मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळतोय. तर नांदेड आणि गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालीय. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर पोहोचलेत. तिथे असलेल्या पूरस्थितीचा आढावा ते घेत आहेत. तसंच संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचनाही त्यांनी केलाय. तिकडे नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर शहराला (Navapur City) पावसाचा फटका बसण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. तर नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून 144 कलम केले लागू
मान्सून काळात निसर्गाचा, तसेच धबधबे, तलाव, धरण, समुद्र किनारी आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठयप्रमानात येतात.
अतिवृष्टी मध्ये पर्यटकांची जीवित किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय। परिमंडळ 2 चे पोलीस आयुक्त संजयकुमार पाटील आजपासून पर्यटन स्थळ, धोकादायक परिसरावर केला मनाई आदेश जारी
पर्यटन स्थळावर किंवा स्थळापासून 1 किलोमीटर अंतरा पर्यंत पर्यटकांना मनाई आदेश जारी केला आहे. या परिसरात फोउजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) हेही लागू केले आहे.
– पर्यटन स्थळावर पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे, धबधब्याच्या उगमस्थान जाणे किंवा पोहणे, सेल्फी काढणे, नैसर्गिक पर्यटन किंवा धोकादायक ठिकाणी मद्यपान करणे, बाळगणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे किंवा चालवणे, या सहा अन्य काही बाबीनवर पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.
मुंबई- राज्यात 20 जुलैला राज्यभरात होणार होती परीक्षा मात्र आता पावसामुळे ती 31 जूलैला परीक्षा होणार. परीक्षेसाठी नवीन हॉलतिकीट काढण्याची गरज नाही ते ग्राह्य धरलं जाणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
नांदेड: जिल्ह्यातील पूरस्थिती निवळण्यास सुरुवात, गोदावरी-पैनगंगा नद्यांचे पाणी हळूहळू होतेय कमी, अनेक रस्ते वाहतुकीसाठी पुन्हा खुले, सहा दिवसानंतर काही भागात सूर्यदर्शन, पासदगाव इथल्या आसना नदीत वाहून गेलेल्याचा अद्याप शोध लागेना.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर नवसारी आणि गुजरातच्या इतर भागात पाणी साचले आहे. लहान वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे वाहतूक अत्यंत मंदावली आहे. गुजरातकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गुजरातमध्ये महामार्ग मोकळा होईपर्यंत प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे किंवा त्यांना अडथळे येऊ शकतात. असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी केले आहे,
रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरच्या अंजनी-चिपळूण दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली आहेत. युद्ध पातळीवर दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या अर्ध्या तासात रेल्वे ट्रॅक सुरळीत होणार असा दावा कोकण रेल्वेने केला आहे.
गडचिरोली- तेलंगणा-महाराष्ट्र सीमावर्ती भागात, तेलंगणा राज्यातील सोमनपल्ली येथे पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरने दोन नागरिकांना रेस्क्यू करण्यात आला जिल्ह्यात मेडीगट्टा धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे मोठा पुराचा फटका महाराष्ट् सीमावर्ती भागात व तेलंगणा सीमावर्ती भागाला बसलेला आहे. गंभीर परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली असून या या पुराचा फटका तेलंगणा राज्यातील चन्नुर सोमनपल्ली या गावालाही बसला होता. नगरम येथील हनुमान मंदिरही पुराच्या पाण्याने वेढले आहे.
