पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोंढव्यात इलेक्ट्रीक ट्रान्सफर्मेरला आग लागली आहे. अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जानवळ गावाच्या हद्दीत बिबट्याचा वावर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. बिबट्याचा वावरामुळे या परिसरात दहशतीचं वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या पडघा वनक्षेत्राचे अधिकारी आणि वनपाल सदर बिबट्याला पकडण्यासाठी जानवळ गावात दाखल झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने सापळा लावण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नव्या सरकारचा नागपुरात 15 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूण 30-35 आमदार शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपुरात 16 डिसेंबरपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला हा शपथविधी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्याने घेतला सात जणांचा चावा. घोड्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 19 ते 64 वयोगटातील सात जण जखमी. जखमींवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार. संतोष बाजपई, समीर विग्ने, प्रशांत पाटील, विवेक यादव, सुनील प्रजापती, सुरेंद्र कुमार, विनोद चौधरी हे सात जण जखमी. घोडा मालकाचा तपास सुरू.
अश्विनी भिडेंची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती. मेट्रो वुमन आता मुख्यमंत्री कार्यालयात.
“देशात सर्वच क्षेत्रात आता खासगीकरण वाढत चाललय. देशात रोजगार नाही, तरुण विदेशात जात आहेत. देशात बरोजगारांची संख्या वाढली, सरकार काय करतय?” असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत विचारला.
“मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा? हा माननीय मुख्यमंत्री यांचा विशेषाधिकार आहे. त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल ते निर्णय घेतील आणि विस्तार होईल. पक्षाने सध्या मला दिल्ली निवडणुकीसाठी जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी चांगल्या रितीने मी पूर्ण करीन. प्रत्येक कामाची माझी तयारी आहे” असं संजय उपाध्याय म्हणाले.
परभणी घटनेच्या निषेधार्थ बदनापूरमध्ये दलित संघटनांची रस्त्यावर येत निदर्शने. जालना छत्रपती संभाजी नगर महामार्गावर बदनापूर येथे जोरदार घोषणाबाजी.
विधानसभेतील दारूण पराभवानंतर त्याचे काँग्रेसमध्ये पडसाद दिसत आहेत. मला पदमुक्त करा अशी मागणी नाना पटोले यांनी मलिक्कार्जुन खर्गे यांच्याकडे केल्याची माहिती समोर येते आहे.
बॅलेटवर मतदान घ्या मग दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे वक्तव्य खासदार प्रियंका गांधी यांनी केले आहे.
मी मागच्या वेळेला सुद्धा मंत्री पदासाठी लॉबिंग केलेली नव्हती परंतु इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली होती हे मात्र निश्चित आहे. तसंच यावेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली असल्याचं बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या तिसर्या व चौथ्या अलाइनमुळे रेल्वेच्या जाळ मजबूत होणार आहे. भुसावळ ते मनमाड पर्यंतच्या तिसर्या रेल्वे लाईनचे देखील काम प्रगती पथावर आहेत. जळगाव ते परधाडेपर्यंत काम पूर्ण झाले आहे. चाळीसगाव ते मनमाड पर्यंतचे काम पूर्ण असून ही लाईन सुरू आहे. पाचोरा व चाळीसगाव दरम्यानच्या ४४ किमीचे कामाला सुरवात झालेली असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
मतमोजणी घोटाळा हा सुटलेला विषय नाही. मतदाना दिवशी 6 वाजेपर्यंतची गर्दी दाखवा आणि कुठे मतदान वाढले ते आम्हाला सांगा. 7 ते 6 वाजे पर्यंतची आकडे वारी निवडणूक अधिकारी यांनी तयार केले पाहिजे ही त्यांची जबाबदारी आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
छत्रपती संभाजीराजे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात असे आमदार रोहीत पवार यांच्या आई सुनंदा पवार म्हणाल्या. पवार कुटुंबिय एकत्र आले पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले. शरद पवार आणि अजित पवार यांनी याविषयीचा निर्णय घ्यावा असे त्या म्हणाल्या.
EVM विरोधात आज नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला असून महानुभव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडून EVM विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला
पनवेल महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदनही दिले
राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यांनी पाकिस्तानी संघटनेशी संबंधित असलेल्या आरोपीची चौकशी सुरु केली आहे. कालही त्याची चौकशी झाली होती.
शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबियांची भेट ही राजकीय नसून कौटुंबिक भेट होती. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याची गरज आहे. मूठ घट्ट राहिली तर ताकत वाढणार आहे. सत्तेसोबत जायचे का नाही? याबाबत निर्णय शरद पवार घेणार आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, असा पवार कुटुंबातील सदस्य सुनंदा पवार यांनी म्हटले आहे.
परभणी हिंसाचार प्रकरणात मुंबईमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे. उत्तर मुंबई आरपीआय जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे रास्ता रोको करण्यात येत आहे.
देवगिरी बंगल्यावर अजित दादांच्या माजी मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांची गर्दी. मंत्रिमंडळ विस्ताराआधी नेत्यांची अजित पवारांच्या बंगल्यावर भेट.
दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, प्रतापराव चिखलीकर, हिरामण खोसकर इत्यादी नेते देवगिरीवर उपस्थित आहेत.
विनायक राऊत यांच्या याचिकेविरोधात नारायण राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणेंच्या लोकसभेतील विजयानंतर विनायक राऊत कोर्टात गेले होते, विजयासाठी बेकायदेशीर पद्धतीचा अवलंब केल्याचा केला होता आरोप.
मात्र विनायक राऊतांच्या याचितेक तथ्य आणि तपशील नसल्याचा दावा करत त्यांची याचिका फेटाळावी अशी मागणी राणेंनी केली.
