नागपूर : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रात सात जूनपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सात जूनपर्यंत बहुतेक सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत ईशान्यकडील भागात जोरदार पर्जन्यवृष्टी होणार आहे. हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस बरसेल. जून महिन्यात राज्यात सामान्य पाऊस राहणार आहे. पाच जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात (maharashtra weather) पोहचेल. नैऋत्य मोसमी पावसाची गती मंद असेल. मान्सून जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. यंदा तो सामान्यापेक्षा जास्त असण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं (Department of Meteorology) नोंदविलाय.
i) Increase in rainfall activity likely over South Peninsular India from 07th June.
ii) Intense spell of rainfall over Northeast India and Sub-Himalayan West Bengal & Sikkim during next 5 days. pic.twitter.com/UFLgM7b6sF हे सुद्धा वाचा— India Meteorological Department (@Indiametdept) June 4, 2022
राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली. पण, जिल्ह्यातील बहुतांश भागात सात जूननंतर खऱ्या अर्थानं पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. त्यामुळं मुंबईत मान्सूनची प्रतीक्षा वाढली आहे. सात जूनला महाराष्ट्रात मान्सून धडकणार असल्याचा हवामानशास्त्र विभागानं अंजाद वर्तविलाय. तामिळनाडू, कोकण आणि गोव्याच्या भागात पावसाची शक्यता आहे. मान्सूननं आतापर्यंत अरबी समुद्राचा काही भाग प्रवास केला. तामिळनाडूचा काही प्रदेश, दक्षिण-पूर्व बंगालची खाडी या भागातूनही मान्सूननं प्रवास केलाय.
विदर्भात उष्णतेची लहर कायम आहे. काल नागपुरात 46.2 अंश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवड्यात आकाश ढगाळलेलं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात 46.4 अंश तापमानाची नोंद झाली. सहा जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश ढगाळलेलं राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अकोल्यात 43.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर आकाश ढगाळलेलं राहण्याचा अंदाज आहे. नागपुरात 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. त्यानंतर आकाश ढगाळलेलं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.