कोल्हापूर – गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होतेय. कोल्हापुरातील प्रयाग संगम या ठिकाणी कुंभी,कासारी, भोगावती या नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा नदी प्रवाहित होते. या संगमाच्या ठिकाणी सध्या पाण्याचं विस्तीर्ण रूप पाहायला मिळतय. संगमावर असलेलं दत्त मंदिरदेखील आता पूर्णपणे पाण्याखाली गेलं असून मुख्य पुलाबरोबर पाण्याचा प्रवाह सुरू आहे. प्रयाग संगमाच्या ठिकाणी वाढत असलेल्या पाण्याची पाहणी आज एनडीआरएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
पालघर – तानसा धरण लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. तेव्हा 2 ते 3 दरवाजे उघडे करून 93.78 क्युसेक्स पर्यंत विसर्ग होउ शकतो. त्यामुळे तानसा नदीकाठच्या 33 गावांना इशारा देण्यात आला आहे
चंद्रपूर- पुरात अडकलेल्या २२ ट्रक ड्रायव्हरना वाचवण्यात आले आहे. घुग्गुस-भोयेगाव मार्गावर आज पहाटे करण्यात रेस्क्यू करण्यात आले आहे. भोयेगाव पुलावर पाणी असल्यामुळे या ठिकाणी ट्रक थांबले होते. मात्र काल रात्री अचानक वर्धा नदीचे पाणी वाढल्याने थांबलेल्या ट्रकच्या मागच्या बाजूने देखील पुराचा वेढा पडला होता. पोलीस विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या टीमने सर्व ट्रकचालकांना बोटीच्या मदतीने काढले बाहेर
पुणे- जिल्ह्यातील भोर तालुक्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. भातशेती पाण्यात वाहून गेली आहे. भाताच्या खाचरातील मातीही वाहून गेली आहे. शेकडो हेक्टरवर भात शेतीचं नुकसान झालं आहे.
विदर्भातील बहुतांश भागात उद्या येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गडचिरोलीत ॲारेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंत्रणेला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय, तर गडचीरोली जिल्ह्यात ॲारेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. त्यानंतर पुढील पाच दिवस विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज आहे.
नांदेडमध्ये गेल्या सहा दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेय. नदी नाल्याना आलेल्या पुरामुळे शेत जमिनीचे प्रचंड असे नुकसान झालेय. आज सकाळ पासून पाऊस ओसरला असला तरी पुराचे पाणी अद्यापही शेतात साचूनच आहे. आता शेतात पंचनामा करायला काहीच शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे नांदेडमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
विरार :- वसईच्या तानसा नदीला पूर आला आहे. नदीचे पात्र दुतर्फा भरून वाहत असून आजूबाजूच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या आजुबाजुला एक किलोमीटरपर्यंत पाणीच पाणी झाले असून, अनेक घरांतही पाणी गेले आहे.भाताने, नवसई , मेढा , चिमणे , खनिवाडे, हेदवडे , काशीद कोपर, आडाने , पारोळ, आंबोडे , शिरवली , घाटघर थाळ्याचा पाडा , जांभूळ पाडा या गावांचा संपर्क तुटला आहे. जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत 15 ते 20 किलोमीटर चा वळसा घालून गावांना संपर्क करावा लागत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची रिप -रिप सुरू असल्याने नदी नाले ओसंडून वाहत असल्याने हजारो हेक्टर वरील शेतातील कोवळी पिके पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहेत , घरांचीही पडझड झालेली आहे. शहरातून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पूले वाहून गेल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क होत नाहीये.
जळगाव – संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ज्या धरणावर अवलंबून आहे ते गिरणा धरण 80 टक्के भरले असून कुठल्याही क्षणी गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती गिरणा पाटबंधारे विभागाने दिली आहे.
