मुंबई : सावरकरांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. राहुल गांधी यांचं वक्तव्य सहन करणार नाही म्हणजे काय करणार? राहुल गांधींच्या थोबाडीत मारणार का?, असं शिंदे म्हणालेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढून निष्ठा सिद्ध करावी, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे. शिवाय मुंबईत आज G 20 परिषद होत आहे. त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतील. राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. तर एच 3 एन 2 विषाणूच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर खरबदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवाय देश-विदेशातील तसंच तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचता येईल….
नवी दिल्ली :
लाल किल्ला परिसरात काँग्रेस नेत्यांचा मशाल मार्च
केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मशाल मार्च
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मशाल मार्चमध्ये झाले होते सहभागी
मार्चपूर्वीच अनेक नेते दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेस नेत्यांकडून पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध
कर्ज ठरतंय Silent Killer
कर्जदारांच्या डोक्यावर ईएमआयची टांगती तलवार
आता निवृत्त झाल्यानंतर ही फेडावा लागेल हप्ता
फ्लोटिंग रेटसची डोकेदुखी वाढली, वाचा बातमी
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारचे सूर बदलले
जुनी पेन्शन योजनेबाबत होऊ शकतो हा निर्णय
निर्णयाचा चेंडू समितीच्या कोर्टात
नवीन पेन्शन योजना अधिक आकर्षक करण्यावर भर
निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा, बातमी एका क्लिकवर
1 एप्रिलपासून बदलणार हे 10 नियम
या नियमांचा काय होणार फायदा, कुठे बसेल तुम्हाला फटका
या दहा नियमांचा असा होईल परिणाम
आता तुमच्या आर्थिक धोरणात असा करावा लागेल बदल, वाचा बातमी
परळी :
आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल होणार
सुषमा अंधारे परळी पोलीस ठाण्यात दाखल
शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य
शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका
डोंबिवली :
डोबिवलीत धक्कादायक प्रकार
रिक्षावाल्याने प्रवाशाला केली दांडक्याने मारहाण
घटना सीसीटीव्ही कैद, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
फेरीवाल्यानंतर आता रिक्षाचालकाची मुजोरी
नियमाप्रमाणे भाडे घेण्यास सांगितले असता रिक्षा चालकांनी प्रवाशाला केली मारहाण
पॅन-आधार लिंक करण्यासाठी दिली मुदतवाढ
ग्रामीण, दुर्गम भागातील जनतेला मुदतवाढीचा फायदा
आता या तारखेपर्यंत करता येईल जोडणी
कांग्रेसच्या खासदाराने गेल्या आठवड्यात मुदतवाढीची केली होती विनंती
मुदतवाढीसोबत शुल्क माफीचा निर्णय झाला का? बातमी एका क्लिकवर
उद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात दिल्ली हायकोर्टाने कारणे दाखवा नोटीस पाठवली त्या बाबतही दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा.
50 खोके एकदम ओके अशा घोषणा विरोधकांनी दिल्यास त्याला कायदेशीर रित्याउत्तर कसे दिले जाऊ शकेल यावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा
महायुती येत्या काही दिवसांत या तिन्ही नेत्यांना कायदेशीररित्या घेरण्याच्या तयारीत
मुंबईत मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती “जिवाची मुंबई” हा मेगा प्लान आखण्याच्या तयारीत
वीर सावरकरांच्या गौरव यात्रेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती
पुणे : पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राजनाथ सिंग करणार मार्गदर्शन
खडकी येथील सिम्बॉयसिस कॅम्पस मध्ये राजनाथ सिंग विद्यार्थ्यांना करणार संबोधित
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. परिषदेचा तहहयात विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा, असे ट्टिट शरद पवार यांनी केले.
राहुल गांधी लवकरच निवासस्थान सोडणार ?
लोकसभा सचिवालयाला राहुल यांचे पत्र
पत्रातील तपशिलाचे पालन करणार – राहुल गांधी
तुगलक रोडवरचे सरकारी निवासस्थान राहुल गांधी लवकरच सोडणार
मोकळ्या जागेत पडलेल्या स्क्रॅपला लागली आग
परिसरात पसरले आगीच्या धुराचे लोट
आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची दोन वाहनं घटनास्थळी
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना समन्स बजवला जाणार
दिल्ली हायकोर्ट समन्स बजावणार
खासदार राहुल शेवाळे यांच्या याचिकेवर सुनावणी
मानहानी दाव्याबाबत झाली सुनावणी
पुढची सुनावणी 17 एप्रिलला होणार
नंदूरबार फ्लॅश :-
– काँग्रेसचे खासदार तथा नेते राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे.
– राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आलं.
– नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आला.
