आज दिनांक 30 सप्टेंबर 2022 जाणून घेणार आहोत देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि शशी थरूर आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज देशात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. राज्यात सध्या दसरा मेळाव्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये आरोप -प्रत्यारोप सुरूच आहेत. जाणून घेऊयात प्रत्येक अपडेट.