अमरावती: अमरावती जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरांची पडझळ होत आहेत. अशातच अमरावतीमध्येही एक इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. अमरावतीच्या गांधी चौक ते राजापेठ चौक रस्त्यादरम्यान असलेल्या कन्हैया दूध डेरी व एक इलेक्ट्रॉनिक दुकान असलेली दोन मजली इमारत दुपारी एक वाजता च्या सुमारास इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळणार याची शक्यता वाटल्याने व्यावसायिक दुकानाबाहेर पडले होते त्यानंतर दहा मिनिटातच इमारत पत्त्यासारखी कोसळली. कोसळलेली इमारत ही 35-40 वर्ष जुनी असल्याची माहिती मिळाली आहे. इमारत कोसळतात पोलीस प्रशासन व महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून, सध्या जेसीबीद्वारे रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सायखेडा येथील नदीकाठचे स्थलांतरित नागरी घराकडे येण्यास सुरुवात झाले आहे मात्र चिखल आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई उद्भवण्याच्या भीतीमुळे चिंताग्रस्त झाले
जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून 17 गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवले त्यातून एक गर्भवती महिलेची प्रसूती पण झाली बाळ माता सुरक्षित आहेत
सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली सोमनुर या गावातून तीन गर्भवती महिलांना जीवाची बाजी लावून काल सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले
दक्षिण गडचिरोली असलेल्या सिरोंचा अहेरी एटापल्ली भामरागड मुलचेरा या पाच तालुक्यात पच्चवीस आरोग्य पथके तैनात
आरोग्य विभागाची तात्काळ बैठक सुरू असताना आढावा घेतला आमचा प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी
कोकणात भातशेतीसह इतर शेती उत्पादनांच्या कामांना सुरुवात होते. गावोगावच्या शेतात शेतकरी कधी एकटा तर कधी सहकुटुंब, शेजारपाजा-यांसह राबताना दिसतो. या भूमिपुत्रांसोबत अनेकदा नेहमीच्या वापरातील कपडय़ांसहित चिखलात बिनधास्त वावरणारे युवक-युवतीही दृष्टीस पडतात. साहजिकच पाहणा-यांची नजर वळते आणि ज्यांना हे माहीतच नसते, त्यांना कुतूहल निर्माण होते.
Maharashtra: 10 workers stuck in swollen Vaitarna river rescued by NDRF
Read @ANI Story | https://t.co/atdX3T3H6b#MaharashtraRain #NDRF #Vaitarnariver pic.twitter.com/spzeN0v1pd
— ANI Digital (@ani_digital) July 14, 2022
कुकडी प्रकल्पांतर्ग असलेल्या पाच धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील 24 तासात मोठी वाढ झाली आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या वडज धरण लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने मीना नदीला पूर आलाय. वडज धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग मीना नदीपत्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या नारायणगाव, खोडद आदि गावच्या लोकवस्तीला धोक्याचा इशारा देण्यात आलाय. धरणात सुमारे 50 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.त्यामुळे काळजी घेण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.
कोल्हापुरातील विशाळगडाचा दगडी बुरुज ढासळला
लोखंडी जिन्याच्या बाजूच्या बुरुजाचा काही भाग कोसळला
बुरुज ढासळल्याने लोखंडी जिना वाहतुकीसाठी बंद
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद ठेवला आहे
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणारं नीरा नदीवरील नेकलेस पॉईंटचं विहंगम दृश्य
पडणाऱ्या पावसानं नदीला आलं पाणी
भोर तालुक्यात पडलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान
नेकलेस पॉईंटचं हे विहंगम दृश्य पाहा आकाशातून !
टीव्ही 9मराठीनं ड्रोन मधून घेतला आढावा !
वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला. सखल भागात पाणी साचनण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पालघर जिल्ह्याला आज दिवसभर रेड अलर्ट जाहीर केला आहे.
आज वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कॉलेज ला सुट्टी जाहीर केली आहे.
दिवसभरात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
आज ११ वाजताची वसई पंचवटी नाक्यावरील ही दृश्य आहेत
– शहरातील कोंढवा बुद्रुक गावठाण येथील दत्त मंदिरासमोरील वाड्याची भिंत शेजारच्या घरावर कोसळली. अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद देत वाड्याशेजारील तीन घरातून ११ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील सीतान आणि धबधबा प्रवाहित झाला आहे औरंगाबाद जिल्ह्यात जोरात पाऊस झाल्यामुळे या धबधब्याला पाणी आलेला आहे त्यामुळे वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर पडली आहे तब्बल 200 फूट उंचावरून सीता नानीचा धबधबा सध्या कोसळू लागला आहे त्यामुळे पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण बनला आहे
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे त्यामुळे मोडकसागर धरणातून 224.03 cumecs पाण्याचा विसर्ग होत मुंबई महानगरपालिका यांनी या अगोदरच पालघर व ठाणे जिल्ह्यातील नदीकाठच्या 42 गावांना इशारा दिला आहे
नवी मुंबईत सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता बरसायला सुरुवात केली आहे
जुईनगर, बेलापूर, वाशी या ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे
कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ
कराडच्या प्रितीसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली
धरणातुन सोडलेले पाणी व पडत असलेला पाउस यामुळे पाणी पातळीत वाठ
मध्यरात्रीनंतर खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातला पावसाचा काहीसा कमी झाल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय….सकाळी सहा वाजल्यापासून धरणातून 10 हजार 246 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय… त्यामुळं भिडे पुलावरचे पाणी ओसरले आहे….. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा पूल वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलाय
विरार:- वसई विरार मध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे..
