Maharashtra New CM Government Formation LIVE : उरणच्या ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा पुन्हा नवा रेकॉर्ड

| Updated on: Dec 04, 2024 | 8:10 AM

Maharashtra New CM Government Formation LIVE Updates : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. याबाबतचे ताजे अपडेट्स...

Maharashtra New CM Government Formation LIVE : उरणच्या ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा पुन्हा नवा रेकॉर्ड
महत्वाची बातमी
Image Credit source: tv9
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. निकाल लागून आता दहा दिवस झाले आहेत. मात्र तरीही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. तसंच राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील जाहीर झालेलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री कोण? हे लवकरच जाहीर होणार आहे. सोलापूरच्या माळशिरस विधानसभा क्षेत्रातील मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध करत गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Dec 2024 06:54 PM (IST)

    राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने नरेश बल्यानला आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

    आम आदमी पक्षाचे आमदार नरेश बल्यान यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. याशिवाय नरेश बल्यानच्या जामीन याचिकेवर राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीसही बजावली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

  • 03 Dec 2024 06:40 PM (IST)

    जम्मूमध्ये बर्फवृष्टीमुळे हवामान बदलले

    जम्मू-काश्मीरमध्ये हवामान बदलले आहे. पर्वतांवर झालेल्या हिमवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये थंडी वाढली आहे. जम्मू-काश्मीरमधील भदेरवाह भागात नुकतीच बर्फवृष्टी झाली असून, त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य आणखीनच वाढले आहे.


  • 03 Dec 2024 06:26 PM (IST)

    पोलिसांशी झटापटीत 168 शेतकऱ्यांना अटक

    मंगळवारी नोएडातील दलित प्रेरणा स्थळावर जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. यादरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 163 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी 168 शेतकऱ्यांना अटक केली आहे. त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

  • 03 Dec 2024 06:13 PM (IST)

    बँक फसवणूक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 6.37 कोटींची मालमत्ता जप्त

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बँक फसवणूक प्रकरणात 6.37 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.  विनय वायर आणि पॉली प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या संचालकांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. संलग्न मालमत्तांमध्ये एक औद्योगिक भूखंड आणि अहमदाबाद (गुजरात) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे असलेल्या तीन निवासी सदनिकांचा समावेश आहे.

  • 03 Dec 2024 06:00 PM (IST)

    उरणच्या ११ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा पुन्हा नवा रेकॉर्ड

    उरण, करंजा येथील जलतरणपटू मयंक म्हात्रे याने घारापुरी बंदर ते करंजा जेट्टी हे सागारी १८ किमी अंतर निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पुन्हा एकदा नवा इतिहास घडविला आहे.

  • 03 Dec 2024 05:50 PM (IST)

    रावेर येथे ट्रकला अचानक लागली आग

    रावेर तालुक्यातील,सावदा रस्त्यालगत असलेल्या जेहरा मॅरेज हॉल जवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकला अचानक आग लागली असून या आगीत संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली आहे

  • 03 Dec 2024 05:04 PM (IST)

    वर्षावर महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनाची बैठक पार, काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॅानफर्सिंगद्वारे उपस्थित

    वर्षा या शासकीय निवासस्थानी 6 डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली आहे. काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला व्हिडीओ कॅानफर्सिंगद्वारे उपस्थित होते. भारतरत्नं डॅाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. आंबेडकरी अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केलंय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच नियोजनाचा आढावा घेतला.

  • 03 Dec 2024 04:28 PM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारीत मोकळा?

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारीत मोकळा होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचं कारण म्हणजे येत्या 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायलयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत ओबीसी आरक्षण प्रश्नांमुळे या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे या सुनावणी नंतर तरी निवडणुका होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • 03 Dec 2024 04:09 PM (IST)

    आग्रामधील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी

    मोठी बातमी समोर आली आहे. आग्रामधील जगप्रसिद्ध ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे ताजमहलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बॉम्ब प्रतिरोधक साहित्यासह सुरक्षा दल ताजमहाल परिसरात तैनात करण्यात आले आहेत. तसेच धमकीचा मेल कुणी पाठवला याबाबतचा शोध सुरू आहे.

