मुंबई | राजकीय विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 9 आमदारांनी 2 जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांचं लक्ष हे खातेवाटपाकडे लागले होते. अनेक दिवस खातेवाटपावरुन खलबंत सुरु होती. या खातेवाटपावरुन गेली अनेक दिवस रात्रीच्या बैठकी सुरु होत्या. या मॅरेथॉन बैठकींनंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या जाहीर करण्यात आलेल्या या खातेवाटपात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. तर अतुल सावे यांच्याकडे असलेलं खातं काढून दुसऱ्या खात्याची जबाहदारी दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. अर्थात दादांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी अर्थ खातं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते.
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.