सकाळी 9.30 पासून पावसाला सुरवात झाली असून, वाऱ्या सह जोरदार पाऊस पडत आहे..
आज दिवसभर पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे..
आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे..
नाशिक – शहराला जोडणारा रामसेतू पूल ‘रामभरोसे’
रामसेतू पुलावर पुराच्या पाण्यामुळे मोठे खड्डे
तीन वर्षांपासून पुलाची ना दुरुस्ती, ना डागडुजी
धोकादायक रामसेतू पुलावरून नागरिकांची ये – जा सुरूच
पूल कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती..
रामसेतू पुलाच्या तात्काळ दुरुस्तीची रहिवाशांची मागणी
अमरावतीच्या अप्पर वर्धा धरनाचे 7 दरवाजे उघडताच धरणावर पर्यटक येण्यास सुरवात…
अमरावती: मागील चार दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी नाल्यांनाही पूर आला आहे .सोबतच अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने धरण 75 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे 13 पैकी सात दरवाजे उघडले आहे. दरम्यान दरवाजे उघडल्याची माहिती मिळतात पर्यटकांची पावले आता अपर वर्धा धरणाकडे वळू लागले आहे..
अणुस्कूरा घाटात कोसळलेली दरड केली बाजूला
अणुस्कूरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू
बांधकाम विभागाच्या प्रयत्नानंतर पडलेली दरड केली बाजूला
राजापूर मार्गे कोल्हापूरला जोडणारा हा घाट
मुसळधार पावसाचा परिणाम कोकणातील घाट रस्त्याला देखील
पालघर जिल्हा पावसाची तालुका निहाय अहवाल दिनांक 14/07/2022 (8 am to 8pm)
1)वसई:- 80मी मी
2)जव्हार:- 237.66मी मी
3) विक्रमगड:- 296.50मी मी
4) मोखाडा:- 154.50मी मी
5) वाडा :- 267.75मी मी
6)डहाणू :- 232.66मी मी
7) पालघर:- 220मी मी
8) तलासरी :- 290.15मी मी
एकूण पाऊस :- 1779.22मी मी
एकुण सरासरी :- 222.40 मी मी
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर
High Tide
12:33hrs – 4.82mtr
Low tide :
18:43 hrs- 1.53 mtr https://t.co/yepjivSETF— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2022
खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती
खडकवासला धरणातून नदी पात्रता करण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग केला कमी
सध्या धरणातून 4 हजार 807 पाण्याचा विसर्ग सुरु
खडकवासला धरणात 54 मिमी पावसाची नोंद
मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 50.97% टक्के पाणीसाठा
-गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली
-24 तासात धरण परीक्षेत्रात 144 मिलिमीटर पाऊस पडलाय त्यामुळे तब्बल अवघ्या 12 तासात 7.30% टक्के इतका पाणीसाठ्यात वाढ झाली, यामुळं पाणी कपातीच संकट दूर झालं
-असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास जुलै च्या शेवटच्या आठवड्यात धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात शिरले इरई नदीचे पाणी…
रहमत नगर, राजनगर आणि सहारा पार्क या भागातल्या अनेक घरांमध्ये इरई नदीच्या पाण्याचा शिरकाव,
महानगरपालिकेच्या पथकाने रहमतनगर परिसरातून 15 ते 20 लोकांना हलविले सुरक्षित स्थळी,
इरई धरणाचे सर्व म्हणजे 7 दरवाजे अजूनही 1 मीटरने सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत होत आहे सातत्याने वाढ
कोयना धरणात 43.18 tmc पाणीसाठा झाला
धरणात 55182 कयुसेक पाणी आवक सुरु
कोयना नदीपात्रात 1050 कयुसेक पाणी विसर्ग
धरण पाणलोट क्षेत्रात
कोयनानगर 112 मिलिमीटर
नवजा 121 मिलीमिटर
महाबलेश्वर 270 मिलीमीटर
पाऊसाची नोंद झाली
विदर्भात पावसाची विक्रमी हजेरी
आठवडाभरात जून -जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नोंद
अजूनही पावसाचा इशारा असल्याने परिस्थिती आणखी वाईट होणार का ?.