  • 03 Dec 2024 02:58 PM (IST)

    जालन्याच्या मार्केटमधून शेवगा गायब

    भाव वाढल्यामुळे जालन्याच्या मार्केटमधून शेवगा गायब झाला आहे; पाचशे ते साडे पाचशे रुपये दराने विक्री होत होती. अजून 1 महिना दर जैसे थेच राहणार असल्याचं विक्रेत्यांच म्हणणं; जालन्यात पहिल्यांदाच शेवग्याला विक्रमी भाव मिळाला आहे. मागच्या 5 ते 6 दिवसापासून आवक घटली आहे, तर आठवडी बाजारात शेवगा तुरळक ठिकाणी विक्री होत आहे.

  • 03 Dec 2024 02:50 PM (IST)

    शिंदे यांच्या पत्नी ज्युपिटर रुग्णालयात

    एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे या सुद्धा ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. शिंदे हे उपचारासाठी ज्युपिटरमध्ये दाखल झाले आहेत.

  • 03 Dec 2024 02:40 PM (IST)

    EVM पडताळणीसाठी मोजली रक्कम

    जळगावात विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या मुक्ताईनगरमधील रोहिणी खडसे, पाचोऱ्यातील वैशाली सूर्यवंशी आणि एरंडोलमधील डॉ. सतीश पाटील यांनी ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. सतीश पाटील या तिघांनी ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी १२ लाख ७४ हजार रूपये शुल्क भरले आहेत.

  • 03 Dec 2024 02:30 PM (IST)

    कांदा घोटाळ्याविरोधात उद्धव ठाकरे आक्रमक

    ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड, एनसीसीएफ या संस्थेमार्फत उन्हाळी कांदा खरेदी करण्यात आला आहे. मात्र दिल्ली, कोलकत्ता येथे पाठवताना उन्हाळा ऐवजी B ग्रेडचा गोल्टी लाल कांदा पाठवला जातो, असा आरोप करत या कांदा घोटाळ्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे.

     

  • 03 Dec 2024 02:20 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भाजपाची मोठी शक्ती

    एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी भाजपाची मोठी शक्ती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजपा शिंदे यांना गोंजारणार आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

  • 03 Dec 2024 02:10 PM (IST)

    आमचे नेते अजितदादाच

    मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणे, हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यांची कमिटी मुंबईत येतेय, उद्या भाजपाच्या बैठकीत त्यांचा नेता ठरेल. निकालाच्या दुसर्‍या दिवशी आमच्या पक्षाची बैठक झाली. नेता निवडीचीच बैठक झाली, आमच्याकडे नेता अजितदादाच आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

  • 03 Dec 2024 02:01 PM (IST)

    कोणतीही नाराजी नाही

    जो महायुती मधील वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा राहील, असे एकनाथ शिंदे यांनी अगोदरच सांगितलेले आहे. आमच्याकडून कुठेही नाराजी नाही, अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.

  • 03 Dec 2024 01:00 PM (IST)

    संजय राऊतांना काय मित्रत्वाचा सल्ला ?

    एकनाथ शिंदे विरोध करतायत, त्यामागे दिल्लीतली महाशक्ती आहे असं संजय राऊत म्हणतात, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, ‘लोकांना कंटाळा येईल एवढं बोलू नका, असा मी राऊतांना मित्रत्वाचा सल्ला देईन’

  • 03 Dec 2024 12:21 PM (IST)

    महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी

    आझाद मैदानामध्ये महायुतीचे नेते शपथविधीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यात भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेकडून संजय शिरसाट गुलाबराव पाटील तर एनसीपीकडून असं मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित राहिले.

  • 03 Dec 2024 12:20 PM (IST)

    डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट

    एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही बरी नाही. डेंग्यू आणि मलेरिया यांची चाचणी केली असता निगेटिव्ह आली आहे. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूच. सतत येत असणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक सुरू आहेत. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हळूहळू तब्येत सुधारणा होत असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणे आहे. जुपिटर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

  • 03 Dec 2024 11:57 AM (IST)

    भुजबळांना मोठं मंत्रीपद मिळणार? कोटवरून चर्चांना उधाण

    नाशकात भुजबळांच्या कोटची चर्चा होत आहे. छगन भुजबळ यांनी आज घातलेल्या कोटाची चर्चा होत आहे. छगन भुजबळ यांनी आज घातलेल्या कोटावर मिश्किल टिप्पणी केली. मंत्रिमंडळ नाही तर नाशिकच्या थंडीमुळे कोट घातल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकपासून पुढे गेल्यानंतर कोट काढून टाकणार असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.

  • 03 Dec 2024 11:48 AM (IST)

    भरत गोगावले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

    भरत गोगावले हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ते भेटीला गेले होते. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बैठक असल्याची माहिती दिली.

