आज 27 नोव्हेंबर, रविवार. आजचा दिवस राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने महत्वाचा आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आपल्या मंत्री, आमदार खासदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलेत. अशात विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जाते. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर काल काळी शाई फेकण्यात आली. त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या संदर्भातील सर्व घडामोडींचे अपडेट एका क्लिकवर…
Marathi News LIVE Update
सगळीकडे सध्या चिखल झाला आहे
भविष्यातील पिढ्यांना आदराची स्थान कोणती ठेवणार
सतत दोषांवर बोटं ठेवत राहिलो तर हाताला काही लागणार नाही
या सर्व सिस्टिमवरचा लोकांचा विश्वास राहिला नाही
राज ठाकरे यांचे वक्तव्य
Marathi News LIVE Update
महापुरुषांची बदनामी करुन काय मिळणार आहे
हे सर्व राजकीय पक्षांनी टाळायल पाहिजे,
काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षाना माझे सांगणे-राज ठाकरे
पंडित नेहरंचं अफेअर होतं, असा फोटो व्हायरल करण्यात आले
पण ती मुलगी नेहरुंच्या परिवारातील होती
प्रत्येक जण नेत्यांच्या बदनामीत लागलं आहे
Marathi News LIVE Update
राहुल गांधी यांची राज ठाकरे यांनी केली नक्कल
राहुल गांधींची लायकी आहे का सावरकर यांच्यावर बोलायची
काय हालअपेष्टा सहन केल्या, कुठे होते, काही माहिती आहे का
स्ट्रॅटर्जी असते, पण त्याकडे दुर्लक्ष केले, सर सलामत तो पगडी पच्चास
हीच आमची कृष्णनीती आहे, चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलण्याची गरज असते, बोलावं लागतं
दयेचा अर्ज नव्हता, सावकरांची रणनीती होती
Marathi News LIVE Update
राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार म्हणतो
राज ठाकरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर साधला निशाणा
तरुण, महाविद्यालयातील विद्यार्थी हे पाहत असतील तर त्यांना राजकारणावर प्रश्न पडेल
जाती-पातीचं विष कालविण्याचे संस्कार आपल्याकडे केले का?
राज्यातील अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्र सोडून शिक्षण, नोकऱ्यासाठी बाहेर जात आहेत
राज्यातील वातावरण प्रदूषीत झाले आहे-राज ठाकरे
Marathi News LIVE Update
राज्यपाल पदावर असल्याने मान राखतो, नाहीतर शिव्यांची कमी नाही
गुजराती, मारवाडी यांनी त्यांच्या राज्यात का नाही उद्योगधंदे सुरु केले आहे
कारण महाराष्ट्राची जमीन उद्योगधंद्यांना सुपीक होती-राज ठाकरे
महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारी यांच्याकडून ऐकायचं नाही
Marathi News LIVE Update
महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर चालले आहे, काय चालले माहिती नाही
2104 साली ही मी हेच म्हटलं होतं, राज ठाकरे यांनी केली टीका
प्रकल्प कुठल्याही राज्यात जाऊ दे, मागासलेल्या राज्यात जाऊ दे
त्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही, बेरोजगारांच्या हाती रोजगार मिळणे आवश्यक
गुजरात गुजरात करु नका, प्रत्येक राज्याकडे समान नजरेने पहाणं आवश्यक आहे.
Marathi News LIVE Update
मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांची होती
बाळासाहेबांची इच्छा मनसेने पूर्ण केली -राज ठाकरे
जिथे जिथे भोंगे सुरु आहे, तिथे पोलिसांकडे तक्रार करा
पोलिसांनी दखल घेतली नाही, तर मोठ्या ट्रकवर मोठ्याने हनुमान चालीसा वाजवा
आरे ला कारे होत नाही तोपर्यंत असेच होत राहणार
Marathi News LIVE Update
मुख्यमंत्री पदावर तब्यतीचं कारण सांगून ..
राज ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे यांची नक्कल
मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून कांडी फिरवली
आता फिरत आहेत राज्यभर, राज ठाकरे यांची ठाकरेंवर सडकून टीका
पैशांसाठी आणि स्वार्थासाठी कोणच्या हातात हात घालून बागेत फिरलो नाही
राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
Marathi News LIVE Update
टोल आंदोलनाला भव्य यश मिळाले
राज्यातील 65-70 टोल नाके बंद झाले
मनसेच्या यशाबद्दल राज ठाकरे यांचे वक्तव्य
टोलमुक्तीच्या घोषणा करणाऱ्यांना मात्र कोणीच प्रश्न विचारत नाही-ठाकरे
Marathi News LIVE Update
वातावरणात निवडणूक दिसत नाही
महाराष्ट्रात सध्या मोठा खोळंबा
या गटाला मान्यता मिळणार की नाही, याचीच चर्चा
फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणूक लागू शकते
राज ठाकरे यांनी केला अंदाज व्यक्त
Marathi News LIVE Update
राज ठाकरे यांची तोफ धडाडणार
गट अध्यक्षांच्या मेळाव्यात भाषणाला केली सुरुवात
गोरेगाव येथील मेळाव्यात कोणत्या विषयावर बोलणार
कोणचा घेणार समाचार, कोणावर करणार हल्लाबोल
Marathi News LIVE Update
चांदीचा आलेख उंचावला, सोने ही झाले महाग
आठवड्याभरात किंमतींमध्ये चांगलीच वाढ
चांदीचा भाव 1387 प्रति किलोने वाढला
तर सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 254 रुपयांची वाढ
Marathi News LIVE Update
नोटबंदीतील बाद 500, 1000 रुपयांच्या नोटा बदलता येणार!