विदर्भात 13 जुलै पर्यंत सरासरी 299 मिमी पावसाची नोंद होते मात्र यावेळी तब्बल 405 मिमी पावसाची झाली नोंद
वाशिम जिल्ह्यात सर्वत्र रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरूच….
जिल्ह्यातील सर्वात मोठे मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी…
सोनल प्रकल्प – 448.90 मीटर
एकबुर्जी प्रकल्प -144.50 मीटर
अडाण प्रकल्प – 376.85 मीटर
जलसाठा द.ल.घ.मी.मध्ये
सोनल प्रकल्प – 7.25
एकबुर्जी प्रकल्प – 0.95
अडाण प्रकल्प – 21.17
गडचिरोली- महाराष्ट्राचा टोकावर गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सुरू असून राज्यातून सर्वात जास्त विसर्ग या धरणातून सध्या होत आहे
१९ लाख ६६ हजार ०९० क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणातुन होत आहे
राज्यात सर्वात जास्त विसर्ग होणारा धरण
या मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणांमुळे गोदावरी प्राणहिता नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद पडलेले आहे
काल सिरोंचा तालुक्यातील अकरा गावांना रेड अलर्ट करण्यात आला होता तिथून पहाटे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना आव्हान केला आहे की सुरक्षित ठिकाणी रहावे पूरपरिस्थिती निर्माण असलेल्या रस्त्यावरून प्रवास करू नये
गडचिरोली जिल्ह्यात पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आसावा दिवसभर पाऊस रिमझिम असला तरी पूर परिस्थिती कायमच
Wkt& जिल्हाधिकारी आवाहन केलेले बाईट विजलव मेडीगट्टा धरणाचे
महाबळेश्वर तालुक्यात गेल्या 4 दिवसापासुन पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे..मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटाचे प्रचंड नुकसान झाले होते.. याच पाश्वभुमीवर सतर्कतेचा बाब म्हणुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोजांरी यांनी आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी आज सकाळी 11 ते 5 यावेळेत बंद करण्याचे पत्र महाबळेश्वर तहसिलदार यांना दिले असल्याची माहीती उप अभियंता महेश गोजांरी यांनी दिलीये .
भंडारा जिल्हातिल मोहाडी तालुक्यातिल माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेले नरसिह मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गेल्याने तेथेच अड़कुन पडलेल्या 15 भाविकाना अखेर 19 तासांचा अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे।यात 7 स्त्रिया व 8 पुरुषाचा समावेश आहे।विशेष म्हणजे राज्य आपत्ति दलामार्फत रेस्क्यू दला मार्फत काल पासून रेस्क्यू करण्याचे काम सुरु होते।मात्र पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्याने त्यांना बाहेर काढ़ने धोक्याचे ओळखून आज अखेर सकाळी त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आहे।
पालघर मधील वैतरणा नदीच्या पाण्यात अडकलेल्या बार्ज मधील तेरा कामगारा पैकी 6 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात NDRF च्या टीम ला आले यश आहे. 13 पैकी 6 जणांना NDRF टीम ने बोटी च्या साह्याने बाहेर काढले आहे. इतर साथजणांना बाहेर काढण्याचा बचाव कार्य सुरू आहे.
नाशिक – जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच..
धरण पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस सुरूच असल्याने पाण्याची पातळी वाढली
गंगापूर धरणातून आज देखील पाण्याचा विसर्ग सुरुच राहणार
गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचे ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले हे exclusive दृश्य फक्त TV9 च्या दर्शकांसाठी (सौजन्य म्हेह बडाख)
कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाची उसंत
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ मात्र कायम
नदीची पाणी पातळी पोहोचली 36 फूट दहा इंचावर
जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्यासाठी अवघे दोन फूट बाकी
नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
– नागपूर जिल्ह्यांच्या कामठी तालुक्यातील आडका गावात अवैध माती उत्खनन
– रेल्वे कंत्राटदाराने केलेल्या अवैध माती उत्खननाचा शेतकऱ्यांना फटका
– नागपूर – नागभीड रेल्वे ब्रॅाडगेज कामासाठी केलं मातीचं अवैध उत्खनन
– अवैध माती उत्खनन करुन केले १५ ते २० फुटाचा खड्डा
– अवैध माती उत्खनन केल्याने पावसात शेजारच्या शेतकऱ्यांची जमिन खचलीय
– शेजारच्या शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान
– महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका
– कामठी तहसीलदार कारवाई का करत नाही? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सात तालुके टॅंकरमुक्त
दौंड, इंदापूर, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे आणि हवेली हे तालुके टँकर मुक्त
शिवाय जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या एकूण टॅंकरची संख्या पूर्वीपेक्षा निम्म्याहून कमी झाली
मात्र भर पावसाळ्यातही जिल्ह्यातील शिरूर तालुका अद्यापही तहानलेलाच
या तालुक्यात सर्वाधिक 15 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील 22 गावे आणि 192 वाड्यांना 29 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु
धुळे शहरात रात्रभर भर पावसाची रिप रिप सुरु…सकाळ पासून वातावर कोरडे…पाऊस नसल्याने शेती च्या कामना वेग..
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 45 सेमी ने उघडले….
धरणाच्या 7 दरवाज्यातुन वर्धा नदीपात्रात 500 क्युमेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे…
अप्पर वर्धा धरण 75 टक्के भरले;धरण क्षेत्रात रात्रीपासून सुरू आहे पावसाची दमदार बॅटिंग….
अमरावती, वर्धा,यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा…
चिपळूण मधील कळकवणे मध्ये एनडवाडीतल्या वस्तीच्या मागील डोंगराला पडल्या 4 फुटापर्यंत भेगा पडल्या आहेत
कळकवणे मधील ग्रामस्थ धास्तावले आहेत भाषयभीत झाले आहेत
एनडवाडीतल्या ग्रामस्थांचे प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे
डोंगराला मोठ्या भेगा गेल्यामुळे गावकरी चिंतेत होते
– सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरुच
– मागील तीन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा
– तर संततधार पावसामुळे शहरी भागातील छोट्या व्यवसायिक, कामगारांच्या रोजगाराला ब्रेक
– संततधार पावसामुळे शहरातील नागरिक हैराण
– सोलापूर जिल्ह्यात कोणतीही जिवीत किंवा वित्त हानी नाही.
नांदेड: काल सांयकाळी थोडीशी विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्रीपासून पुन्हा सक्रिय, मध्यरात्रीपासून नांदेडमध्ये सर्वदूर संततधार पाऊस, पावसाच्या थैमानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची दैना, अजूनही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच, असंख्य रस्ते पाण्याखाली तर अनेक गावांना पुराचा विळखा कायम.
लातुर–उदगीर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणारा बनशेळकी तलाव ओव्हरफ्लो, प्रशासनाने केली पाहणी.
खडकवासला धरण धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 13138 क्युसेक विसर्ग कमी करून ठीक स. 6.00 वा. 4708 क्युसेक करण्यात येत आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी…
हातनूर धरणातून 125156 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. हातनूरचे असलेले पूर्ण 41 दरवाजे यावर्षी पहिल्यांदा उघडले आहेत. तापी नदी मध्यप्रदेशातून तर पूर्णा नदी विदर्भातून येत असल्याने हातनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे.