  • 03 Dec 2024 11:40 AM (IST)

    आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार

    आज महायुतीचे नेते आझाद मैदानाची पाहणी करणार आहेत. शपथविधीच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते बावनकुळेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

  • 03 Dec 2024 11:31 AM (IST)

    धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली- सुनिल तटकरे

    “लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या. धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली. विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात ही आमची भूमिका होती मात्र त्या कमी मिळाल्या. आमच्यात उत्तम समन्वय होता. बूथ लेव्हल्पर्यंत आमचा समन्वय होता,” असं सुनिल तटकरे म्हणाले.

  • 03 Dec 2024 11:22 AM (IST)

    पुणे- एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेत मद्यपानावर प्रश्न

    पुणे- एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेत मद्यपानावर प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून रविवारी महाराष्ट्र राजपत्री नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रश्न अवघड की सोपे यापेक्षा परीक्षेत विचारण्यात आलेल्या दारू पिण्याविषयीच्या प्रश्नाची चर्चा अधिक आहे. सोशल मीडियावरदेखील या प्रश्नाची चर्चा सुरू आहे.

  • 03 Dec 2024 11:10 AM (IST)

    जालना जिल्ह्यातील 332 गावातील पाणी दूषित; जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा अहवाल

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात जालना जिल्ह्यातील 778 गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची तपासणी करण्यात आली असून यामध्ये जवळपास 332 गावातील पाणी हे दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलाय. यासाठी ब्लिचिंग पावडर आणि योग्य त्या उपाययोजना करण्याची मोहीम आरोग्य विभागाकडून हाती घेणार असल्यासही आरोग्य अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय.

  • 03 Dec 2024 10:54 AM (IST)

    अजित दादा अमित शाह यांच्या भेटीसाठी आलेलेच नाहीत – सुनिल तटकरे

    अजित पवार हे अमित शाह यांच्या पूर्वनियोजित भेटीसाठी आलेले नाहीत.कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघाल हे माहीत नाही. दादा वेटिंगवर असल्याचं व़ृत्त चुकीचं आहे, असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.

  • 03 Dec 2024 10:49 AM (IST)

    डॉ.किरण लहामटेंकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग

    अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट ) आमदार डॉ.किरण लहामटेंकडून मंत्रीपदासाठी फिल्डींग लावण्यात आली आहे. काल रात्री मुंबईत अजित पवारांची तर आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची दिल्लीत भेट घेतली.

    किरण लहामंटेंची आमदराकीची दुसरी टर्म असून ते आदिवासी विकास मंत्री पदासाठी इच्छुक आहेत असे समजते.

  • 03 Dec 2024 10:39 AM (IST)

    नागपूरचा चहावाला फडणवीसांच्या शपथविधीला राहणार उपस्थित, खास निमंत्रण

    नागपूरचा चहावाला आता देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार असल्याची माहिती आहे. रामनगर परिसरात गेले अनेक वर्ष चहाचा स्टॉल चालवणारे गोपाळ बावनकुळे यांना 5 डिसेंबरच्या शपथविधीचं निमंत्रण मिळालं आहे. गोपाळ बावनकुळे हे फडणवीस यांचे मोठे फॅन आहेत , तेसुद्धा या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

  • 03 Dec 2024 10:27 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर ॲक्शन मोडमध्ये येणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर ॲक्शन मोडमध्ये येणार पण ठाण्यातच राहणाची शक्यता आहे. ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहणार. तब्येत ठीक झाल्यास व्हिडीयो कॉन्फरन्सने बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता.

  • 03 Dec 2024 10:17 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात अणदूर-नळदुर्ग श्री खंडोबाच्या यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

    धाराशिव जिल्ह्यातील अणदूर आणि नळदुर्ग गावांदरम्यानच्या परंपरेला अनुसरून श्री खंडोबाच्या यात्रोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. अणदूर येथील यात्रा पार पडल्यानंतर श्री खंडोबाची मूर्ती वाजत-गाजत नळदुर्ग येथील मंदिरात नेण्यात आली.

  • 03 Dec 2024 09:53 AM (IST)

    Maharashtra News: मारकडवाडीत पोलीस प्रशासन आणि आमदार उत्तम जानकर यांच्यामध्ये चर्चा सुरू

    मारकडवाडीत पोलीस प्रशासन आणि आमदार उत्तम जानकर यांच्यामध्ये चर्चा सुरू… पोलीस अधिकारी आणि जानकर यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू… पोलिसांकडून मतदान प्रक्रिया करण्यास विरोध आहे…

  • 03 Dec 2024 09:38 AM (IST)

    Maharashtra News: राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा झाला नाही – संजय राऊत

    राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा झाला नाही… राज्यपालांनी अजून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं नाही… सत्तास्थापनेच्या दाव्याआधीच आझाद मैदानावर शपथविधीची तयारी… अजित पवार आणि शिंदेंमध्ये तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न… असं वक्तव्य संजय राऊत यंनी केलं आहे.

     

  • 03 Dec 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News: कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांकडून ईव्हीएम मशीन चाचणीची मागणी

    कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांकडून ईव्हीएम मशीन चाचणीची मागणी… मागणी करणारे पाच पैकी चार उमेदवार काँग्रेसचे.. कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर, हातकणंगलेचे उमेदवार राजू बाबा आवळे, करवीरचे उमेदवार राहुल पाटील आणि चंदगड मधील एका उमेदवारांना केला फेर तपासणीसाठी अर्ज… पाचही मतदारसंघातील प्रत्येकी 44 ईव्हीएम मशीनची होणार चाचणी… आठ जानेवारीनंतर ही ईव्हीएम चाचणी केली जाणार… मारकडवाडी येथे दहा मिनिटांत मतदान प्रक्रिया सुरू होणार…

  • 03 Dec 2024 09:18 AM (IST)

    Maharashtra News: मारकडवाडी येथे दहा मिनिटात मतदान प्रक्रिया सुरू होणार

    मारकडवाडी येथे दहा मिनिटात मतदान प्रक्रिया सुरू होणार… मतदान प्रकियेसाठी आमदार जानकर यांचे कार्यकर्ते मंडपात… मतदानासाठी बॅलेट पेपर व साहित्य घेऊन मंडपात…

     

  • 03 Dec 2024 08:57 AM (IST)

    नाशकात हिट अँड रनची घटना

    नाशकात हिट अँड रनची घटना घडली आहे. नाशिकच्या इंदिरा नगर परिसरातील बापू बंगला रथचक्र रस्त्यावरील सोमवारी संध्याकाळची घटना घडली आहे. रस्त्याने पत्नी समवेत पायी जाणाऱ्या दीपक पाठक यांना कारने जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कार चालक फरार, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी पथक यांना परिसरातील नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
    पोलिसांकडून फरार कारचालकाचा शोध सुरु आहे.

  • 03 Dec 2024 08:45 AM (IST)

    शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरातच पडून

    शेतकऱ्यांचा कापूस अद्यापही घरातच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार चांगला भाव देईल या आशेने घरात साठवून ठेवला कापूस आहे. कपाशी वेसणी पूर्ण झाल्यानंतर अद्यापही शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे. भाव वाढ नसल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला  घरात लाखो क्विंटल कापूस आहे. गेल्या दोन वर्षापासून कपाशीला भाव नाही यंदा तरी भाव मिळावा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या अवघा सात हजार पर्यंत एका क्विंटलला कपाशीला भाव आहे. 10 हजार रुपये क्विंटल कपाशी ला भाव द्यावा नवीन सरकारकडून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

  • 03 Dec 2024 08:30 AM (IST)

    एक महिला नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण

    गडचिरोली नक्षल सप्ताहा पहिल्या दिवशी एक महिला नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण केलं आहे. अहेरी तालुक्यातील नेनेर येथील रहिवासी आहे. तिच्यावर चकमक हत्या आणि नक्षल चळवळी सहभाग असे अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्योती कुडमेथे असे या महिलेचे नाव आहे. पाच लाख रुपयाचे बक्षीस राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. दोन डिसेंबरपासून दहा डिसेंबर पर्यंत नक्षल संघटनेकडून नक्षल सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

  • 03 Dec 2024 08:15 AM (IST)

    पुण्यात पावसाची शक्यता

    पुण्यात थंडी गायब झाली आहे. तर वातावरण ढगाळ झालंय. गेल्या काही दिवसांत तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहर आणि परिसरात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती.मात्र, ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे आता थंडीचा जोर कमी होऊन तापमान वाढण्यासह हवामान ढगाळ झाले आहे. ही स्थिती आणखी दोन ते तीन दिवस राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ८ डिसेंबरपर्यंत आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ५ आणि ६ डिसेंबर रोजी हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे.