राज्यपाल विधानभवानात अवघ्या काही मिनिटांपूर्वी पोहचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचं स्वागत केलं. त्यानंतर आता राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. बेळगाव प्रश्नावरुन ठाकरे गटाच्या आमदारांनी ही भूमिका घेतसी आहे. कर्नाटक सरकार अन्याय करत असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलं.
पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण करण्यात आलं आहे. आमदार टिळेकर यांचे मामा सतिष वाघ यांचे शेवाळ वाडीतून अपहरण केल्याची माहिती आहे. वाघ आज सकाळच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले होते. तेव्हा चारचाकी शेवरलेट एन्जॉय या गाडीतून त्यांचं अपहरण करण्यात आलं. वाघ यांचे चार चाकी वाहनातून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याची माहिती आहे.
नंदूरबारमधून मोठी बातमी समोर आली आहे. धडगाव शहरातील आदिवासी समाज शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांचा विरोधात आक्रमक झाला आहे. महिलेच्या विनयभंग मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाजात प्रचंड संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात धडगांव शहरांत निषेध मोर्चा काढण्यात आला. शेकडो आदिवासी बांधव पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले. आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आदिवासी पारंपारिक मयतीत वापरण्यात येणाऱ्या मांदल वाद्य वाजवून निषेध व्यक्त केला. हातात काळे फिती काळे झेंडे घेत रोष व्यक्त केला. महिलेला मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरवण्याबाबत सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून तातडीचं पाऊल उचलण्यात आलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार विभागाची मंत्रालयात रविवारी तातडीची बैठक घेऊन त्रिसदस्यी समिती स्थापन केली.
संघटनेची कामगारांचे थकीत वेतन मिळावे, साखर उद्योगातील रोजंदारी, कंत्राटी नैमित्तिक कामगारांनाही समितीच्या करारप्रमाणे वेतनवाढ मिळावी अशी प्रमुख मागणी आहे.
बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना मरिहार पोलीस स्टेशन मध्ये आणलं. ताब्यात घेतलेल्या जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई केली जाणार.
पोलीस ठाण्यात देखील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचे दबाव तंत्र. पोलीस स्टेशन परिसरातील चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना देखील पोलिसांकडून मज्जाव घालण्यात आला आहे.
मी 208 मतांनी विजयी झालो, माझ्या विजयाची टिंगल उडवली जाते, पण तो टिंगलीचा विषय होऊ शकत नाही. जनतेने दिलेल्या निर्णयाची, मतांची येथे टिंगल झाली – नाना पटोले
राहुल नार्वेकरांचं अत्यंत संयमाने काम, गेल्या वेळी नार्वेकरांनी कोर्ट म्हणून जास्त काम केलं. सुनावणीवेळी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. असा निकाल दिला की सुप्रीम कोर्टाने त्यावर अजून निकाल दिलेला नाही – जयंत पाटील यांची टोला.
आमची बाजू खरी आहे हे नागपूर अधिवेशनात दाखवून देईल. लोकसभेत आमच्या जागा कमी आल्या तेव्हा आम्ही रडलो नाहीत. 31 जागा आल्या तेव्हा ईव्हीएम गारगार वाटत होतं, आता गार वाटतंय की गरम ते तुमचं तुम्हीच बघा, ईव्हीएमच्या आरोपांवरून अजित पवारांनी साधला विरोधकांवर निशाणा
अध्यक्ष निवडीवर ठाकरे गटाचा बहिष्कार. आंदोलन करून झाल्यावर ठाकरे गटाचे आमदार विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात बैठक सुरु आहे. पुढील भूमिका ठरवण्यासंदर्भात ठाकरे गटाची बैठक
बाबासाहेबांचं संविधान कधीही बदलू शकत नाही. 50-60 वर्षांत संविधानाची आठवण ठेवली का ? एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसला सवाल.
छत्रपती संभाजीनगर- ईव्हीएमविरोधात क्रांती चौकात आंदोलन करण्यात येत असून आंबेडकरी चळवळीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. ईव्हीएमविरोधात आंबेडकरी चळवळीने तीव्र निदर्शने केली आहेत.
बेळगावात आज एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून या महामेळाव्याला कर्नाटक पोलिसांची परवानगी नाही. तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती मेळावा घेण्यावर ठाम आहे.
“राहुल नार्वेकरांचं दालन सर्वपक्षीयांसाठी कायम खुलं राहिलं. विरोधी पक्ष ज्या गोष्टी मांडेल त्या आम्ही स्वीकारू. आम्ही राजकीय विरोधक पण नाना माझे मित्रच आहेत. गेले अडीच वर्ष खूप कन्फ्युजन होतं. कोण कुठे होतं ते समजत नव्हतं. गेले अडीच वर्ष नार्वेकरांनी न्यायाधीशाचं काम जास्त केलं. नार्वेकरांवर काहींनी पातळी सोडून टीकाही केली. परंतु नार्वेकरांनी शांतपणे आपलं काम पार पाडलं,” असं फडणवीस म्हणाले.
“गेले काही वर्ष राहुल नार्वेकरांच्या ज्ञानाचा कस लागला. पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आतापर्यंत चार जणांना मिळाला. नार्वेकर हे अतिशय तरुण वयात विधानसभा अध्यक्ष झाले. त्यांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. अडीच वर्षांत नार्वेकरांनी वेगळी प्रतिमा तयार केली. अध्यक्षांनी सभागृहाचा चेहरा बदलला,” असं फडणवीस म्हणाले.
“राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाल्याचा मला आनंद आहे. अध्यक्षांनी मी पुन्हा येईन म्हटलं नव्हतं, तरी पुन्हा आलात. राहुल नार्वेकर हे सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष आहेत,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचेही आभार मानले आहेत.
कोल्हापूर- शिवसैनिकांना पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावर अगोदरच अडवलं. कर्नाटक सरकारचा निषेध केला. पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली. बेळगावच्या दिशेने आम्ही जाणारच, अशी भूमिका घेत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकरांची एकमताने निवड झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून विधानसभेच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाज आणि दुपारी मंत्रिमंडळ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, विधानभवन मुंबई असा त्यांचा आज दौरा असणार आहे. यानंतर सायंकाळी राज्यपालांचे संयुक्त संबोधन आणि सल्लागार समिती बैठकीला जाणार आहे
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून उबाठा सेनेचे कार्यकर्त्यांनी रॅलीने बेळगावकडे जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याने सीमेवर तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज चौकात वरिष्ठ अधिकारी तळ ठोकून आहेत.
जालना जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव आणि विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रब्बी हंगामाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. जालना जिल्हयात यंदा 1 लाख 90 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असून 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या. यामध्ये सर्वाधिक ज्वारी पिकांची 70 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली. त्याखालोखाल हरभऱ्याच्या क्षेत्रात देखील वाढ झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेना आमदार यांची आज दुपारी महत्वाची बैठक पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना विधीमंडळ कार्यालयात आमदारांची २ वा बैठक होणार आहे. या बैठकीत हिवाळी अधिवेशनात कोण कोणत्या महत्वाच्या विषयावर चर्चा करायची यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच नवीन आमदारांना अधिवेशन कामकाज समजावून सांगण्याबाबत मार्गदर्शन केलं जाणार असल्याची माहिती
दिल्लीतील 40 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी… ई-मेलच्या माध्यमातून शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी…
1500 रुपयांमध्ये बहिणींची मतं विकत घेतली… सरकार आता लाडक्या बहिणींचे निकष बदलणार… लाडकी बहीण योजनेत कोणतीही शहानिशा न करता 1500 रुपये दिले…. निवडणुकीआधी मतांसाठी निकषाविना पैसे दिले… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
नागपूर – द्वारका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन… नागपुर गज्ञेशपेठमधील द्वारका हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन…
सोलापूर शहरातील मनपाच्या 11 शाळेमध्ये असणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर… सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी पालिका प्रशासनाची खबरदारी… महानगरपालिकेतील शाळेत सीसीटीव्ही बसवण्याच्या मोहिमेला सुरुवात… सोलापुरातील मनपाच्या 57 प्राथमिक आणि सहा माध्यमिक शाळेमध्ये असणार सीसीटीव्ही कॅमेरे… सोलापुरातील 11 शाळेंमध्ये 48 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तर उर्वरित 52 शाळांसाठी लागणार 233 सीसीटीव्ही कॅमेरे… जिल्हा नियोजन समितीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी 56 लाखांचा प्रस्ताव… सोलापूर महानगरपालिकेचे उपआयुक्त तैमूर मुलानी यांची माहिती
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ न्याया यात्रा… जिल्ह्यातील हिंदू नागरिकांनी आणि धर्म रक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन… ‘हिंदू म्हणून रस्त्यावर दिसाल’ का नाशिक मध्ये लागलेत बॅनर… दहा तारखेला नाशिक शहरात निघणार हिंदू बांधवांची न्याय यात्रा…
वाढत्या बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे बागायतदार कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत… अनेक शेतकरी कापसाच्या उभ्या पिकावर फिरवत आहे रोटावेटर… बोंड आळी आणि मजूर टंचाईमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत… शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर पिकावर रोटावेटर फिरवला…
फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने निफाडमध्ये थंडीचे जोरदार पुनरागमन झालं आहे. निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला आहे. ओझर HAL येथे 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 6 ते 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीपासून उब मिळवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत.
राज्यात 105 लाख टनाचे ऊस गाळप साखर उत्पादनात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. 143 राज्यातील साखर कारखान्याकडून 80 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तयार आहे. राज्यात परवाना दिलेले 42 कारखाने हे कारखाने सुरू झाले तर गाळपाचा वेग आणखी वाढेल. पुणे विभागातील 26 साखर कारखाने मिळून 26.56 लाख टन ऊस गाळप पूर्ण केलं आहे.
राजधानी दिल्लीतल्या दोन शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. आर के पुरम आणि पश्चिम विहारमधील दोन्ही शाळांना धमकीचा ई-मेल आला आहे. शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सकाळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने पुन्हा घरी पाठवलं आहे. बॉम्बशोधक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालं आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 100 पेक्षा जास्त पोलीस धर्मवीर संभाजी महाराज चौकात दाखल झाले आहेत. महामेळाव्याला परवानगी नाकारल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीने संभाजी महाराज चौकात एकत्र येत निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर कर्नाटक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. आज या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तर येत्या 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. शरद पवार संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद आता पुन्हा एकदा चिघळला आहे. बेळगावच्या धर्मवीर संभाजी महाराज चौकात कर्नाटक पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हरियाणा- पंजाब राज्यदरम्यानची शंभू बॉर्डर खुली करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.