मुंबई : वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याने ढिगाऱ्याखाली अडकून मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्हाधिकारी तसेच वसई विरार महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडील नैसर्गिक आपत्तीविषयक निधीतून आणि प्रत्येकी 2 लाख रुपये महानगरपालिकेकडील निधीतून अशी 6 लाख मदत केली जाईल. याशिवाय जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये उपचारासाठी देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पाहा व्हिडिओ
गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहता 16 तारखेपर्यंत शाळा, महाविद्यालय सर्व बंद राहतील. असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. पहिले 11 तारखे पासून 13 जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता या तीन दिवसाची वाढ जिल्हाधिकारी संजय मीना यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाच्या फटका बसल्याने अनेक नद्या व नाले पूर परिस्थितीत आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.
पाहा व्हिडिओ
उदगीर ते लातूर वाहतूक शिरूर-अनंतपाळ मार्गे वळवली आहे, नळेगाव जवळच्या चामरगा-पाटीजवळ रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने उदगीर-लातूर मार्गावरची वाहतूक झाली ठप्प झाली, रस्त्याचे काम सुरू असल्याने पुलाचे करण्यात आले आहे. खोदकामात ओढ्याचे पाणी घुसल्याने वाहतुकीचा खोळंबा झालाय.. लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनांनी आणि उदगीरहून लातूरकडे येणाऱ्या वाहनांनी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आलंय.
ठाणे जिल्ह्यातील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळांना दि. 14 आणि 15 जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुट्टी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.
पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क व समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थिती, बचाव व मदत कार्याबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिलेत. राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये असे प्रयत्न आहेत. स्थलांतरितांना भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यासह धरणांतून सोडण्यात येणारे पाणी आणि त्याबाबतच्या वेळांबाबत नागरिकांना माहिती देण्याबाबत सूचना दिल्या आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 13, 2022
पाहा व्हिडिओ
चंद्रपूर:-गोसेखुर्द धरणातून मध्यरात्री 12 हजार क्यूसेक्स जलविसर्ग करणार, जलसंपदा विभागाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाला माहिती ही दिली , धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने विसर्ग वाढवणार आहेत., चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी-मूल- सावली- पोंभुर्णा- गोंडपिपरी या तालुक्यातून वाहणा-या नदीकाठच्या गावाना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे, चंद्रपूर शहरालगत असलेल्या इरई धरणातून सध्या महत्तम विसर्ग केला जातोय, त्यामुळे इरई-वर्धा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन चंद्रपूर शहराच्या सखल भागात पूर पूरस्थिती आहे.
पाहा व्हिडिओ
गडचिरोली -सोमनपल्ली येथे गर्भवती महिला पुरात अडकल्याने तिला व काही नागरिकांना बाहेर काढण्यासाठी तहसीलदारांनी स्वतः एस.डी.आर.एफ पथकासोबत जाऊन त्यांना पुरातून बाहेर काढलं आहे. महाराष्ट्राचे शेवटच्या टोकाला छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली या गावात इंद्रावती नदीच्या पाण्यानी अचानक पूर परिस्थिती निर्माण केली. सिरोंचा येथील तहसीलदार जितेंद्र शिरतोडे हे स्वतः बचाव कार्यात उतरले आहेत.
