अहमदनगरः गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवल्याचं चित्र आहे. परंतु तिसऱ्या लाटेचं संकटही अजून कायम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये आजपासून लॉकडाऊनचे आदेश देण्यात आलेत. या आदेशानुसार मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले असून त्यांच्या आदेशानुसार आजपासून 11 तालुक्यांतील तब्बल 61 गावांत लॉकडाऊन करण्यात आलाय.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24 गावांचा यात समावेश आहे. आजपासून 13 ऑक्टोबरपर्यत हा कडक लॉकडाऊन लावण्यात आलाय. यामध्ये संगमनेर तालुक्यातील तब्बल 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आलाय.
अहमदनगर जिल्ह्यांत सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव आढळून आलाय. दिवसभरात आज नगरमध्ये 424 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. ज्या गावांत 10 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, अशा गावांमध्ये हा लॉकडाऊन लादण्यात आलाय. जिल्ह्यात जवळपास दररोज 500 ते 800 च्या घरात रुग्ण सापडत असून, पॉझिटिव्हिटी रेटही 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
संबंधित बातम्या
मुंबई APMC मध्ये शेतमाल पाठवत असाल तर सावधान! शेतकऱ्यांच्या फसवणूक, अडवणुकीचे प्रकार समोर
कुटुंब बाहेरगावी जाताच चार वॉचमनमध्ये कट शिजला, नवी मुंबईत 25 लाखांची घरफोडी
maharashtra lockdown Danger increased Lockdown in 61 villages in Ahmednagar districts of the maharashtra