महाराष्ट्रात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. राजधानी दिल्लीत आज पराभूत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. अवकाळी पावसाचा नाशिमधील द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. दिंडोरी, निफाडसह सिन्नर तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. मुंबईतील कुर्ला भागात बेस्ट बसचा भीषण अपघात (Kurla Bus Accident CCTV Footage Video) झाला आहे. भरधाव बसने अनेक गाड्या आणि रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना चिरडलं आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
सोलापूर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळावा यासाठी फ्लेक्स लावण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 5 जागेवर भाजपचे उमदेवार जिंकून आले आहेत. सोलापुरला गेल्या 5 वर्षात जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे – पाटील, राधाकृष्ण विखे – पाटील, दत्तात्रय भरणे आणि चंद्रकांत पाटील या बाहेरील मंत्र्यांनी सोलापूरंच पालकमंत्रिपद सांभाळललं होतं. मात्र आता स्थानिक पालकमंत्री मिळावा यासाठी सोलापूरकर आग्रही आहेत. त्यासाठी बाळीवेस चौकात पालकमंत्र्यांसाठी जाहीर फ्लेक्स लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करण्यात आलं आहे. पालकमंत्रिपदासाठी माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी मंत्री सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी हे शर्यतीत आहे.
केजमध्ये हिंसक वळण लागलं आहे. पोलीस आणि आंदोलनकर्ते आमनेसामने आले आहेत. रस्ता रोको सुरू असताना जमाव हिंसक झाला आहे. संतप्त जमावाने एसटी पेटवली आहे.पोलीस गाडीवर देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
कुर्ला बस अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी चालक संजय मोरे याला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा खरंच अपघात होता की कट? याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांनी म्हटलं.
पुणे येथील स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरात प्रवाशांचे मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केली अटक आहे.प्रतिक विजय माने, करण घाडगे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून वेगवेगळ्या कंपनीचे दीड लाख किंमतीचे सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत
सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत,ते बंद करावेत,या मागणीसाठी मनसेच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला.
लोकशाही वाचवण्यासाठी जे कोणी पुढे येत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. जर आमचे सरकार आले असते आणि अशी मागणी झाली असती तर आम्ही ती मान्य केली असती असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मारकडवाडीला भेट दिल्यानंतर म्हटले आहे.
निवडणुका झाल्या की आयोग पत्रकार परिषद घेत असतो. मात्र यावेळी पत्रकार परिषद घेतली नाही,आम्ही त्यावर आक्षेप घेतल्यावर त्यानी तोडकी मोडकी उत्तरं दिली असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोलापूरात म्हटले आहे.
महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, मनीष निकोसे नावाच्या इसमाने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.
राम सातपुते यांना महिनाभरात आमदार होण्याची संधी आहे, असे आवाहन उत्तम जानकर यांनी केले. त्यांना महिनाभरात गुलाल उधळण करण्याची संधी आहे. त्यांचे सरकार आहे. ते निवडून आले तर मंत्री होतील असा टोला उत्तम जानकर यांनी लावला. तर सातपुते वैफल्यग्रस्त असल्याच आरोप त्यांनी केला.
बीड जिल्ह्यात 24 तासात दोन अपहरणाच्या घटना; व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे देऊन व्यापाऱ्याने सुटका केल्याचे समोर आले आहे.
ईव्हीएम मशीनमुळे मताचा अधिकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी लोकशाही वाचवण्यासाठी हा उठाव सुरू केला आहे. राज्यातही अनेक ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनविरोधात उठाव सुरू केला आहे.
मुंबईसारख्या शहरांमध्ये इतकी विचित्र घटना घडते एक ड्रायव्हर इतक्या लोकांना चिडत नेतो त्यांचा जीव घेतो एकही साधी गोष्ट नाहीये.आणि त्यामुळे प्रशिक्षण देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली.
निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून सहा नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहे, उत्तरांची वाट बघत आहोत. आमचं ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू झाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे, गावागावत रोष आहे, असा दावा त्यांनी केला.
महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.
“महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटक मधील सरकारने बंदी घातली आहे. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारची हिटलरशाही त्याचा आम्ही निषेध करतो. कर्नाटक सरकारने सावरकरांचा अपमान केला आहे. याबद्दल काँग्रेस सरकारचा आम्ही निषेध करतो” असं शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले. “मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मीडियाच्या चर्चांमधून 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आहे असा मी ऐकतो आहे. 14 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” असं उदय सामंत म्हणाले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS च्या परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणी चौकशी सुरू. फार्माकॉलॉजी आणि पॅथॉलॉजीचे फुटले होते पेपर. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला ईमेलद्वारे प्राप्त झाल्या होत्या तक्रारी. आंबेजोगाई आणि मुंबईत अशा दोन्ही ठिकाणी पेपर फुटल्याची बाब समोर. नाशिक पोलिसांसह सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू. आरोग्य विद्यापीठांनेही स्वतंत्र तीन समित्यांद्वारे सुरू केलीये चौकशी.
हिंदुत्व एक बिमारी आहे, असं वादग्रस्त विधान मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुक्ती यांनी केलं होतं, त्यावरून नवनीत राणा ह्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. “हिंदूईझम काय आहे, हे मेहबूबा मुफ्तीची मुलगी सांगेल काय?” असा सवाल नवनीत राणांनी उपस्थित केलाय. “हिंदूइझम, जय श्रीराम पासून ज्यांना विरोध असेल, अशांना ज्या देशाप्रती प्रेम आहे त्यांना पाकिस्तानात रवाना करावं” असं नवनीत राणा म्हणाल्या.
“मारकडवाडीतील जनतेला बॅलेट पेपरवर निवडणूक नको आहे. शरद पवारांचा डाव उधळण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराष्ट्र आणि देशात मारकडवाडी पॅटर्न आहे. पवारांनी कर्जत-जामखेडच्या नातवालाही राजीनामा द्यायला लावावा” अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
नवी दिल्ली – संसदेचे तिसऱ्या आठवड्यातही कामकाज नाहीच. सरकारला सभागृह चालू द्यायचं नाही , असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना जो तुकडा मिळाला आहे, त्यावर खाल्ल्या मिठाला जागण्यासाठी त्यांना राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर बोलावं लागतं, वानखेडे यांचे पडळकर आणि खोत यांना प्रत्युत्तर
राहुल गांधी यांचे एक स्वप्न आहे की माझं लग्न कधी होईल आणि लग्न झाल्यावर मी पंतप्रधान होणार. राहुल गांधी गावात आल्यावर मारकडवाडीत दोन डबे मांडा, बॅलेटपेपर वर निवडून येऊ द्या. तो निवडून आला की त्याला पंतप्रधान करा. : सदाभाऊ खोतांचा टोला
नवी दिल्ली – खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून बेळगाव सीमा भागला केंद्रशासित दर्जा देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न वादाबाबत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिकांवर कानडी अत्याचार होत असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
सोलापूर : रणजीतसिंह मोहिते पाटलांनी भाजप विरोधात काम केले त्यामुळे लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या. पडळकर साहेब गद्दाराला माफी नको, हे फडणवीस साहेबांना सांगा रणजितसिंहची लवकर हकालपट्टी झाली नाही तर भाजपचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पाठवतील. : राम सातपुतेंची मागणी
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ मालेगावात शंखनाद करीत आंदोलन करण्यात येत आहे.
सकल हिंदू समाज सह हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग असून आंदोलनात भाजपा पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. निषेध मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सामील झाल्या आहेत.
“ज्या नोटिशी लातूरच्या शेतकऱ्यांना मिळाल्या आहेत, त्या नोटिशी आम्ही दिलेल्या नाहीत. एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्युनल कोर्टात जागेबाबत दावा दाखल केला आहे, तिथून या नोटिशी जारी झाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात कुणी नोटिशी दिल्या याचा आम्ही शोध घेत आहोत. यासाठी आम्ही एक समिती तयार केली आहे. ज्याचा रिपोर्ट आम्हाला मिळणार आहे. 183 नोटिशी आहेत, याची सखोल चौकशी सुरू आहे,” अशी माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली.
कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी प्रतिक्रिया दिली. “काल झालेल्या अपघातप्रकरणी तांत्रिक तपास सुरू आहे. बेस्ट अधिकारी देखील इथे आहेत. निष्कर्ष काढला जाईल. वाहनाची परिस्थिती योग्य आहे. सध्या बाहेर चेक केले तर बस ब्रेक वगैरे ठीक आहे. सर्व निष्कर्ष काढायचे आहेत,” असं त्या म्हणाल्या.
धुळे- बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंसह इतर धर्मीयांवरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मानवी साखळी तयार करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत, मालमत्तेचं होणारं नुकसान थांबवावं या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव जिल्हाधिकार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करत आहेत.
नाशिक- ईव्हीएमविरोधात अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि वारकरी पंथ आक्रमक झाले आहेत. 13 तारखेला ईव्हीएम विरोधात शहरात भव्य मोर्चा काढणार आहेत. ईव्हीएम हद्दपार करून यापुढे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महंत श्री कृष्णराव बाबा मराठी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला वारकरी मंडळ तसेच महानुभाव पंथाचे महंत उपस्थित होते.
पुणे- विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी 24 तास उलटून देखील अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही. काल सकाळी सतीश वाघ यांचं त्यांच्या घराशेजारून अपहरण करण्यात आलं होतं. रात्री त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांचे 8 पथक राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी अमरावतीचे आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीला अंबादेवी मंदिरात आरती करण्यात आली. रवी राणा यांना मंत्रिपद मिळाव यासाठी अंबादेवीला साकडे घातले. यावेळी आमदार रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा, समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया अनेक जण उपस्थित होते.
नंदुरबार : बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. बांग्लादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या अत्याचार निषेधार्थ नंदुरबारमध्ये मूक मोर्चा काढण्यात येत आहे. संत महंतांच्या उपस्थितीत मूक मोर्चाच आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, तळोदा ,नवापूर आणि धडगाव अक्कलकुवा तालुक्यात निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने दखल घेण्याची मागणी केली आहे.
विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची काल अपहरण करून हत्या करण्यात आली. योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणला आहे. सध्या सतीश वाघ यांच्या घरासमोर नातेवाईक जमायला सुरुवात झाली आहे. आमदार योगेश टिळेकर काल दिल्लीत आले होते. अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना शोधण्यासाठी पुणे पोलिसांची आठ पथक राज्यात विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
मुंबई आग्रा महामार्गावर अवैध पार्किंगमुळे अपघातांची भीती निर्माण झाली आहे. धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गाच्या कडेला मोठ्या सख्येत वाहनच्या रांगा लागलेल्या राहतात. काही दिवसांपूर्वी अशाच एका वाहनामुळे तीन जणांना आपला जीव गमावावा लागला होता. महामार्ग वाहतूक शाखा या वाहनांवर कारवाई करताना दिसून येत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे उड्डाणपूलांवर ही अशा पद्धतीने अवैध पार्किंग सर्रास केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र त्याकडेही महामार्ग वाहतूक शाखेचे लक्ष नाही. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष होतं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने महामार्गावर पार्किंग करू नये असे आदेश पारित करण्यात आले आहेत. मात्र त्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे.
भाईंदर : मिरा-भाईंदर मधील कांदळवन क्षेत्राची सीमा निश्चित करण्यासाठी महापालिकेने वर्षभरापूर्वी वन विभागापुढे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र वन विभागाकडून यास प्रतिसाद दिला जात नसल्यामुळे हे काम रखडले आहे.