– राहुल गांधी यांची खासदारकी परत न दिल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी दिला…
मुंबई : पोलिसांकडून संजय शिरसाटांचे व्हीडीओ महिला आयोगानं मागवले
संजय शिरसाटांचे व्हीडीओ तपासून महिला आयोग निर्देश देण्याची शक्यता
महिला आयोगानं सुषमा अंधारेंची तक्रारीची घेतली दखल
आज दुपारपर्यंत महिला आयोगाकडून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता
विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
छगन भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह
काल अस्वस्थ वाटू लागल्याने केली होती टेस्ट
रक्त तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर भुजबळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न
हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंच वादग्रस्त वक्तव्य
सावरकारंवर बोलणं थांबलं नाही तर मग मात्र महात्मा गांधीची 100 पापं आम्ही समोर ठेऊ
इंदिरा गांधींनी 11 हजाराची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती
इंदिरा गांधींचा अभ्यास केला असता तर राहुल गांधींनी मुर्खपणाची वक्तव्य केली नसती
राहुल गांधींनी एक दिवस तरी कोठडीत राहावं
या देशाला दुसरा गोडसे परवडणार नाही असं आमचं म्हणणं आहे
गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले
राजकीय पक्षाच्या उद्दीष्टांना टार्गेट ठेवणं बरोबर आहे
आनंद दवेंनी राहूल गांधींना पाठवली अंदमानची टिका
बाईट – आनंद दवे – हिंदू महासंघ…
सावरकारंवर टिका केली की प्रसिद्धी मिळते
सावरकरांवरचा वाद दुर्दैवी, राहुल गांधी हे सावरकर यांचा वापर करत आहेत, मुस्लिम आपल्या पाठीशी येतील म्हणून हा प्रयत्न आहे , राष्ट्रभक्तीचा असा उपयोग करणे गंभीर आहे, असा आरोप रणजित सावरकर यांनी केला.
सावरकर स्मारकात जयंत टिळक अध्यक्ष होते, ते काँग्रेसृमध्ये होते. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भूमिका स्वागतार्ह असली तरी , ज्यावेळी सवकरकर यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण झालं त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट मागितली, कारवाई मागणी केली पण झाली नाही. असे रणजित सावरकर यांनी सांगितले.
6 कोटींहून अधिक सदस्यांसाठी येणार आनंदवार्ता
व्याजदराबाबत ईपीएफओ घेणार मोठा निर्णय
व्याजदर जैसे थे की वाढणार? व्याजात होऊ शकते घट
ईपीएफओवरील व्याजदराबाबत आज होऊ शकतो फैसला
गेल्या कित्येक वर्षांपासून व्याजदरात सातत्याने घसरण
यावेळी काय होणार निर्णय, सर्वांचे लागले लक्ष, वाचा बातमी
बल्लारपूर येथून अयोध्येच्या राम मंदिरासाठी पाठवले जातेय सागवान
मध्य भारतातील सर्वात मोठे लाकूड विक्री केंद्र
वनविभागाच्या वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील मुख्य आगार
अयोध्येसाठी 1855 घनफूट लाकूड नेले जाणार
राज्यभरात शिवसेना काढणार धनुष्यबाण यात्रा, यात्रेच्या जोरदार तयारीला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना
शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर या यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून ८ एप्रिलला होणार
एकनाथ शिंदे विरोधात रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचीही माहिती
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. त्याचा मैदानावर एकनाथ शिंदे यांची धनुष्यबाण यात्रा सुरू होणार असल्याची माहिती
पुन्हा हलणार महागाईचा पाळणा
पेनकिलर्सपासून ते ॲंटिबायोटिकपर्यंत दरवाढ
आता सर्वच औषधांना दरवाढीचा डोस
केंद्र सरकारने दिली परवानगी
एप्रिलपासून कंपन्यांना करता येणार भाववाढ
किती टक्के होणार औषधांच्या किंमतीत वाढ, बातमी एका क्लिकवर
चास-कमान जलाशय परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार मोबाईल कॅमेरात कैद
रात्रीच्या अंधारात पाण्याच्या शोधात बिबट आढळून आल्याने भीती
या मार्गावर रात्रीच्या सुमारास शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते
वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले
गारपीट होऊन पंधरा दिवस ओलांडले तरीही पंचनामे नाहीत
सरकारी अधिकारी तलाठी शेतीच्या बांधावर फिरकले पण नाहीत
नुकसान ग्रस्त शेतमाल काढून टाकण्याची वेळ आली तरीही पंचनामे होईनात
पंचनामे राखडल्यामुळे शेतकरी हवालदिल
सावरकर यांच्या मुद्द्यावर संसदेत शिंदे गटाचे खासदार आक्रमक होणार
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या विषयावर उद्धव ठाकरे यांना घेरले होते
राहुल गांधींच्या विरोधात संसदेत करणार आंदोलन
संजय राऊत यांनी शिंदे गटाला सावरकर यांच्या मुद्यावरुन सुनावले बोल
सावरकर यांच्यासंदर्भात शिंदे यांनी दिलेली स्क्रीप्ट वाचून दाखवल्याची राऊत यांनी केली टीका
नवी दिल्ली : आज करणार आंदोलन,
राहुल गांधींच्या विरोधात संसदेत करणार आंदोलन.
