मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra rain update) आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (today heavy rain) शक्यता आहे. मागच्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. चार दिवसांपासून सततधार असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (orange alert kokan) जारी करण्यात आला आहे. आज मुसळधार पावसाची (Maharashtra Mumbai Rains IMD Updates) शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी आणि नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री जोरदार पाऊस झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. समुद्र खवळला असून आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने दिलासा दिला आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात केवळ ७ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. सध्याच्या पावसामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.
मागच्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राजापूरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता राजापूर शहराल पाण्याचा सुरळीत पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेने जाहीर केली आहे. राजापूर शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात होता. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं नगरपरिषदेने जाहीर केलं होतं.
मुंबईत काल दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी सुरु आहेत. ढगाळ वातावरण असल्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या पावसानंतर मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे आज प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी सतर्क ठेवले आहेत. सध्या अंधेरीसह उपनगरात आता पाऊस बंद आहे.
अंधेरीचा भुयारी मार्ग सध्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला आहे. कालच्या पावसाने पाणी तुंबल्याने हा भुयारी मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला होता.