे कट्टर पंथीकरण होत असल्याचा NIA च संशय
राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA ने गेल्या वर्षी 22 सप्टेंबर रोजी या शाळेवर टाकली होती धाड