मुंबई: महाराष्ट्र पोलिसांनी एक खास ट्विट करत हौशी वाहनचालकांना हे चालणार नाही, असा इशारा दिला आहे. ‘बॉस’, ‘ताई’, ‘दादा’, ‘बाबा’ सर्वांनी लक्षात ठेवा, वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतं असं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी खास स्टाईलमध्ये केले आहे. गेल्या काही दिवसांपासून गाड्यांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. (Maharashtra Police warns vehicle owners about fancy number plate in unique style)
‘बॉस’, ‘ताई’, ‘दादा’, ‘बाबा’ सर्वांनी लक्षात ठेवा – वाहनावर सजावटी ‘नंबर प्लेट’ लावल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. #KeepItSimple #HeChalnarNahi pic.twitter.com/0QgmVxe6iX
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) March 12, 2021
दादा, मामा, काका, साई, राम, पवार अशा नावांचे नंबर जुळवलेली वाहनं वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. जे अशा प्रकारच्या नंबर प्लेट वापरात त्या वाहनधारकासांठी महाराष्ट्र पोलिसांचं ट्विट ही धोक्याची घंटा आहे. वापरत असाल तर आताच सावधान व्हा, कारण ज्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेट फॅन्सी आहेत, अशा वाहन चालक अन् दुचाकीस्वारांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी खास मोहीम उघडली आहे. बऱ्याच जणांवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. ज्यांच्यावर आधी कारवाई झालेली आहे, तरीसुद्धा ज्यांनी नंबर प्लेट्स बदललेल्या नाहीत, अशा लोकांची वाहनंही जप्त करण्यात आलेली आहेत.
मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत असतो.
संबंधित बातम्या :
‘दादा’, ‘मामा’ ते बुरी नजर वाले; फॅन्सी नंबर प्लेटवाले पुन्हा ट्रॅफिक पोलिसांच्या रडारवर
बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…
(Maharashtra Police warns vehicle owners about fancy number plate in unique style)