पाहा व्हिडिओ
जिखाधिकारी डॉ माणिकराव गुरसल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागानं दिनांक 14 जुलै पर्यंत पालघर जिल्हयात अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांचा निर्णय 13 ते 14 जुलै पर्यंत पालघर जिल्ह्यातील तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेञातील सर्व शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ
राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाची जुलै महिना सुरु झाल्यापासून जोरदार बॅटींग सुरु आहे. मागील चार दिवसांपासून राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढत आहे. ठाणे जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्या गुरुवार 14 जुलै 2022 रोजी सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पाहा व्हिडिओ
पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री डोंगर परिसरात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने थेट डोंगरावरून पायरी मार्गाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला रौद रूप प्राप्त झाले आहे. मात्र अशातही जीव धोक्यात घालून भाविक आणि पर्यटक डोंगरावर जात आहेत. लेण्याद्री डोंगरावर पडत असलेला सर्व पाऊस याच पायरी मार्गाने जोरात खालच्या दिशेने येत असताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस जास्त प्रमाणात असल्यामुळे धरणाचे 3 दरवाजे 5 सेमी ने उघडण्यात आले असून 24 क्युसेकचा विसर्ग होणार आहे . तरी सर्व यंत्रणांनी याबाबत ग्रामस्थांना अवगत करावे. ही विनंती, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील काही तालुके वगळून 12 वीपर्यंतच्या शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दिनांक 14 ते 16 पर्यंत ही सुट्टी जिल्हा https://www.tv9marathi.com/wp-admin/admin.php?page=stories-dashboardप्रशासनाकडून जाहीर केली आहे, यामध्ये इंदापूर, पुरंदर, बारामती, दौंड, शिरूर या तालुक्यातील शाळांना सुट्टी नसणार आहे इतर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, परिपत्रक काढून जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिले आहेत.
हवामान खात्याचा अंदाजही पाहा
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. आता नदीची पाणी पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगा उद्या दुपारपर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. तसेच शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रात संततधार कायम आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे सर्व तालुक्यात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. उद्या सुद्धा पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी उद्या 14 जुलै सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पाहा व्हिडिओ
कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणात 40.63 टीएमसी पाणीसाठा सध्या आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा कमी झाल्यानंतर पायथा विद्युत गृह बंद केले होते.
रत्नागिरी – चिपळूण शहरात शिरले वाशीष्टी व शिवनदीच्या पुराचे पाणी, शहरातील जुना बाजार पूल परिसरातील नाईक कंपनी परिसरात पुराचे पाणी शिरले असल्याची माहिती समोर आली आहे.
भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी अकलोली येथे वैतरणा नदीची पातळी वाढली आहे. पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तर गरम पाण्याचे कुंड गेले नदीपात्रात बुडून रस्त्या लगतच्या दुकानात सुध्दा शिरले पाणी.
रायगड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याप्रमाणे धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, पाऊस विश्रांती घ्यायला तयार नाही, जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून बुधवारी दुपारी एक वाजल्यानंतर पाणी गेले. तसेच मंगळवारी दुपारी 12 नंतर पुलावरून पाणी गेले ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री 9 वाजल्यानंतर ओसरले. परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही पुलावरून पाणी गेल्याने येथील वाहतूक खोळंबून प्रवासी व विदयार्थी यांचे पुरते हाल झाले. त्यामुळे प्रवासी, चाकरमानी, विद्यार्थी व वाहने पुलाच्या दोन्ही बाजूस अडकून पडली होती. तसेच रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा देखील लागल्या होत्या.
सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालीतून नागोठणे व सुकेळी येथील शाळेत गेलेले 100 हून अधिक विद्यार्थी पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. ती मुले रात्री नऊ नंतर पालीला आपल्या घरी पोहचली. ही मुले 7 ते 9 तास पुलाच्या पलीकडे अडकून पडली होती. यामुळे पालक खूप चिंतातूर झाले होते. असे पालीतील पालक डॉ. मयूर कोठारी यांनी सांगितले. शिवाय खेडेगावातून पालीला शाळेत व महाविद्यालयात आलेल्या विद्यार्थ्यांना देखील सलग दुसऱ्या दिवशी अडकून पडावे लागले. असे शिक्षक शरद निकुंभ यांनी सांगितले.
पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुलावरून पाणी जात असताना कोणीही पुलावरून प्रवास करू नये, तसेच सर्व तालुका प्रशासकीय यंत्रणेला सतर्कतेचा व खबरदारीच्या सूचना दिल्या असल्याचे सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायणावर यांनी सांगितले.