सकाळच्या सत्रात सोन्याचा तोरा उतरला
गेल्या काही दिवसांपासून सोन्यात उसळी
चांदीने मागील रेकॉर्ड केले इतिहासजमा
चांदीच्या किंमती सूसाट, भावात लवकरच नवीन रेकॉर्ड
किंमती मिस्ड कॉलवर जाणून घ्या, वाचा बातमी
सभेसाठी तब्बल 3 हजार 200 स्क्वेअर फुटाच्या स्टेजची उभारणी
मंचावर तब्बल 200 लोक बसण्याची व्यवस्था
सभेला दीड लाख लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती
सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर 2 एप्रिलला होणार आहे उध्दव ठाकरे यांची सभा
काल रात्रीच्या बैठकीत जोरदार चर्चा
शरद पवार यांनीही कालच्या बैठकीत मत मांडलं
सावरकर आणि आरएसएस यांचा संबंध नाही, त्यांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही
सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत
शरद पवारांच्या मतावर अनेक खासदारांनी सहमती दर्शवली
बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा मोठा परिणाम
चीनच्या या खेळीमुळे झाली दरवाढ
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय झाला परिणाम
भावात झाली का पुन्हा वाढ, की दिलासा कायम, वाचा बातमी
ब्रेकिंग :-
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले
गारपीट होऊन पंधरा दिवस ओलांडले तरीही पंचनामे नाहीत
सरकारी अधिकारी तलाठी शेतीच्या बांधावर फिरकले पण नाहीत
नुकसान ग्रस्त शेतमाल काढून टाकण्याची वेळ आली तरीही पंचनामे होईनात
पंचनामे राखडल्यामुळे शेतकरी हवालदिल
काँग्रेस खासदारांची आज बैठक
सकाळी साडेदहा वाजता होणार बैठक
संसदेच्या अधिवेशनापूर्वी राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार बैठकीला उपस्थित राहणार
सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार
नाशिक : एप्रिलपासूनच आठवड्यात एक दिवस पाणीकपात होण्याची शक्यता
राज्य शासनाला तसा प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू
आज राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत होणार अंतिम निर्णय
शिवाजी विद्यापीठ परिसरात भुयारी मार्गासाठी आठ कोटी 48 लाखाचा निधी मंजूर
अर्थसंकल्पात मंजूर कामाला मिळाली प्रशासकीय मंजुरी
शिवाजी विद्यापीठाचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तयार केला जाणार भुयारी मार्ग
नव्या बाहेर मार्गामुळे जुन्या पुणे बेंगलोर मार्गावरील विद्यार्थी शिक्षक आणि प्रशासनाची वर्दळ थांबणार
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून होतोय भुयारी मार्ग
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची साखर बंद करून दाखवाच
फसवणुकीची तक्रार केलेल्या शेतकऱ्यांची साखर बंद करण्याचा मुश्रीफ समर्थकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा घाटगे यांचा आरोप
शिंदेवाडी येथील जलजीवन योजनेच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी दिल आव्हान
किरीट सोमय्या परवडतील पण मी परवडणार असल्याचा केला पुनरुच्चार
आळेफाटा /पुणे
नगर कल्याण महामार्गावर पिकअप जीप दुचाकीच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू यामध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश..
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज पुणे दौऱ्यावर
खडकी रेंजहिल्स परिसरात संयुक्त लष्करी सरावाची करणार पाहणी
भारत आफ्रिका खंडातील 23 राष्ट्रांच्या फिल्ड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या तयारीचा घेणार आढावा
28 आणि 30 मार्चदरम्यान लष्कर प्रमुखांची परिषद आयोजित केली आहे
डोंबिवलीत पाच लाखाचा गुटखा जप्त
कल्याण शीळ रस्त्यावर सोनारपाडा गाव हद्दीत एका होन्डा सीटी कारमधून सुरू होती गुटख्याची तस्करी
ग्रस्त घालताना पोलिसांना संशय आल्याने मोटारीची झडती असता गुटका तस्करी आली उघडकीस
मानपाडा पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेत सुरू केला तपास
पुणे
पीएमपीच्या प्रवासासाठी आता ऑनलाईन पेमेंटची सुविधा
उद्यापासून प्रायोगिक तत्त्वावर एका बसमध्ये ऑनलाईन पेमेंटचा राबवला जाणार प्रयोग
सगळे व्यवहार ऑनलाईन झाल्यानं अनेक प्रवासी ऑनलाईन पद्धतीने पेमेंटची मागणी करतात
उद्यापासून पीएमपी हा प्रयोग राबवणार आहे…
एच 3 एन 2 ने पुणेकरांची चिंता वाढवली
पुण्यात दोन रुग्णांचा एच 3 एन 2 झाला मृत्यू
एक 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक तर 37 वर्षीय महिलेचा झाला मृत्यू
खाजगी रुग्णालयात दोघांवर सुरू होते उपचार
मृत्यू पडताळणी समितीनं दिला अहवाल
शनिवारवाड्याच्या 100 मीटर परिघातीव बांधकामावरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक
लवकरच केंद्र सरकारला या संदर्भातला प्रस्ताव पाठवला.जाईल
जून्या वाड्याचा पुर्नविकास व नवीन बांधकामांना परवानगी यासाठी अनेकांच्या तक्रारी आहेत
काल पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी झालेल्या राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे….