Shiv Sena Crisis | आमदार ते पक्षचिन्ह, उद्धव ठाकरे यांनी गेल्या 7 महिन्यात काय काय गमावलं?

| Updated on: Feb 22, 2023 | 12:01 AM

सत्तातरांच्या सात महिन्यात उद्धव ठाकरे गटात गमावण्याची मालिका सुरुच आहे. आधी आमदार, नंतर खासदार, महाराष्ट्राची सत्ता आणि त्यानंतर आता सभागृहातली कार्यालयं सुद्ध शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहेत.

Shiv Sena Crisis | आमदार ते पक्षचिन्ह, उद्धव ठाकरे यांनी गेल्या 7 महिन्यात काय काय गमावलं?
Follow us on

मुंबई : शिवसेनेचा ताबा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानतंर आता संभाव्य नवी कार्यकारिणी जाहीर झाल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे ठाकरे गटानं आता संसदेतल्या विधीमंडळ कार्यालयाचा ताबाही गमावलाय. मागच्या सात महिन्यात उद्धव ठाकरे गटानं काय-काय गमावलंय. पाहूयात.

सत्तातरांच्या सात महिन्यात उद्धव ठाकरे गटात गमावण्याची मालिका सुरुच आहे. आधी आमदार, नंतर खासदार, महाराष्ट्राची सत्ता आणि त्यानंतर आता सभागृहातली कार्यालयं सुद्ध शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहेत. सर्वात आधी ठाकरे गटानं 40 आमदार गमावले. त्यानंतर 13 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना मिळाला.

पक्षामुळे साहजिक धनुष्यबाणही शिंदेंना मिळालं. या निर्णयामुळे विधानभवनातल्या विधिमंडळ पक्षाचं कार्यालय त्यापाठोपाठ संसदेतल्या विधिमंडळ पक्षाचं कार्यालयही शिंदेंच्या शिवसेनेला मिळालंय.

हे सुद्धा वाचा

ठाकरेंकडे जेव्हा शिवसेना होती., तेव्हा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, तर कार्यकारिणीत मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, संजय राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते, आदित्य ठाकरे, गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांचा समावेश होता. यात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या अधिकारात अजून 4 जणांना घेतलं होतं. त्या चार जणांमध्ये अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदेंचा समावेश होता.

शिवसेना मिळाल्यानंतर आता शिंदेंनी संभाव्य कार्यकारिणी जाहीर केल्याचं बोललं जातंय. यात मुख्य नेते एकनाथ शिंदे, तर नेतेपदी संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, सदा सरवणकर, राहुल शेवाळे आणि शंभुराज देसाईंचा समावेश असेल.

तर उपनेतेपदी संजय राठोड, तानाजी सावंत, अनिल बाबर, शहाजी पाटील, तर इतर सदस्यपदावर गुलाबराव पाटील, भरत गोगावलेंसह इतर 7 जण असण्याची शक्यता आहे. यापैकी धनुष्यबाण शिंदेंना देण्याविरोधात ठाकरे गट कोर्टात गेलाय आणि सत्तातरांवेळी घडलेली विधानसभाध्याची नेमणूक, प्रतोद आणि पात्र-अपात्रतेची कारवाई ही प्रकरणं सध्या कोर्टात आहेत.