विक्रोळीत हिट अँड रन प्रकरण – स्कूटर चालकाने गमावला जीव. विक्रोळी येथे बुधवारी झालेल्या भीषण अपघातात नारायण बोभाटे या ४२ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू झाला
मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर विक्रोळी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
भारतीय जनता पक्षाला पक्ष फोडण्याचा अनुभव आहे. देशातील व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मोदींचा डाव आहे – संजय राऊतांनी साधला निशाणा
एनआयएच्या टीमने एका 22 वर्षीय तरुणाला गुरुवारी पहाटे 4 वाजता घेतलं होतं ताब्यात… महोम्मद शेख ईसा असे या तरुणाने नाव… NIA चं पथक अमरावतीत तळ ठोकून, संशयित तरुणाची दिवसभर चौकशी करून रात्री उशिरा सोडले… चौकशीसाठी पुन्हा एकदा संशयित तरुण अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल… अमरावतीच्या छाया नगरामधून गुरुवारी सकाळी 4 वाजता युवकाला घेतलं होतं ताब्यात… अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये युवकाची गुरुवारी 15 तास NIA च्या पथकाने केली चौकशी… हा तरुण पाकिस्तान मधील एका संघटनेच्या संपर्कात असल्याचा NAI ला संशय.
बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष… महापालिकेच्या बांधकाम विभागाने उचलले कडक पावले… एका दिवसांत शहरातील १५८ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा ते त्यातील ९१ बांधकामांचे थेट कामच थांबवले… महापालिकेच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ…
नाशिकमधील सामाजिक संस्थेचे दहा ते अकरा आमदारांना पत्र… शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या आमदारांना नाशिक येथील निर्भय फाउंडेशनच्या वतीने पत्र… ज्यांच्याकडे शंभर कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांनी आमदारकीचे वेतन व पेन्शन घेऊ नये… जनतेकडून येणारे करुरूपी पैसे वेतनात घेऊ नये त्याचा सर्वसामान्यांच्या कामाकरिता वापर करावा… दहा आमदारांसह आदित्य ठाकरे यांनी देखील प्रॉपर्टी कमी असली तरी आमदारकीचे वेतन न घेता आदर्श निर्माण करावा…
ठाण्यातील वाहतुकीच्या पुढील पाच वर्षातील आव्हानांचा होणार अभ्या… ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या अभ्यास गटात वाहतूक पोलीस, मेट्रो एमआरडीए ,रेल्वे ,पर्यावरण विषयक तज्ञ यांचाही सहभाग घेण्यात येईल… ठाणे महापालिकेतर्फे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व समावेश वाहतूक आराखड्याची आता बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे…
नाशिकच्या सामाजिक संस्थेची आमदारांकडे पत्राद्वारे अनोखी विनंती करण्यात आली आहे. नाशिकमधील सामाजिक संस्थेचे दहा ते अकरा आमदारांना पत्र लिहिलं आहे. शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या आमदारांना नाशिक येथील निर्भय फाउंडेशनच्या वतीने पत्र लिहिण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे शंभर कोटी पेक्षा जास्त संपत्ती आहे त्यांनी आमदारकीचे वेतन आणि पेन्शन घेऊ नये. जनतेकडून येणारे करुरूपी पैसे वेतनात घेऊ नये त्याचा सर्वसामान्यांच्या कामाकरिता वापर करावा. दहा आमदारांसह आदित्य ठाकरे यांनी देखील प्रॉपर्टी कमी असली तरी आमदारकीचे वेतन न घेता आदर्श निर्माण करावा, असं या पत्रात लिहिण्यात आलं आहे.
नाशिकच्या ओझरच्या HAL मध्ये सुखोई लढाऊ विमान तयार होणार आहे. HAL मध्ये १२ सुखोई ३० एम के आय लढाऊ विमान तयार होणार आहे. लढाऊ सुखोई विमानांच्या निर्मितीसाठी संरक्षण विभाग आणि HAL मध्ये करार आहे. केंद्राच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना देण्यासाठी संरक्षण विभाग आणि HAL मध्ये सुखोई निर्मितीचा करार आहे. १३ हजार ५०० कोटींच्या या कराराअंतर्गत करण्यात येणार १२ सुखोई ३० एम के आय लढाऊ विमानांची निर्मिती आहे.
नाशिकच्या लासलगावातून जम्मू-काश्मीर राज्यात प्रथमच धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची निर्यात केली जाणार आहे. पोल्ट्री खाद्यासाठी मागणी झाल्याने मक्याची निर्यात केली जाणार आहे. जम्मू काश्मीरमधील बारी-ब्राह्मणा इथं 2600 टन मका एका रेल्वे मालगाडीच्या 42 वेगनमधून रवाना आहे. यामुळे मका व्यवसायाला चालना मिळणार आहे. मक्याचे बाजार भाव स्थिर राहत शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली असून गुरुवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदियात 9.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेलं आहे. नागपूरमध्येही 9.8 अंशावर तापमान होते. पुढील काही दिवस किमान तापमानात घट होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे पुण्यात गुरुवारी किमान तापमान 13.3 अंशावर होते.
महायुती सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) उद्या होणार असल्याची माहिती आहे. तर भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रिपदं असणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील 193 ग्रामपंचायतींचा लवकरच बिगूल वाजणार आहे. ‘सरपंच’ आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं आहे. खुल्या प्रवर्गाला 56 ग्रामपंचायती आहेत. लासलगावातून प्रथमच धान्यातील पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची जम्मू-काश्मीर राज्यात निर्यात झाली आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाछी धाराशिव जिल्ह्याला 221 कोटी मंजूर झाले आहेत. 33 मंडळातील 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.