सुप्रीम कोर्टात नोटा बदलण्यासाठी दाखल याचिकेत संकेत
नोटा बदलण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी विचार करणार -न्यायालय
केवळ विशेष प्रकरणातच ही सूट देण्यात येणार
राज ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडीवर देणार उत्तर, राज यांचे विचार ऐकण्यासाठी मेळाव्याला जात असल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
आज मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा आहे, तर येत्या 10 तारखेला ठाण्यातील गट प्रमुखांचा मेळावा होणार असल्याची अविनाश जाधव यांची माहिती
ठाणे शहरातील 800 हून अधिक गटप्रमुखांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यालाही हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत
तिन्ही सराईत गुन्हेगार संगमनेर येथील, एका देशी कट्ट्यासह पीकअप गाडी पोलिसांनी घेतली ताब्यात
शनिवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास आड मार्गाने गुजरात राज्यात शिरकाव करण्याचा प्रयत्नात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 40 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त
डीआरआयची मोठी कारवाई
दोन परदेशी नागरिकांकडून 8 किलो हेरॉईन जप्त
अजूनही हजारो विद्यार्थ्यांचे पोलीस भर्ती परीक्षेचे अर्ज भरणे बाकी
हजारो विद्यार्थी पोलीस भर्तीपासून वंचित राहण्याची शक्यता
पोलीस भर्ती प्रक्रियेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर
पोलीस भर्ती परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची विद्यार्थ्यांची मागणी
विदेशी पक्ष्यांचे होत आहे आगमन
जलाशय व पाणवठयावर भरु लागली शाळा
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात, अपघातात कोणीही जखमी नाही
कंटेनर मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात असताना अपघात झाला
ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे मोठी दुर्घटना घटना टळली
गजानन किर्तीकरांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र
शिंदे गटाच्या 12 खासदारांच्या यादीत मलाही समाविष्ट करावं यासाठी दिलं पत्र
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात किर्तीकर बसणार शिंदे गटात
लोकसभा अध्यांना पत्र लिहून केली विनंती
अधिवेशनाच्या आधी किर्तीकरांचं पत्र
लोकसभा अध्यक्ष देणार मंजूरी
सदानंद कदम यांना ईडीने बजावले समन्स
मनी लाँड्रिंग प्रकरणी बजावले समन्स
सदानंद कदम हे शिवसेना (ठाकरे गटातील) नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय
पुणेकरांना आता लवकरच करता येणार वनाझ ते सिव्हील कोर्टपर्यंतचा प्रवास
गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट मेट्रोची ट्रायल रन पूर्ण
दोन्ही मार्गावरचं काम पूर्ण
पुणे शहरात हत्यांचे प्रमाण वाढलं
खडकी पोलिसांनी घेतल दोघांना ताब्यात, रात्री घडली घटना
घराशेजारी पान टपरी टाकली म्हणून खुन्नसमुळे केला खून
खडकी पोलिसांनी केले दोन कोयते जप्त
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आता मिशन पश्चिम महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मंगळवारी कोल्हापुर दौऱ्यावर
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित
राज ठाकरे यांचा दौरामुळे मनसेला नवी उभारी
आझाद संवाद मेळाव्याचं केलं आयोजन
पुण्यातील कँम्पात मेळाव्याचं आयोजन
पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित…
पुण्यात 154 गोवरचे संशयित रुग्ण
महापालिकेचा विभाग अलर्ट मोडवर
संशयित रुग्णांचे नमुने घेऊन तपासणीसाठी हाफकीन संस्थेत पाठवण्यात आलेत
त्यापैकी 80 टक्के नमुने निगेटिव्ह आले आहेत
काही नमुन्यांचा अहवाल येणं बाकी आहे
मात्र मुंबई, मालेगाव शहरातील उद्रेक पाहता आरोग्य विभाग अलर्टवर काम करत आहे
राजू शेट्टी एमएसपी हमीभाव कायदा अनिवार्य करण्यासाठी कार्यशाळा घेणार
एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे अध्यक्ष व्ही.एम सिंग राहणार उपस्थित
पुण्यात 1 डिसेंबरला होणार कार्यशाळा
रामपाल जाठ राजस्थान, के, चंद्रशेखर कर्नाटकचे शेतकरी नेतेही सहभागी होणार
राजू शेट्टींनी 15 दिवसांसाठी आपलं आंदोलन स्थगित केलंय
राजू शेट्टी एमएसपी कायद्यावरून आक्रमक होण्याची शक्यता
कर्नाटकातून येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बसला काळे फासत पोस्टर्स लावले
कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवत काळे फासले
बसवर चढून केली महाराष्ट्र विरोधी घोषणाबाजी
कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर शहरात घडली घटना
गाणगापूरहून अक्कलकोट येथे येत होती महाराष्ट्र शासनाची बस
25 तारखेला ही घटना घडल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय