मुंबई, ठाणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा जारी केला आहे. महाराष्ट्रातही आज काही भागात उष्णतेची लाट तर काही भागात अवकाळी पाऊस पडू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. आज रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
येत्या 24 तासात देशात कुठे उन्हाचा तडाखा तर कुठे पाऊस, असं चित्र पाहायला मिळणार आहे. पुढील 24 तासांत पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) आणि हिमवृष्टी (Snowfall) तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये वादळी वारे आणि गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/LueNatze01— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 20, 2024
या भागात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, परभणी, जालना, हिंगोली या भागात आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने, पुणे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच देशभरात मराठवाडा, विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजांचा गडगडाट आणि गारपिटीसह काही मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.