मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांना खात्याचं वाटप केलं आहे. काही मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली आहे.
Chandrayaan 3 Successful Launch | चंद्रावर जाण्याआधी चांद्रयान 3 ला अजून बऱ्याच अग्निपरिक्षा द्यावा लागणार, नेमकं काय घडणार? वाचा सविस्तर…..
Chandrayaan 3 Successful Launch | चंद्रावर जाण्याआधी चांद्रयान 3 ला अजून बऱ्याच अग्निपरिक्षा द्यावा लागणार, नेमकं काय घडणार? वाचा सविस्तर…..
अमरावती :
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा मोठा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?
“खातेवाटपला खूप वेळ लागला. अजित पवार यांनी अट्टहास करून चांगली खाती मिळवली. या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, अस माझं मत आहे. एकनाथ शिंदे यांची गोची झालीय. एकनाथ शिंदे यांनी मविआची तोडमोड केली. महाविकास आघाडी काही वाईट होती का? मुख्यमंत्र्यांना जसं महत्त्व पाहिजे तसं महत्त्व एकनाथ शिंदे यांना मिळत नाही. ज्या काही वाटचाली सुरू आहेत त्यावरून मला वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसणार नाही. ही खिचडी सरकार कोणाच्या फायद्याची आणि नुकसानीची आ,हे हे मला कळत नाही. बच्चू कडू यांना कोणीही सिरियस घेत नाही”.
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून राज्यपाल #रमेश_बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. pic.twitter.com/FtLxN105M7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 14, 2023
सुरेश खाडे यांच्याकडे कामगार, तर संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तर संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे ग्राम विकास आणि पंचायत राज आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय असणार आहे.
विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे.
अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेलं कृषी खातं आता धनंजय मुंडेकडे आलं आहे. तर अब्दुल सत्तार यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांंच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खातं देण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्याच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, उर्जा आणि राजशिष्टाचार ही खाती आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर अजित पवार यांना अर्थखातं मिळालं आहे.