मिरा-भाईंदर हे शहर समुद्र व खाडीकिनारी वसलेले शहर आहे. त्यामुळे येथील मोठा भाग हा कांदळवन क्षेत्रात मोडतो. मागील काही वर्षात शहरातील कांदळवनाचा मोठ्या प्रमाणातऱ्हास झाला असल्याचे दिसून आले
भाईंदर : काश्मिरा येथे मेट्रो मार्गिका ९ च्या कामादरम्यान रस्ता खचून डंपर उलटल्याने २५ वर्षीय चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यावरून एमएमआरडीएने मेट्रो कंत्राटदाराला ३० लाख रुपयांचा तसेच कामाच्या सल्लागाराला १० लाख रुपयांचा असा एकूण ४० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मारकडवाडी हे गाव मोहिते पाटील यांच्या विरोधकालाच मतदान करत असते त्यामुळे या गावात राम सातपुते यांना लीड मिळाले… विरोधक ईव्हीएम मशीनवर आरोप करत फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत… मोहिते पाटील यांनी गेल्या पन्नास वर्षात माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गावांचा कसलाच विकास केला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला… बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास चांगल्या मतांनी राम सातपुते निवडून येतील असा विश्वास देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला… राम सातपुते यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी या भागाला दिला असल्याने आम्ही त्यांना मतदान केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले…
बांगलादेशातील हिंदू भयभीत… बांग्लादेशातील हिंदुंवरील अत्याचार हा चिंतेचा विषय… बांग्लादेशातील कट्टरपंथी हिंदूंवर हल्ले करत आहेत… बांगलादेशात हिंदूंचे खून झाले… हिंदूंची मांडणाऱ्या वकिलांची हत्या होत आहेत…. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
धुळे जिल्ह्यात आज सर्वात नीचांक तापमान… धुळे जिल्ह्याचे तापमान चार अंश सेल्सिअस… याला दोन दिवसांपासून जिल्ह्याचा तापमानाचा पारा सतत घसरतोय… तापमान घटल्याने चौका चौकात शेकोट्या पेटल्या… शरीरात ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून नागरिकांकडून चहाला पसंती..
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात परळीत आज बंदची हाक देण्यात आलीय. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिलाय. बांगलादेशात हिंदूधर्मीयांवर अत्याचार होत असून याचे पडसाद सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता परळी शहर कडकडीत बंद पुकारण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात निषेध नोंदविण्यासाठी परळीकर उपस्थित राहणार आहेत. तर व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आजचा बंद पाळला आहे.
राष्ट्रवादीचे नेते सचिन दोडके, प्रशांत जगताप शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. अभिषेक मनू सिंघवी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. आम्हाला कायदेशीर न्याय नक्की मिळेल. मतदार यादीतील घोळ , वाढलेली मते , ईव्हीएम बाबत आम्ही शरद पवार आणि सिंघवी यांच्याशी कायदेशीर चर्चा करणार आहोत, असं प्रशांत जगताप आणि सचिन दोडके यांनी यावेळी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली असून जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. जळगाव जिल्ह्याचे तापमानामध्ये नऊ अंशानी घट झाली असून थंडीत वाढ झाली झाल्याने जळगावकर चांगलेच गारठले आहेत. जळगावच्या तापमानाचा पारा घसरला आहे. जळगाव चे तापमान 9 अंश डिग्री सेल्सियसवर येवून पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 18 अंश डिग्री सेल्सिअस वर तापमान पोस्ट असल्यामुळे थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.तापमानात मोठी घट झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये थंडीची लाट आली आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळतात.
अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिकतच्या दिंडोरी निफाड सह सिन्नर तालुक्यात मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे 217 हेक्टर बागा नुकसानग्रस्त झाल्यात. हिवाळ्याचा हंगाम असताना अवकाळी झाल्याने अडचण वाढली.सिन्नर दिंडोरी निफाड तालुक्यातील 63 गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.
राजधानी दिल्लीत आज पराभूत उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पराभूत नेते आणि शरद पवार यांची बैठक होणार आहे. बैठकीनंतरच ईव्हीएम बाबतची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. आज किंवा उद्या पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचीही शक्यता आहे.